हळद ही एक बहुउपयोगी मसाला पीक म्हणून वापरले जाते. महाराष्ट्र राज्यातील हवामान हे हळद पिकासाठी चांगले आहे. अगदी हळदीच्या पूर्वमशागतीपासून ते हळद प्रक्रिया, हळद बियाणे साठवणूक करण्यापर्यंत हळद पिकाचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करता येते. सध्या हळद पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. जे की खांदनी करून काढलेले कंद २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापून द्यावेत. कंद तापले की त्यास पाणी सुटते आणि चिकटलेली माती निघून जाते. २ दिवसांनी कंदाची मोडणी करावी.
शास्त्रीय पद्धतीने काळजी घेणे गरजेचे:
कंदाचा गड्डा हळुवारपणे आपटला की त्यास चिकटलेली माती वेगळी होते. त्याचेवेळी जेठागड्डे, बगल गड्डे, सोरागड्डे, हळकुंडे व कीड-रोगग्रस्त हळकुंडे या कच्या मालाची प्रतवारी करावी. प्रतवारी केल्यानुसार विविध ठिकाणी मालाची साठवणूक करावी.हळदीच्या बेण्याची निवड करताना कीड तसेच रोगग्रस्त व अर्धवट कुजलेले गड्डे साठवणुकीमध्ये येणार नाहीत एवढी काळजी घ्यावी. तर जेठागड्डे, बगल गड्डे व हळकुंडे बियाणे लागवडीसाठी वापरली जातात. हळदीचे बियाणे निवडताना शास्त्रीय पद्धतीने काळजी घेणे गरजेचे आहे. निवडलेले बियाणे हे जातिवंत, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण तसेच सुप्तावस्था संपलेले, निरोगी, रसरशीत व चांगले असावेत जेणे उत्पादन चांगले भेटेल.
जेठागड्डा :-
१. हळदीच्या मुख्य रोपाच्या खाली जे कंद वाढते त्या कंदास जेठागड्डा किंवा
मातृकंद असे म्हणले जाते.
२. हळदीच्या कंदापासून मातृकंद वेगळे करावेत. निरोगी, चांगले, जाड मातृकंद बियाणे म्हणून निवडावेत.
३. बेण्यासाठी जे मातृकंद निवडले आहे त्याचे वजन ५० ग्रॅम असावे तसेच ते आकाराने त्रिकोणी असावे. काढणी झाल्यानंतर गड्डे लगेच सावलीमध्ये ठेवावेत.
बगल गड्डे :-
१. जेठागड्डाला आलेले जे फुटवे असतात त्याच्या खाली येणाऱ्या गड्याना बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे असे म्हणतात.
२. बगल गड्डे चे वजन हे ४० ग्रॅम असावे. या गड्ड्यांचा वापर हा बियाणे म्हणून करावा.
हळकुंडे :-
१. बगल गड्ड्यांना जे कंद येतात त्यांना हळकुंडे असे म्हणतात.
२. हळकुंडे बियांसाठी देखील वापरले जातात. जर मातृकंद कमी पडत असेल तर हळकुंडे बियाणे म्हणून वापरावीत.
३. जर तुम्ही हळकुंडे बियाणासाठी निवडले असतील तर त्याचे वजन ३० ग्रॅम असावे.
४. लांब, जाड, ठळक तसेच निरोगी हळकुंडे असावीत.
बेण्याची साठवणूक :
१. निवडलेले हळदीचे बेणे लगेच झाडाखाली सावलीत ठेवावे तसेच हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी नाहीत उगवणीवर परिणाम होईल.
२. बेण्याचा ढीग हा कोण पद्धतीने करावा.
३. या ढिगावर हळदीच्या वाळलेल्या पानाचा १० ते १५ सेमी जाडीचा थर द्यावा.
४. जास्त तापमान असेल तर हळदीच्या वाळलेल्या पाल्यावर ओले गोणपाट टाकावे.
५. दोन ते अडीच महिने बेणे सुपतावस्थेत जाते. त्यानंतर अंतर्गत बदल तसेच शरीरक्रिया घडून येते. सुप्तावस्था संपेपर्यंत बेण्यावर पाणी शिंपडू नये.
६. सुप्तावस्था संपताच बेण्यामध्ये बदल दिसायला सुरुवात होते जे की बेण्यावरील डोळे फुगीर होतात, डोळे फुटण्यास सुरुवात होते. त्यानंतर बेणे निवडावेत. बेण्यावरील मुळ्या काढाव्यात तसेच पानांचे शिल्लक राहिलेले अवशेष देखील काढावेत आणि मुळ्या विरहित रसरशीत निरोगी बेणे लागवड करण्यासाठी वापराव्यात.
७. निवडलेल्या बेण्यात कंदकुज रोग तसेच कंदमाशीचे कोणतेही अवशेष राहिले नाही ना याची खात्री करणे आवश्यक आहे. म्हणजे लागवड केल्यानंतर त्यावर रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव होणार नाही.
८. लागवड करण्याआधी तुमच्याकडे वेळ असेल तर दिवसातून दोन वेळा बेण्याच्या ढिगावर पाणी शिंपडावे. पाणी शिंपडले की बेण्याची एकसारखी उगवण होते.
९. बेणे सूर्यप्रकाशाच्या किंवा उष्णतेच्या संपर्कात येणार नाहीत ही काळजी घ्यावी. जर बेणे दर्जदार असेल तर उत्पादन वाढीसाठी मदत होते.
Share your comments