कुठल्याही मालाचे मार्केटिंग ही त्याच्या व्यवसायातील यशासाठी आवश्यक असणारी गोष्ट आहे.तुम्ही तयार केलेले प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोचवणे हे फार जिकीरीचे काम असते परंतु आपल्या उत्पादनाची योग्य प्रकारे मार्केटिंग जर केली तर निश्चितच फायदा होतो.
मार्केटिंग मध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले प्रॉडक्ट इतर प्रोडक्ट पेक्षा कसे वेगळे आहे किंवा त्याचा फायदा ग्राहकांना कोणत्या प्रकारे होणार आहे.या सगळ्या गोष्टी ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी मार्केटिंग हा एक पर्याय आहे. मार्केटिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साधनाचा वापर केला जातो. परंतु या सगळ्या साधनांमधून शेतमालाची मार्केटिंग तुम्हाला करायचे असेल तर त्यासाठी सोशल मीडियाचा वापर हा प्रभावी ठरू शकतो. या लेखात आपण शेतमालाच्या मार्केटिंगसाठी युट्युब आणि फेसबूक या सोशल मीडिया साधनांचा वापर कसा करावा हे पाहू.
अशा पद्धतीने करा कृषिमालाच्या मार्केटिंगसाठी सोशल मीडियाचा वापर..
फेसबूक- कृषिमालाच्या मार्केटिंगसाठी जर तुम्हाला सोशल मीडिया मधील फेसबुकचा वापर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला फेसबुक वर माहिती टाकता तुमचे उत्पादन व त्या संबंधित महत्त्वाच्या पोस्ट जसे की त्यामध्ये कोणत्या प्रकारची पोषणमूल्य आहेत हे सांगणे फार महत्वाचे आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगला ब्लॉग तयार करून तुमच्या प्रॉडक्ट लोकांच्या कशा प्रकारे उपयोगी पडू शकते ते सांगायचे. जर तुम्हाला एखादा व्हिडिओ टाकायचा असेल तर इन्फोग्राफिक चा योग्य वापर करून आकर्षक असा व्हिडिओ मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेत करून तुम्ही टाकू शकतात. तसेच चांगल्या प्रकारच्या इमेजेस तयार करून त्या देखील ग्राहकांना आकर्षित करतात.
- बऱ्याचदा आपल्या प्रॉडक्ट विषयी माहिती देतांना ती एवढ्या मोठ्या विस्तारात लिहिली जाते की त्यामध्ये महत्त्वाचे माहितीच ग्राहकांना दिसत नाही त्यामुळे लोक अशा प्रकारचे मजकूर पाहत नाहीत किंवा वाचत नाहीत. त्यामुळे सोशल मीडिया मार्केटिंग करण्यासाठी तरुण मुलांचा समावेश करणे फार महत्त्वाचे आहे. अशा मार्केटिंगसाठी या मुलांना कन्टेन्ट लिहिण्याची कला अवगत आहे अशी क्रिएटिव मुलं तसेच ग्राफिक डिझाईनिंग चांगल्या पद्धतीने करता येते आणि सोशल मीडियावर जास्तीत जास्त वेळ घालवणे आवडते. अशा मुलांचीमदतसोशल मीडिया मार्केटिंग साठी घ्यावी.
युट्युब-
- हल्ली बरेच यूट्यूब चैनल बघतो. वेगवेगळ्या व्यक्ती वेगळ्या विषयांवर व्हिडिओ तयार करतात व टाकत असतात. आपण आपले शेतमालाच्या प्रभावी मार्केटिंगसाठी असे व्हिडिओ तयार करून टाकू शकतो परंतु त्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे फार महत्त्वाचे असते.
- युट्युब वर व्हिडिओ टाकताना तो आठ ते दहा मिनिटांपेक्षा जास्त कालावधीचा नसावा.
- व्हिडिओ मधील आवाज आणि मजकूर हा स्पष्ट ऐकायला येईल असा असावा.
- आपल्या उत्पादनाचे शूटिंग हे व्यवस्थित आणि चांगले असावे.
- बाजूला शब्दांकन येत असेल तरी ते चालू शकते.
- बोलणारी व्यक्ती ही प्रभावशाली असावी.
- व्हिडिओ मध्ये प्रोडक्टची माहिती, गुणवत्ता, मदनाची वेगळेपण, दर्जेदारपणा,पोषणमूल्ये आणि होणारे फायदे अधोरेखित करावे.
- यासाठी तुम्ही तयार केलेला कन्टेन्ट विशेष लक्ष देणे गरजेचे असते.
- त्यासोबतच व्यवस्थित इमेजेस,हॅशटॅग, कॅप्शन आणि लिंक व्यवस्थित टाकले गरजेचे आहे.
- सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये कंटेंट आणि ग्राफिक्स या गोष्टी खूप महत्त्वाच्या भूमिका पार पाडतात त्यामुळे यावर बारकाईने लक्ष ठेवावे.
Share your comments