भारतातील शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणात पीक पद्धतीत बदल करीत आहेत. पीकपद्धतीत बदल केल्यामुळे शेतकरी बांधवांना चांगला फायदा देखील मिळत आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना पीकपद्धतीत बदल करण्याचा सल्ला देत असतात.
या अनुषंगाने आता शेतकरी बांधवांनी देखील बाजारात जे विकेल तेच पिकवू अशी नीती अंगीकारली आहे. यामुळे शेतकरी बांधवांना मोठा फायदा होत आहे. आज आपण ड्रॅगन फ्रुट शेती विषयी जाणून घेणार आहोत.
ड्रॅगन फ्रुट विषयी अल्पशी माहिती- ड्रॅगन फ्रूटचे वैज्ञानिक नाव हायलोसेरेसुंडॅटस आहे. ड्रॅगन फ्रुट प्रामुख्याने मलेशिया, थायलंड, फिलीपिन्स, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि व्हिएतनाम या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जाते. ड्रॅगन फ्रूटची लागवड योग्य नियोजन करून केल्यास बंपर कमाई होऊ शकते. एक एकर शेतीतून दरवर्षी लाखो रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. असं असले तरी सुरुवातीच्या काळात त्याच्या लागवडीसाठी चार-पाच लाख रुपये खर्च करावे लागतील.
ड्रॅगन फ्रुट शेती विषयी काही महत्त्वाच्या बाबी - ड्रॅगन फ्रुट या झाडापासून एका हंगामात किमान तीनदा उत्पादन घेता येणे शक्य असते. याच्या एका फळाचे वजन साधारणपणे 400 ग्रॅम पर्यंत असते. एका झाडाला किमान 50-60 फळे येतात. भारतात ड्रॅगन फ्रूटची किंमत 200 ते 250 रुपये प्रति किलो आहे.
अशा परिस्थितीत प्रत्येक झाडापासून तुम्ही 6 हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकता. शेतकरी मित्रांनो जर आपणास ड्रॅगन फ्रुट ची शेती करायची असेल तर 1 एकर जमिनीवर आपण किमान 1700 ड्रॅगन फळांची झाडे लावू शकता. याचा अर्थ असा की एक एकर जमिनीवर लागवड करून तुम्ही एका वर्षात सुमारे एक कोटी रुपये कमवू शकता. विशेष म्हणजे या रोपाची लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षापासूनच ड्रॅगन फ्रूट पासून उत्पादन मिळण्यास सुरुवात होईल.
ड्रॅगन फ्रुट ची शेती दुष्काळी भागात देखील करता येणे शक्य असते. एवढेच नाही जमिनीचा दर्जा देखील चांगला नसला तरी या फळाची वाढ चांगली होते. 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमानात ड्रॅगन फ्रूटची लागवड सहज करता येते. याच्या लागवडीसाठी जास्त सूर्यप्रकाश लागत नाही.
जर तुम्ही ड्रॅगन फळाची लागवड करण्याचा विचार करत असाल तर आपल्या शेतजमिनीच्या मातीचा 5.5 ते 7 pH यादरम्यान असावा. या पिकाची लागवड वालुकामय जमिनीत देखील करता येणे शक्य आहे. जमिनीत सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणात असतील तर अशी जमीन याच्या लागवडीसाठी उत्तम असल्याचे कृषी वैज्ञानिक सांगत असतात.
Share your comments