जर आपण शेती व्यवसाय करण्याचा विचार करत आहात पण कसा करायचा काय केले पाहिजे. कोणते उत्पन्न घेतले पाहिजे जेणेकरून आपल्याला मोठं उत्पन्न मिळेल. असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर हे सोडविण्यासाठी आम्ही तुमची मदत करु शकतो. जर आपल्याला शेती करायची असेल आणि त्यात आपल्याला चांगले उत्पन्न मिळवयाचे असेल तर शेवग्याची शेती तुम्ही करा, यात तुम्हाला नक्की फायदा होईल. सध्याची स्थिती बघतली तर कोरोनामुळे अनेकांची नोकरी गेली आहे. रोजंदारीने काम करणाऱ्यांवर उपासी मरण्याची वेळ आली आहे. पण जर आपल्या शेती आहे, सद्य स्थितीमुळे आपली नोकरी गेली असेल, किंवा शेती व्यवसाय आपल्याला करायचा असेल तर आपण शेवग्याच्या शेतीने श्रीगणेशा करा.
सध्या शेवग्याची शेती करण्याकडे अनेकांचा कल दिसतो आहे. कारण या शेतीसाठी आपल्याला जास्त मोठ्या जमिनीची गरज लागत नाही. एका एकरमध्ये आपण १० महिन्यात एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवू शकतो, शेवगा हे एक औषधी झाड आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून याकडे पाहिले जाते. याची लागवडी किंवा पेरणी केली तर चार वर्षापर्यंत याचा लागवड करण्याची गरज नसते. याची शेती केली तर आपण ६ लाख रुपये वार्षिक तर महिन्याला ५० हजार रुपयांची कमाई करु शकता. शेवग्याची शेती करणे जितकं सोपे आहे, तितकी याची मार्केटिंग आणि निर्यात करणे. जर मेडिकल क्रॉपची व्यवस्थित लागवड केली असली तर देशासह जगातही त्याला प्रचंड मागणी असते.
शेवग्याला इंग्रजीमध्ये ड्रमस्टिक म्हटलं जाते. याचे शास्त्रीय नाव हे मोरिंगा ओलीफेरा आहे. याची शेती करण्यासाठी पाण्याची इतकी गरज नसते. कमी पाण्याच्या उपलब्धतेतही याची शेती आपण व्यवस्थितपणे करु शकतो.
जर आपल्या शेतात पूर्ण शेवगाच लावयचा नसेल तर आपण इतर पिकांसह याची झाडे लावून याचे उत्पन्न घेऊ शकतो. बांधांवर याची झाडे लावून आपण चारवर्षापर्यंत याचे उत्पन्न घेऊ शकतो. उष्ण वातावरणात शेवग्याची झाडे अधिक बहरत असतात. हिवाळ्यात याची शेती ही परवडणारी नसते. कारण शेवग्याची फुले फुलण्यासाठी किंवा बहरण्यासाठी २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. चिकण माती किंवा कोरड्या जमिनीत याची वाढ चांगली होत असते. एका वर्षानंतर दुसऱ्या वर्षापासून वर्षातून दोनदा आपण उत्पन्न घेऊ शकतो. विशेष म्हणजे हे झाड १० वर्षापर्यंत उत्पन्न देत असते. शेवग्याच्या अनेक जाती आहेत, यातील काही मुख्य जाती ह्या कोयम्बतूर २, रोहित १, पी.के.एम १, आणि पी. के एम २ ही आहेत.
शेवग्याचा प्रत्येक हिस्सा हा खाण्यायोग्य असतो. शेववग्याची शेंग, त्यानंतर झाडाची पाने ही आपण सलाड म्हणून खाऊ शकतो. फूलही आपण खाऊ शकतो. शेंगांमध्ये औषधी गुणही असते. शेंग्यांमध्ये असलेल्या बियांमधून तेल निघत असते. शेवगा खाल्याने ३०० रोगांपासून आपला बचाव होतो असा दावाही काहीजण करतात. शेवग्यातून ९२ विटॉमीन, ४६ एंटी एक्सीडेंट, ३६ वेदनाशमक म्हणजेच पेन किलर, आणि १८ प्रकारचे एमिनो एसिड मिळत असतात. एका शेतकऱ्याने सांगितल्या प्रमाणे आपण एका एकरात १२,०० झाडे लावू शकतो. याचा खर्च हा ५० हजार ते ६० हजार रुपये होत असतो. शेवग्यांची पाने विकूनही आपण आपला खर्च काढू शकतो.
Share your comments