शेतकरी मित्रांनो आज आपण वांग्याच्या पिकाविषयीं माहिती घेणार आहोत.वांगे (brinjal ) भारतात पिकावल्या जाणाऱ्या भाज्यांपैकी एक आहे.भारतात वांग्याचे पीक जवळपास सर्वच प्रांतात घेतले जाते वांग्याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं. जसं की,बंगाल मध्ये याला बेगून, गुजरात मध्ये रिंगणा, कन्नड मध्ये बदाने आणि हिंदीत त्याला बैंगन असं संबोधलं जातं. वांग्याचे पीक दुष्काळी भागात व कमी सिंचन असलेल्या प्रदेशात अधिक प्रमाणात घेतले जाते.
वांग्याच्या पानात व्हिटॅमिन सी असतो त्यामुळे वांग्यात देखील व्हिटॅमिन्स आणि अन्य मिनरलस मोठ्या प्रमाणात असतात.वांग्याचे पीक हे बाराही महिने घेतले जाते. चीन नंतर भारत हा वांग्याचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. भारतात प्रमुख वांगे उत्पादक राज्ये पश्चिम बंगाल, बिहार, कर्नाटक, ओरिसा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आणि आंध्र प्रदेश आहेत.
वांग्याच्या पिकासाठी लागणारी जमीन.
वांग्याचे पीक हे विभिन्न प्रकारच्या जमिनीत घेतले जाऊ शकते. वांगे हे दीर्घ काल शेतात राहणार असतं त्यामुळे वांग्याचे पीक हे ज्या जमिनीत पाण्याचा जास्त निचरा होतो अशा ठिकाणी असणे अधिक लाभदायक ठरत.काळ्या मातीत वांग्याचे पीक घेतल्यास उत्पादनही चांगल्या प्रतीचे मिळते. वांगे ह्या पिकाचे चांगले उत्पादन येण्याकरिता मातीचा पीएच 5.5-6.6 दरम्यान असायला हवा. ह्या व्यतिरिक्त मातीत कार्बोनेट पदार्थांची मात्रा उत्तम असायला हवी.
हवामान
वांग्याचे पीक मैदानी प्रदेशात बाराही महिने घेतले जाऊ शकते.परंतु वांग्याच्या पिकासाठी उत्तम हंगाम हा रबी हंगामच असतो.
पावसाळी – जून ते जुलै
हिवाळी –ऑक्टोबर ते नोव्हेंबर
उन्हाळी – फेब्रुवारी ते मार्च
वांग्याची रोपे तयार करा
वांग्याची रोपे ही नर्सरीत वाढवली जातात.त्यामुळे शेतात चांगल्या प्रकारे लागवड केली जाते. मातीत पाणी साचून रोपे नाश होऊ नयेत म्हणून रोपे लवणीसाठी कॅरीची आवश्यकता असते.चांगल्या प्रतीची रोपे येण्यासाठी 7.2 ×1.2 मीटर आणि 10ते 15 सेमी उंच आईस्ड बेड तैयार केले जातात ह्या प्रकारे 1हेक्टर क्षेत्रासाठी 10 बेड तैयार केले जातात. रोपाचे बीज 2-3 सेमी खोलीत पेरलं जाते व वरून मातीची एक आल्हाद लेअरने झाकल जाते.आणि नंतर पाणी दिल जाते अल्पशा प्रमाणात. अंकुर निघोसतोपर्यंत पाणी कॅन ने दिल गेलं पाहिजे आवश्यकता अनुसार. अंकुरण झाल्यानंतर लगेचच रोप वरती असणारा घास बाजूला केला जातो. बीज पेरल्यानंतर 4-6 आठवड्यात लावणीयोग्य होतात
अंतर
साधारणतः वांग्याचे रोपे जी लांब वांगे असतात ती 60 × 45 सेमी अंतरावर लावली जातात.जी वांगी गोल असतात ती 75×60 सेमी अंतरावर व जास्त उत्पादन देणारी जातींचे रोपे 90× 90 वर लावली जातात. वांग्याचे रोपे सायंकाळी लावली गेली पाहिजेत.
पाणी व्यवस्थापन
वांग्याच्या रोपाच्या बुडाजवळ थंडावा मेटेन करावा.लागवडीनंतर पहिल्या व तिसऱ्या दिवशी पाणी दिल पाहिजे.हिबाळ्यात 7-8 दिवसात पाणी दिल गेलं पाहिजे. आणि उन्हाळ्यात 5-6 दिवसात पाणी दिल पाहिजे.
वांग्याची तोडणी
वांग्याची तोडणी ही वांगे चमकदार व कवळी असतानाच झाली पाहिजे. नंतर वांगी खुप निब्बर होतात.
Share your comments