हरितगृहातील भाजीपाला पिकावरील प्रभावी रोग व्यवस्थापन

02 January 2021 06:51 PM By: भरत भास्कर जाधव
भाजीपाला पिकावरील प्रभावी रोग व्यवस्थापन

भाजीपाला पिकावरील प्रभावी रोग व्यवस्थापन

महारष्ट्रात दिवसा व रात्रीतील तापमानातील तफावत असते. यामुळे टोमॅटो, शिमला मिरची , काकडी व ब्रोकोली या भाजीपाला पिकावर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कोरोनायुद्ध काळात भाजीपाला पिकांना बाजारपेठेमध्ये असलेली मागणी आणि निर्यातीस असलेला प्रचंड वाव यांचा सारासार विचार करून रोगांचा प्रादुर्भाव ओळखून त्वरित उपाययोजना कराव्यात.

या लेखामध्ये शिमला मिरची, काकडी व ब्रोकोली वरील विविध रोग त्यांचे लक्षणे, रोगांचा प्रसार आणि त्यांचे व्यवस्थापन या बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

 काकडी - रोग नियंत्रण

 • बुरशीजन्य मर (फ्युजारीयम विल्ट):-

    रोगाची लक्षणे :-

 • सुरुवातीला पाने पिवळसर रंगाची दिसतात व कालांतराने संपूर्ण वेल वाळत असतो.
 • रोगट वेलीच्या मुळाचा आढवा आंतरछेद घेतल्यास आतील बाजूस तपकिरी रंगाचा गाभा दिसून येतो.

 • वेलींची वाढ खुंटून वेली वाळून मरून जातात. मर रोगामुळे पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान होते, तसेच रोग पीक फुल-फळधारणा अवस्थेत आल्यावर उत्पादनात घट होते.

    रोग नियंत्रण :-

 • पीक मर रोगास बळी पडले असेल तर त्या जमिनीत पुढील पाच वर्षे हे पीक घेऊ नये.

 • फवारणी(लागवडीनंतर 25 दिवसांनी) मर रोगाच्या नियंत्रणासाठी-कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड (50 टक्के ईसी) 2.5 ग्रॅम किंवा मेटॅलॅक्‍झील + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून जमिनीतून द्यावे.

 

 • केवडा :-

रोगाची लक्षणे :-

 • हा बुरशीजन्य रोगाची दमट हवामानात खूप जोमाने वाढ होते.
 • पानांच्या वरच्या बाजूने पिवळ्या रंगाचे लहान ठिपके दिसतात व पानांच्या खालच्या बाजूने चिकट, ओले, फिकट हिरव्या रंगाचे ठिपके दिसतात.
 • ठिपके आकारापेक्षा जास्त न वाढता मोठ्या संख्येने असल्यामुळे पूर्ण पानभर पसरून पाने वाळतात व संपूर्ण पीक जळाल्यासारखे दिसते.

रोग नियंत्रण :-

 • रोगप्रतिकारक्षम जातींचा वापर करावा.
 • मागील पिकांचे अवशेष नष्ट करावेत व पिकांची फेरपालट करावी.
 • केवडा रोग नियंत्रणासाठी लागवडीनंतर 35 दिवसांनी प्रति लिटर पाण्यासाठी मात्रा - मेटॅलॅक्‍झील अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) दोन ग्रॅम किंवा झायनेब (72 टक्के डब्ल्यूपी) 4 ग्रॅम.
 • भुरी :-

रोगाची लक्षणे :-

 • भुरी हा बुरशीजन्य रोग असून केवड्याप्रमाणे नुकसानकारक आहे.
 • यामध्ये पानांच्या दोन्ही भागांवर व खोडावर पावडरीसारखे लहान ठिपके सुरवातीला दिसतात. हे ठिपके वाढत जाऊन संपूर्ण पानांवर खूप जलद पसरतात.
 • रोग नियंत्रण :-
 • लागवडीनंतर ५० दिवसांनी प्रोपिनेब या बुरशी नाशकाची ०.१५ टक्के (१.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी) फवारण करावी.
 • केवडा (डाउणी मिल्ड्यू) मॅन्कॉझेब (०.२५ टक्के) बुरशीनाशकाची फवारण करावी.

हरितगृहातील ब्रोकोली प्रभावी रोग नियंत्रण :-

 • रोपे कोलमडणे (डॅपिंग ऑफ)

रोगाची लक्षणे :-

 • हा रोग बुरशी-पिथीयम, फायटोप्थेरा, रायझोक्टोनिया या बुरशीमुळे होतो.
 • या रोगामुळे रोपे जमिनीलगतच्या भागात कुजून अचानक कोलमडतात.
 • उष्ण आणि दमट हवेत तसेच रोपवाटिकेत पाण्याचा निचरा चांगला नसल्यास हा रोग लवकर बळावतो.

