1. कृषीपीडिया

तूर भरघोस उत्पन्न घ्यायचे आहे ? वाचा हि अत्यंत महत्त्वाची माहिती

कोरडवाहू क्षेत्रात तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
तूर भरघोस उत्पन्न घ्यायचे आहे ? वाचा हि अत्यंत महत्त्वाची माहिती

तूर भरघोस उत्पन्न घ्यायचे आहे ? वाचा हि अत्यंत महत्त्वाची माहिती

कोरडवाहू क्षेत्रात तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. हे पीक पाण्यासाठी अतिसंवेदनशील आहे. जमिनीतील कमी ओल व फुले लागल्यानंतर पाण्याचा ताण बसल्यास या पिकात मोठ्या प्रमाणात फूलगळ होते. तुरीला गरजेनुसार, पीकवाढीच्या अवस्थेनुसार पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या दृष्टीने

ठिबक सिंचनाद्वारे तूर पिकात पाणी व्यवस्थापन करणे फायदेशीर आहे.Water management in tur crop through drip irrigation is beneficial.पाणी व्यवस्थापनासोबतच विद्राव्य रासायनिक खतांचे नियोजन उपयुक्त ठरते. ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खते दिल्यास त्यांची कार्यक्षमता ९५ टक्क्यांपर्यंत वाढते. तसेच २५ टक्क्यांपर्यंत त्यांच्यात बचत होऊन उत्पादनात वाढ

होते. तुरीचे अधिक उत्पादन व रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे तूर पिकास शिफारसीच्या १२५ टक्के नत्र (१२.५ किलो/ एकर), १०० टक्के स्फुरद (२० किलो/ एकर फॉस्फोरिक आम्लाच्या माध्यमातून) आणि १०० टक्के पालाश (१२ किलो/ एकर) पाच वेळा विभागून द्यावे.

खतमात्रा आणि कालावधी१० टक्के शिफारशीत नत्र, स्फुरद व पालाश - पेरणीच्या वेळी२० टक्के शिफारशीत नत्र, स्फुरद व पालाश - पेरणीनंतर ४० दिवसांनी२० टक्के शिफारशीत नत्र, स्फुरद व पालाश - पेरणीनंतर ६० दिवसांनी२५ टक्के शिफारशीत नत्र, स्फुरद व पालाश - पेरणीनंतर ८० दिवसांनी२५ टक्के शिफारशीत नत्र, स्फुरद व पालाश - पेरणीनंतर १०० दिवसांनी

English Summary: Do you want to earn a lot of income? Read this very important information Published on: 10 August 2022, 01:00 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters