देशात अनेक शेतकरी बांधव सध्या भाजीपाला लागवडिकडे जास्त वळताना दिसत आहेत, याचे मुख्य कारण म्हणजे भाजीपाला पीक कमी कालावधीत तयार होते शिवाय याची मागणी बाजारात सदैव बनलेली असते. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला पिकातून चांगली मोठी कमाई होते. यामुळे राज्यातील अनेक शेतकरी भाजीपाला पिकांची जास्त प्रमाणात लागवड करताना दिसत आहेत. अनेक शेतकरी शेती क्षेत्रात नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी बांधव आता चांगल्या दर्जाचा भाजीपाला पिकवित आहेत.
राज्यातील बहुतांश शेतकरी भाजीपाला परदेशी निर्यात करण्याचा विचार करतात, मात्र यासाठी लागणारा आटापिटा व कागदपत्रांची व्यवस्थित माहिती नसल्याने या शेतकऱ्यांसाठी ते शक्य होत नाही. भाजीपाला जर परदेशात निर्यात झाला तर त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढते, परंतु निर्यात करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता भासते आत्ता पण भाजीपाला निर्यात करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.
शेतमाल निर्यात करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट खालीलप्रमाणे
- आयात निर्यात परवाना
शेतकरी मित्रांनो जर आपणास आपला शेतमाल परदेशात निर्यात करायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे आयात निर्यात परवाना असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपणास हा परवाना काढावा लागेल.
शेतकरी मित्रांनो आयात निर्यात परवाना काढण्यासाठी देखील काही कागदपत्रांची आवश्यकता भासते. हा परवाना काढण्यासाठी आयात-निर्यात संस्था नोंदणी पत्र, भारत सरकारच्या आयकर विभागाकडून मिळालेल्या खाते क्रमांक, ज्या व्यक्तीस परवाना काढायचा आहे त्या व्यक्तीचे पासपोर्ट साईज फोटो, सहसंचालक विदेशी व्यापार यांच्या नावे असलेला डिमांड ड्राफ्ट, A4 आकाराचे पॉकेट, तीस रुपयाचा पोस्टल स्टॅम्प ही कागदपत्रे लागतात.
- शेतमाल सुरक्षित आहे या संबंधी हमीपत्र
शेतकरी मित्रांनो जर आपणास विदेशात आपला शेतमाल निर्यात करायचा असेल तर दुसरे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे शेतमाल सुरक्षित आहे या संबंधित असलेले हमीपत्र. आताही हमीपत्र काढण्यासाठी देखील आपणास काही कागदपत्रांची आवश्यकता भासेल. शेतीमाल सुरक्षित हमीपत्र काढण्यासाठीआरोग्यविषयक प्रमाणपत्र, पॅक हाऊस प्रमाणपत्र, सॅनेटरी प्रमाणपत्र, ग्लोबल गॅप प्रमाणपत्र,इत्यादी कागदपत्रे लागतात. (संदर्भ-किसान राज)
Share your comments