1. कृषीपीडिया

केळी लागवड करता का; मग केळीची पाने देखील विकता येतात जाणुन घ्या त्याविषयी

भारतात दक्षिणमध्ये केळीच्या पानावर जेवण करण्याची आजही परंपरा आहे. दक्षिण भारत सोडा, खान्देश मध्ये जळगाव जिल्ह्यात देखील लग्नात किंवा अन्य काही धार्मिक कार्यक्रमात केळीच्या पानावर जेवण करण्याची रीत आहे. केळीच्या पानांचा वापर प्रामुख्याने भारत आणि दक्षिणपूर्व आशियातील अनेक देशांमध्ये धार्मिक उत्सव, विवाह आणि इतर समारंभांमध्ये सजावटीसाठी केला जातो. केळीच्या पानांचा उद्योग हा अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक उपजीविकेचे साधन बनले आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
banana crop

banana crop

भारतात दक्षिणमध्ये केळीच्या पानावर जेवण करण्याची आजही परंपरा आहे. दक्षिण भारत सोडा, खान्देश मध्ये जळगाव जिल्ह्यात देखील लग्नात किंवा अन्य काही धार्मिक कार्यक्रमात केळीच्या पानावर जेवण करण्याची रीत आहे. केळीच्या पानांचा वापर प्रामुख्याने भारत आणि दक्षिणपूर्व आशियातील अनेक देशांमध्ये धार्मिक उत्सव, विवाह आणि इतर समारंभांमध्ये सजावटीसाठी केला जातो.  केळीच्या पानांचा उद्योग हा अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक उपजीविकेचे साधन बनले आहे.

एकूण केळीच्या व्यापारात केळीच्या पानाचा व्यापारचा मोठा वाटा

भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे आणि भारतीय वैदिक परंपरेत असे मानले जाते की जेव्हा केळीच्या पानांवर अन्न खायला दिले जाते तेव्हा त्या भोजनाला एक विशेष अशी चव प्राप्त होते आणि आरोग्यासाठी देखील खुपच चांगले मानले जाते. सध्या केळीच्या पानांचे उत्पादन हे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात एक मोठा व्यवसाय बनला आहे.  सध्या, त्याची वार्षिक उलाढाल 2 कोटी 50 लाख रुपये आहे, जी केळी उद्योगाच्या एकूण वार्षिक उलाढालीच्या 7 व्या भागाच्या बरोबरीची आहे. केळीच्या पानांचा बायोडिग्रेडेबल फूड ट्रे म्हणून वापर करणे सांस्कृतिकदृष्ट्या आणि पर्यावरणीयदृष्ट्या खुप महत्त्वाचे आहे. केळीच्या पानाचा वापर हा पर्यावरणासाठी सुद्धा खुप महत्वपूर्ण आहे.

 

केळीच्या पानांची नेहमी असते मोठी मागणी

वर्षभर केळीच्या पानांच्या मागणी ही बनलेली असते, केळीच्या पानांचे उत्पादन/कापणी हा केळी पिकवणाऱ्या बहुतेक राज्यांमध्ये एक व्यावसायिक उपक्रम बनला आहे आणि हे वर्षभर शेतकरी कुटुंबांना उत्पन्नाचे एक शाश्वत साधन बनले आहे आणि यातून केळी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना एक अतिरिक्त उत्पन्नाचे साधन बनले आहे. एवढेच नाही तर, केळीच्या पिकातील जी किंमतीची चढउतार बनलेली असते त्यासाठी हे एक शाश्वत उत्पन्न देणारे एक अतिरिक्त साधन म्हणुन काम करेल.

 पानांच्या व्यावसायिक शेतीसाठी काही प्रगत जाती

केवळ पानांच्या उत्पादनासाठी अद्याप केळीच्या कोणत्याही व्यावसायिक वाण उपलब्ध नाहीत.  

सध्या पूवन, मोंथन, पायेन, सकाई आणि करपूरवल्ली सारख्या जातीची लागवड ही पानांच्या व्यापारच्या उद्देशाने केली जाते, आणि त्याची फळे विविध आहारांमध्ये वापरली जातात. केळीची पाने मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जातात आणि त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. केळीच्या पानांची वाढती मागणी ही केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिरिक्त उत्पन्नाचा पर्याय म्हणुन काम करेल अशी आशा व्यक्त केली जातं आहे.

English Summary: earn money from selling banana leaves Published on: 25 September 2021, 08:57 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters