खते देण्यापूर्वी माती परीक्षण करावे. माती परीक्षण अहवालानुसार खते द्यावीत. नीम कोटेट युरियाचा वापर करावा. नत्रयुक्त खतांचा सेंद्रिय खतांबरोबर वापर करावा.हिरवळीच्या खतांचा वापर करावा.
युरिया खत इतर खतांच्या तुलनेत स्वस्त असल्याने तसेच त्याच्या वापराचा परिणाम पिकावर लवकर दिसत असल्याने शेतकऱ्यांची पसंती युरियाला असते. नत्रयुक्त रासायनिक खतांमध्ये युरियाचा वापर सर्वाधिक जास्त 59 टक्के पर्यंत असून अमोनियम व कॅल्शियम नायट्रेट (कॅन) चा वापर फक्त 2 टक्केच शेतकरी करतात. युरिया मध्ये 76%अमाईड नत्र असते. खत पांढरेशुभ्र दाणेदार आणि पाण्यात पूर्णपणे विरघळणारेअसते. आम्लधर्मीयआहे. युरिया मध्ये 20.6 टक्के ऑक्सिजन 20 टक्के कार्बन 7 टक्के हायड्रोजन 1 ते1.5टक्के बाययुरेट हे उपघटक असतात. दमट हवामानात आर्द्रता शोधून घेतल्यामुळे याचे खडे तयार होतात.अन्य खतात पाणी मिसळताना सुटणार नाही याची खात्री करावी. नत्राचे अमाईड रूपांतर यूरियेजविकारामुळे अमोनियातहोऊन नंतर ते नाइट्रेट स्वरूपात होते.
सर्वसाधारणपणे नत्र स्फुरद पालाशयुक्त खतांचा गुणोत्तर हे 4:2:1 चांगले समजण्यात येते. संतुलित प्रमाणात नत्र स्फुरद: पालाश वापर करावा. तृणधान्य पिकांना नत्राची गरज असते. तृणधान्यासाठी2:1:1 नत्र:स्फुरद: पालाशगुणोत्तर असावे. कडधान्यासाठी 1:2:1 नत्र: स्फुरद: पालाश गुणोत्तर असावे.
युरियाच्या अतिवापराचे परिणाम :-
- केवळ नत्रयुक्त खतांचा वापर केला तर पिकांची शाकीय वाढ होते. रोग किडीचा प्रादुर्भाव वाढतो.उत्पादनात घट येते. पिकांमध्ये लुसलुशीत पणा राहून खोड नाजूक राहते. पीक लोळते पिकांचा कालावधी वाढतो.
- युरिया खताचा अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. जमिनीतील कार्बन नत्र यांचे गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्म जिवाणूंची संख्या कमी होते.
- पालाश,कॅल्शियम, बोरॉन आणि तांबे या अन्नद्रव्याची कमतरता भासते.
- जमिनीमध्ये अमोनिया वायू जास्त प्रमाणात तयार होऊन नायट्रो बॅक्टर सारख्या जीवाणूंच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
- युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे भूगर्भातील पाण्याच्या प्रतीवर परिणाम होतो. पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढते.(10 पीपीएम), जलचर प्राण्याची हानी होते. पाण्यातील शेवाळ व पाळणं वनस्पतीची वाढ होते.
- अवाजवी वापरामुळे हवेचे प्रदूषण होत. युरियातील अमामाईड नत्राचे रूपांतर अमोनिया आणि नायट्रेट मध्ये होते. नायट्रस ऑक्साईड,नायट्रीक ऑक्साईड,यासारखे नत्राचे वायू हवेचे प्रदूषण वाढवतात. हे वायू 300 पटीने कार्बन डाय-ऑक्साइड पेक्षा घातक आहे. पृथ्वी भोवती असणाऱ्या ओझोन वायूच्या स्तरासछिद्रेपडून सूर्यापासून उत्पन्न झालेले अतिनील किरणे जमिनीच्या पृष्ठभागावर पोहोचतात.त्यामुळे वातावरणातील तापमान वाढण्यास मदत होते.
विना नीमकोटेड युरिया वापरल्याने होणारा परिणाम :-
- युरिया जमिनीत मिसळल्याने त्याचा पाण्याबरोबर संपर्क होताच तो लगेच विरघळतो.त्यातील नत्र पिकांना उपलब्ध होण्याची क्रिया तात्काळ सुरू होऊन काही प्रमाणात पाण्याबरोबर जमिनीत वाहून जातो.
- युरिया वाहून गेल्याने जमिनीतील पाणी प्रदूषित होते. या संपूर्ण प्रक्रियेत द्वारे नायट्रस ऑक्साईड नावाचा ग्रीन हाऊस वायू तयार होतो. त्यामुळे हवा दूषित होते.
- युरिया चा अति वापर टाळण्यासाठी:-
- खते देण्यापूर्वी माती परीक्षण करावे.माती परीक्षण अहवालानुसार खते द्यावीत.
- नीम कोटेटयुरियाचा वापर करावा.
- नत्रयुक्त खतांचा सेंद्रिय खतांबरोबर वापर करावा.हिरवळीच्या खतांचा वापर करावा.
- नत्रयुक्त खते पेरणीच्या वेळी फेकून न देता, दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावीत. कालावधी कमी असल्यानेनत्र खताची मात्रा विभागून द्यावी.
- एक किलो नत्र देण्यासाठी 2.17 किलो युरिया द्यावा. युरियाचा वापर कमी करण्यासाठी तृणधान्य पिकांनाॲझोटोबॅक्टर/ॲसिटोबॅक्टर तर द्विदल पिकांना रायझोबियम जिवाणूसंवर्धक 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे याप्रमाणे पेरणीपूर्वीबीजप्रक्रिया करावी. जैविक खतांच्या वापरामुळे तृणधान्य, द्विदल पिके व भाजीपाला पिकांमध्ये 15 ते 20 टक्के नत्राची बचत होते.उसामध्ये 50 टक्के पर्यंतबचत होते.
- भारतासारख्या पिकास युरिया ,ग्रॅनुल्सचावापर करावा.पाणथळ जमिनीत प्रामुख्याने अमोनिया धारक नत्रयुक्त खतांचा वापर करावा. कोरडवाहू शेतीमध्ये नत्रयुक्त खते पेरणीच्या वेळेस पेरून द्यावीत.
- ऊस केळी बीटी कापूस यांसारख्या दीर्घ मुदतीच्या पिकांना युरिया खताची मात्रा विभागून द्यावी. नायट्रेट युक्त खते वाहून जाऊ नयेत म्हणून नियंत्रित आणि हलकी ओलिताची पाळी द्यावी.
- शारयुक्त वचोपणयुक्त जमिनीत युरिया खत हे शेणखत, कंपोस्टखत किंवा गांडूळखताबरोबरच द्यावे.युरिया खताची मात्रा 25 टक्क्यांनी वाढवून द्यावी.
Share your comments