त्यामध्ये चालू व भविष्यकालीन पिढीला शाश्वत जीवन देणे हा सामाजिक जबाबदारीचा हेतू आहे.म्हणून संशोधन, विकास या बाबींना प्राधान्य देऊन सामाजिक बांधीलकी जोपासणेही तितकेच आवश्यक आहे.म्हणूनच भविष्यकाळात जगामध्ये पर्यावरणीय व आर्थिक अशा दुहेरी हेतूने सेंद्रिय शेतीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्यास वाव आहे.सद्य परिस्थिति सध्याच्या व्यापार केंद्रित शेती व्यवस्थेमुळे शेतीत रासायनिक खते, किटकनाशके,रासायनिक बुरशीनाशके,व तणनाशके या सर्वांचा प्रामाणापेक्षा
अधिक होणारा वापर व त्यामुळे वाढत चाललेले तापमान व घटत चाललेली जमिनीची सुपीकता तसेच माती व पाणी यांचे वाढत असनारे प्रदूषण इ. चा विचार केला असता एकंदरीत ह्या मधून संपूर्ण पृथ्वीवरील सजीवसृष्टीला(मानव ,प्राणी,वनस्पती) जैवविविधतेला धोक्याची पूर्वसूचना प्राप्त होत आहे.म्हणून पुन्हा रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेती ही शाश्वत स्वरूपाची व कायमस्वरूपी उत्पन्न मिळवुन देणारी शेतीची उत्तम पद्धती आहे हे सर्वमान्य होत आहे.युरोपीय आणि पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये शेतक-यांनी किती रासायनिक खते, कीटकनाशके वापरावीत,
यावर मोठे बंधन आहे. या बंधनाच्या पलीकडे जाऊन शेतक-यांनी खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर केल्यास तो भाजीपाला युरोपीय देशांमध्ये नाकारला जातो. भारतीय शेतक-यांच्या शेतमालाला जो न्याय लावला जातो तोच न्याय युरोपातील देश आपल्या देशातील शेतक-यांनाही लावतात.रासायनिक शेतीचे दुष्परिणाम अन्नधान्याचे, भाजीपाल्याचे आणि फळांचे उत्पादन वाढवण्यासाठी वापरल्या जात असलेल्या खतांमुळे आणि औषधांमुळे मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालेला आहे. गेल्या वर्षात कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण पाहिल्यावर रासायनिक खतांच्या
आणि कीटकनाशकांच्या अति वापराचे दुष्परीणाम दिसू लागले आहेत, असे म्हणता येईल. भाजीपाला, अन्नधान्ये, फळे यांच्यांमुळे खते आणि कीटकनाशकांमधील घातक पदार्थाचे अंश शरीरात शिरल्यावर त्याचे परिणाम असे होत आहेत.म्हणूनच वरील सर्व गोष्टींचा विचार केला असता असे दिसून येते कि,खरोखर आपले पूर्वज ज्या सेंद्रिय शेती पद्धतीतून दर्जेदार उत्पादन घेऊन निसर्गाचा समतोल राखून सुखी जीवनाचा अवलंब करत होते.तसेच सुखी व रोगमुक्त जीवन जगण्यासाठी पुन्हा एकदा सेंद्रिय शेती कडे वळण्याची गरज वाटते आहे.
अधिक माहितीसाठी
संपर्क- 9767473439
Share your comments