1. कृषीपीडिया

भेंडी पिकाच्या चांगल्या विकासासाठी आणि चांगल्या उत्पादणासाठी पिकास आवश्यक पोषकतत्वे

भेंडी पिकाविषयीं अल्पशी माहिती भेंडी पिकांची प्रामुख्याने त्याच्या मऊ हिरव्या रंगाच्या फळांसाठी लागवड केली जाते. सुकी भेंडी आणि भेंडीची साल कागद उद्योगात आणि फायबर काढण्यासाठी उपयुक्त आहे. भेंडीमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, कॅल्शियम आणि इतर खनिजांचा खुप मोठा स्रोत असतो. भारतातील मुख्य भेंडी लागवड करणारे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओरिसा.महाराष्ट्रात देखील थोड्या प्रमाणात भेंडीची लागवड केली जाते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
lady finger crop

lady finger crop

भेंडी पिकाविषयीं अल्पशी माहिती

भेंडी पिकांची प्रामुख्याने त्याच्या मऊ हिरव्या रंगाच्या फळांसाठी लागवड केली जाते. सुकी भेंडी आणि भेंडीची साल कागद उद्योगात आणि फायबर काढण्यासाठी उपयुक्त आहे.  भेंडीमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, कॅल्शियम आणि इतर खनिजांचा खुप मोठा स्रोत असतो. भारतातील मुख्य भेंडी लागवड करणारे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओरिसा.महाराष्ट्रात देखील थोड्या प्रमाणात भेंडीची लागवड केली जाते.

भारतात भाजीपाला पिकांची लागवड थोड्या बहु प्रमाणात सर्वत्र केली जाते. भाजीपाला आपल्या आहाराचा महत्वाचा घटक आहे आणि म्हणुन त्याची मागणी बाजारात वर्षभर बनलेली असते, अशाच भाजीपाला पिकांपैकी एक म्हणजे भेंडीचे पिक आज आपण भेंडी पिकासाठी आवश्यक पोषकतत्वाची माहिती जाणुन घेणार आहोत कुठल्याही पिकांच्या वाढीसाठी, चांगल्या उत्पादणासाठी पोषक तत्वाची आवश्यकता असते तशीच आवश्यकता भेंडी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आवश्यक असते.भेंडी हे एक महत्वपूर्ण पिकांपैकी एक आहे, भेंडीची भाजी ही जवळपास सर्वांच्याच घरात बनवली जाते, भेंडीमध्ये फायबर पण चांगल्या प्रमाणात आढळते म्हणुन हे मानवी शरीरासाठी आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते.भेंडीच्या आरोग्यदायी गुणांमुळे भेंडीची मागणी बाजारात कायम असते आणि परिणामस्वरूप ह्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो.

भेंडीसाठी उपयुक्त पोषकतत्वे कोणती

भेंडी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादणासाठी पोषक तत्वे एक महत्वाची भूमिका बजवतात. जर भेंडीमध्ये पोषकतत्वाची कमतरता झाली तर भेंडीच्या हिरव्यापणात कमी येते आणि तसेच भेंडी पिकाचा विकास पण चांगला होत नाही आणि उत्पादनमध्ये घट होते. भेंडीचे झाड हे लहानच राहून जाते आणि त्यामुळे त्यावर फुल पण चांगले येत नाहीत ह्या सर्व कारणास्तव भेंडी पिकाच्या उत्पादनात खुप घट घडून येते. ह्या सर्व समस्याचे निराकारण करण्यासाठी आपल्या जमिनीचे माती परीक्षण करणे महत्वाचे ठरते माती परीक्षण करून भेंडी पिकाच्या विकासासाठी आवश्यक ती पोषकतत्वे संतुलित प्रमाणात द्यावी लागतात. 

 

मातीमध्ये असलेल्या कमतरता नुसार खत वा खाद्य जमिनीत टाकावे लागते. झाडांना सूक्ष्म आणि फायदेशीर पोषकतत्वेचा पुरवठा करण्यासाठी, भेंडी पिकाच्या वाढीच्या टप्प्यावर, पाण्यात विरघळणारे खत N: P: K 19:19:19 @ 1 प्रति किलो + सूक्ष्म पोषक @ 250 ग्रॅम प्रति एकर मिसळा. ते 200 लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे.जर तुमच्याकडे ठिबकसिंचन उपलब्ध असेल तर N: P: K 19:19:19 @ 3 प्रति किलो + सूक्ष्म पोषक @ 250 ग्रॅम प्रति एकर दराने ठिबक सिंचनाद्वारे भेंडी पिकाला लावावे.

English Summary: essential nutriants for lady finger crop Published on: 20 September 2021, 06:27 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters