पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी व कोरडवाहू क्षेत्रांमध्ये शेवगा पीक चांगल्या प्रकारे उत्पन्न देते. पावसाळ्यामध्ये जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य अंतरावर शेवग्याची लागवड करावी.
आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात शेवग्याची लागवड व्यापारी दृष्टीकोनातून केली जाते. महाराष्ट्र मध्ये देखील सध्या फळबाग क्षेत्र वाढत असल्याने बऱ्याच फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून शेवगा लागवड वाढत आहे. शेवगा हे द्विदल वर्गीय बहुवर्षीय पीक असूनजमिनीत नत्र स्थिर करते. शेवग्याचा पाला गळून जमिनीवर पडत असल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. या लेखामध्ये आपण शेवगा लागवड विषयी महत्त्वाची माहिती घेऊ.
1) हवामान व जमीन :
1) शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो.
2) शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते तेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे अशा ठिकाणी डोंगर उतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो.
2) सुधारित जाती :
1) कोईमतुर -1, कोईमतुर -2, पी.के.एम.-1 आणि पि.के.एम.-2, या जाती कोइमतूर येथील तामिळनाडू फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या आहेत.
2) या जातीची झाडे पाच ते सहा मीटर उंच वाढतात झाडाच 16 ते 22 फांद्या असतात.
3) पी. के. एम.-2 ही जात लागवडीपासून 6 ते 7 महिन्यात शेंगा देणारी आहे या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत शेंगा 5 ते 60 सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाचे असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो.
3) लागवड :
1) पावसाळ्यापूर्वी साठ सेमी लांब रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती कुजलेले शेणखत 1 घमेले, सुफला 15:15:15(250 ग्रॅम) आणि दहा टक्के लिंडेन पावडर (50 ग्रॅम) टाकून खड्डा भरून घ्यावा.
2) लागवड करताना दोन झाडातील व ओळीतील अंतर 3मीटर ठेवावे. शेताच्या बांधावर लागवडीसाठी 3 मीटर अंतर ठेवावे.
4) लागवडीचा कालावधी :
1) जून ते जुलैमध्ये पावसाळ्यानंतर वातावरणात अनुकूल बदल होतो हवेतील आद्रता वाढते अशी हवा रोपे रुजण्यास अनुकूल असते तेव्हा याच वेळी लागवड करावी.
2) फाटे कलम अथवा रोपे लावल्यावर त्याच्या जवळील माती पायाने चांगली दाबावी वहात पाणी द्यावे. लागवडीनंतर सहा ते सात महिने गरज पडेल तेव्हा पाणी देऊन किंवा ठिबक सिंचनाने झाडे जगवावीत.
5) आंतरपीक :
1) आंबा, चिकू, लिंबू, जांभूळ, आवळा, चिंच व सीताफळ या भागांमध्ये पहिले 5 ते 6 वर्षे आंतरपीक म्हणून शेवगा घेता येतो.
2) शेवग्याची लागवड सलग पद्धतीने केल्यास त्यामध्ये खरिपात सोयाबीन, मूग, उडीद, हुलगा अशा कडधान्यांची व रब्बी हंगामात हरभऱ्याची लागवड केल्यास जमिनीची सुपीकता वाढून आंतरपिकाचे उत्पादन मिळते.
3) मध्यम ते भारी जमिनीत शेवग्याची लागवड करावयाची असल्यास व पाण्याची उपलब्धता असेल तर नगदी पिके सुद्धा घेणे फायद्याचे ठरते.
6) लागवडीनंतर घ्यावयाची काळजी :
1) झाडाची आळी खुरपून स्वच्छ करावी. तसेच दोन झाडांच्या ओळीत वखरणी करावी.म्हणजेच तणांचा उपद्रव होणार नाही.
2) प्रत्येक झाडास 10 किलो शेणखत, 75 ग्रॅम नत्र,( 165 ग्रॅम युरिया ), 50 ग्रॅम स्फुरद,( 312 ग्रॅम सुपर फॉस्फेट) व 75 किलो पालाश ( 120 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ) द्यावे.
3) शेवग्याची झाडे झपाट्याने वाढणारे असल्यामुळे झाडांना आकार देणे आवश्यक आहे. व्यवस्थित आकार दिला नाही तर झाड उंच वाढते. त्यामुळे शेंगा काढणे अवघड जाते.
7) शेवग्याची छाटणी:
1) लागवडीनंतर साधारण पणे 3 ते 4 महिन्यानंतर व झाडांची उंची 3 ते 4 फुट झाल्यानंतर वरून अर्धा ते एक फूट शेंडा छाटावा. त्यामुळे झाडांची उंची मर्यादित राहून शेंगा देणाऱ्या फांद्या 3 ते 4 फुटाच्या खाली आल्याने शेंगा काढणीस सोपे जाते.
2) लागवडीपासून 6 ते 7 महिन्यात शेंगा तोडणीस येतात. त्यानंतर 3 ते 4 महिने शेंगाचे उत्पादन मिळते.
3) एक पीक झाल्यानंतर पुन्हा झाडांची छाटणी करून झाडास योग्य तो आकार द्यावा. त्यासाठी झाडाचा मुख्य बुंधा
3 ते 4 फूट ठेवून बाजूच्या फांद्या साधारणत: 1 ते 2 फूट ठेवाव्यात.
8) पिक संरक्षण:
या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव फारसा दिसत नाही.परंतु काही वेळा जून ते ऑगस्ट महिन्यात पानांची गळ होते. खोड व फांद्या वर ठिपके किंवा चट्टे दिसतात.रोपे मरतात.
या रोगांच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम (10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा बोर्डो मिश्रण (0.25%) फवारावे.
9) काढणी व उत्पादन :
लागवडीपासून सुमारे 6 ते 7 महिन्यांनी शेंगा मिळू लागतात. पूर्ण वाढीच्या आणि ज्यांचा पीळ पूर्ण उलगडला आहे. अशा शेंगा लांबीनुसार जुळवून घ्यावे त्यात प्लॅस्टिक कागदाच्या गोणपाटात गुंडांळल्यास शेंगांचा तजेला जास्त काळ टिकून राहतो एका वर्षानंतर दरवर्षी एका चांगल्या झाडापासून सुमारे 25 ते 50 किलो शेंगा मिळतात.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:भले शाब्बास पोरी! शेतकरी बापाचा शेतात उभारला पुतळा; या लेकीवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
Share your comments