भारत एक शेतीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. मात्र शेतीचे क्षेत्र जोखीमपूर्ण क्षेत्र आहे. यामध्ये पिकांची लागवड, हंगाम आणि त्यांची विक्री यावर नफा अवलंबून असतो. अनेक वेळा वर्षभर शेती करूनही शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत नाही. यामुळे शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करणे आता महत्त्वाचे झाले आहे.
खरं पाहता शेतकरी बांधव आता बदलत्या काळानुसार शेतीमध्ये बदल देखील करीत आहेत. सध्या शेतकरी बांधव पारंपरिक पिकाला फाटा देत मागणी मध्ये असलेल्या पिकांची लागवड करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा देखील होत आहे. हिच बाब लक्षात घेता आज आपण निलगिरीच्या शेती विषयी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत. निलगिरीच्या झाडाच्या लाकडाला मोठी मागणी असल्याने याची शेती शेतकऱ्यांना निश्चितच फायदा देऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया या विषयी.
महत्वाच्या बातम्या:
भावा फक्त तूच रे…! 10 गुंठ्यात ब्रॉकोली लागवड केली अन मिळवलं 2 लाखांचे उत्पन्न; वाचा काय होतं नियोजन
बातमी कामाची! या फळाची शेती करा आणि कमवा चार लाखांचा नफा; वाचा सविस्तर
काय सांगता! शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी मोदी सरकार देणार 11 हजार रुपये; वाचा
निलगिरीच्या शेतीविषयी अल्पशी माहिती
निलगिरीच्या झाडाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना काही वर्षात भरपूर नफा मिळू शकतो. याची शेती करताना शेतकऱ्यांना कोणतीचं अडचण येत नाही. या झाडाला ना जास्त पाणी लागते, ना हवामानाच्या बदलत्या मूडचा फारसा परिणाम होतो. विशेष म्हणजे या झाडाच्या लागवडीचा खर्च देखील खूपच कमी आहे. म्हणजेच कमी खर्चात या झाडाची लागवड करून शेतकरी बांधव चांगला नफा सहज कमवू शकतात.
मित्रांनो हे झाड कमी दाट आणि दिसायला सरळ असते यामुळे या झाडाची लागवड करण्यासाठी जास्त शेतजमीन लागत नाही. या झाडाची 3000 हजार रोपे सुमारे एक हेक्टर क्षेत्रात लावली जाऊ शकतात असा दावा कृषी वैज्ञानिक करत असतात. मात्र या निलगिरीच्या झाडाला पूर्ण विकसित होण्यासाठी सुमारे पाच वर्षे लागतात. यामुळे याची लागवड केल्यानंतर सुमारे पाच वर्षांनी उत्पादन मिळण्यास सुरवात होते.
लाकडाचा कुठे वापर होतो
याच्या लाकडाचा वापर हार्ड बोर्ड, फर्निचर आणि पार्टिकल बोर्ड, बॉक्स, इत्यादी बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. याशिवाय निलगिरीच्या झाडाचे लाकूड इंधन म्हणून देखील उपयोगात आणले जाते. यामुळे या लाकडाला बारामही मागणी असल्याचा दावा केला जातो. निलगिरीची लागवड केवळ 30 हजार रुपये गुंतवणूक करून केली जाऊ शकते.
म्हणजेच कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे झाड म्हणून निलगिरीची शेती केली जाऊ शकते. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, याच्या एका झाडापासून सुमारे 400 किलो लाकूड मिळते. याच्या लाकडाची बाजारात किंमत सात रुपये प्रति किलो एवढी असते. अशा पद्धतीने याच्या केवळ 3 हजार झाडांची लागवड करून शेतकरी बांधव पाच वर्षानंतर सुमारे 72 लाखांपर्यंत नफा कमवू शकतात.
Share your comments