नियंत्रण :-

 • बी पेरण्यापूर्वी गादीवाफे सिल्व्हर पेरॉक्साइड रसायन द्रव्याने निर्जंतुक करावे.
 • बी उगवून आल्यावर १०-१२ दिवसांच्या अंतराने डायथेन एक-४५ औषध २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात घेऊन २-३ वेळा ड्रेचिंग करावे.
 • घाण्या रोग (ब्लॅक रॉट)

हेही वाचा : सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला उत्पादन करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

रोगाची लक्षणे :-

 • हा अणुजीव रोग असून उष्ण आणि दमट हवामानात या रोगाची लागण झपाट्याने होते.
 • पानाच्या मुख्य आणि उपशिरांमधल्या मागात पानाच्या कडा - मरून इंग्रजी व्ही या आकाराचे पिवळे डाग दिसू लागतात. लागण झालेला भाग कुजून वाळून जातो.
 • प्रादुर्भाव जास्त असल्यास झाडाच्या अन्न व पाणी वाहून नेणाऱ्या पेशी कुजून खोड, शिरा आतून काळ्या पडतात. अशी रोपे गड्डा न धरताच वाळून जातात. संपूर्ण पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. उशिरा रोग आल्यास गड्डा सडण्याचे प्रमाण जास्त असते.

नियंत्रण :

 • रोगप्रतिबंधक जातींची लागवडीसाठी निवड करावी.

 • रोगाची मुळाकडे लागण होऊ नये म्हणून बी मयुरिक क्लोराइडच्या द्रावणात (१ ग्रॅम औषध आणि १ लिटर पाणी या प्रमाणात) ३० मिनिटे भिजत ठेवून नंतर सावलीत सुकवून घ्यावे.
 • करपा किंवा काळे डाग (ब्लॅक स्पॉट) :-

रोगाची लक्षणे :

 • या बुरशीजन्य रोगाची लागण बियाण्यांतून होते.

 • पाने, देठ आणि खोडावर वर्तुळाकार किंवा लांब गोल डाग दिसू लागतात. डाग एकमेकांत मिसळून लागण झालेला भाग करपलेला काळपट दिसतो.

 • जास्त दमट आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास गड्ड्यावर डाग दिसतात.

हेही वाचा :शेतातील यशासाठी भाजीपाला काढणी दरम्यान व काढणी पश्चात व्यवस्थापन आहे महत्त्वाचे 

नियंत्रण :

 1. नियंत्रणासाठी रोगप्रतिबंधक जातींची लागवडीसाठी निवड करावी.

 2. डायथेन एम-४५ हे औषध २.५ ग्रॅम किंवा बावीस्टीन १ ग्रॅम किंवा बेनोमिल १ ग्रॅम किंवा रूबीगन ०.३५ मि.ली. प्रतिलिटर या प्रमाणात घेऊन औषधाच्या आलटून पालटून १०-१२ दिवसांच्या अंतराने ३-४ फवारण्या कराव्यात.

भुरी (पावडरी मिल्ड्यू) :-

  रोगाची लक्षणे :

 • या बुरशीजन्य रोगाची वाढ उष्ण आणि दमट हवामानात जोमाने आढळते.

 • पांढरे ठिपके हळूहळू मोठे होऊन एकमेकांत मिसळून पानाच्या दोन्ही खालील आणि वरील बाजूस पसरतात.

 • शेवटी पाने पिवळी पडून करड्या रंगाची होऊन वाळून जातात. पण बाजारपेठेत मागणीप्रमाणे गड्ड्यांची काढणी करावी.

 • केवडा (डाउनी मिल्ड्यू)

  :-

रोगाची लक्षणे :

 • पानांच्या वरील बाजूस अनियमित आकाराचे पाणीयुक्त पिवळे ठिपके आढळतात.

 • पानांच्या खालील बाजूससुद्धा रोगाचे चट्टे आढळून येतात. चट्ट्यांवर पांढऱ्या गुलाबी रंगाची केवड्याची वाढ आढळून येते.

 • गड्यांतून फुलांचे दांडे वर येतात.

 • या रोगांमुळे त्यांच्यावर काळपट पट्टे दिसतात आणि रोग बळावल्यास पुर्ण गड्डा नासून जातो.

नियंत्रण :-

 1. नियंत्रणासाठी झाडांवर डायथेन एम-४५ औषध २.५ ग्रॅम किंवा रेडोमिल १.५ ग्रॅम किंवा ॲलिएट ३ ग्रॅम किंवा कवच १.५ ग्रॅम किंवा १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात घेऊन या औषधांचे द्रावण आलटून पालटून तीन-चार वेळा दहा-बारा दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात.

लेखक :-

 • प्रा. हरिष अ. फरकाडे

   सहायक प्राध्यापक (वनस्पती रोगशास्त्र विभाग)

श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविध्यालय, अमरावती

मो. नं.- ८९२८३६३६३८  इ.मेल. agriharish27@gmail.com

२)   प्रा. मनीषा श्री. लांडे

सहायक प्राध्यापक (वनस्पती रोगशास्त्र विभाग)

श्री. संत शंकर महाराज कृषि महाविद्यालय, पिंपळखुटा, ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती

 इ.मेल. manishalande801@gmail.com

 

vegetable crops Greenhouse disease management रोग व्यवस्थापन हरितगृह भाजीपाला
English Summary: Effective disease management on greenhouse vegetable crops

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.