कोणताही विषाणू सजीव वस्तू च्या संपर्कात येताच सक्रिय होतात.इतर वेळी ते निर्जीव अवस्थेत किंवा सुप्तावस्थेत असतात.
विषाणूचा वनस्पतीमध्ये शिरकाव कसा होतो?
वनस्पतीला शेती अवजारांद्वारे झालेल्या इजामधून किंवा रसशोषक किडीच्याद्वारे केल्या गेलेल्या पंक्चर मधून, इतर कोणत्याही कारणामुळे वनस्पतीवरील आघातामुळे विषाणूंचा वनस्पतीच्या शरीरात शिरकाव होतो.
प्रसरण:-
एकदा पिकामध्ये शिरकाव झाल्यानंतर विषाणू त्यांचं प्रसरण स्वतःहून करु शकत नाहीत,तर ते होते अनेक रसशोषक किडींच्या माध्यमातुन.उदा.पांढरी माशी,फुलकिडे,मावा,तुडतुडे.जर एक झाड विषाणूजन्य रोगास बळी पडले,आणि त्याच बरोबर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव असेल तर रोग पूर्ण शेतात खूप वेगाने पसरतो. कारण एकदा विषाणूग्रस्त झाडातील रस किडींनी शोषला तर विषाणूचे अंश त्यामध्ये येतात.आणि जेव्हा तो रसशोषक कीट निरोगी झाडातील रस शोषतो त्याच वेळी विषाणू चा शिरकावं त्या झाडांमध्ये होतो
हे सर्व काही 60 ते 70 सेकंदात घडते.असे हजारो कीटक शेतामध्ये असतात.त्यामळे यांचं प्रसारण भरपूर वेगाने होते. रसशोषक किडी(मावा,तुडतुडे,फुलकिडे,पांढरी माशी इ. ) या विषाणूजन्य रोगांचे वाहक(vector) म्हणून काम करतात.
लक्षणे:
कोणत्याही विषाणूजन्य रोगाची लक्षणे ही झाडाच्या वरील भागात मुख्यतः पानांवर दिसतात. पानांच्या कडा आखडायला सुरवात होते,शेंडा व कोवळी पाने सुरकुतून जातात. फळधारणा कमी होते,झाल्यास मिरच्या वाकड्या जन्माला येतात. शेतीमालाची प्रत खराब होऊन परिणामी भाव कमी होतो.सर्वात मुख्य आणि लवकर दिसणारे लक्षण म्हणजे पाने आखडून जाणे.
एकात्मिक रोग व्यवस्थापन:-
कोणत्याही पीकाची लागवड करण्याआधी त्यामध्ये येणाऱ्या विषाणूजन्य रोगांचा थोडा अभ्यास करावा.सदर पिकाची त्या विषाणूसाठी रोगप्रतिकारक वाण उपलब्ध असेल तर त्याचीच लागवडीसाठी निवड करावी.जसे सुरजमुखी,जपानी लॉंग,पुसा ज्वाला शेत नेहमी तण विरहित ठेवावे,जेणेकरून रसशोषक किडीना इतरत्र लपण्यास जागा मिळणार नाही.
लागवड केल्यानंतर पहिल्या आठवड्यातच एकरी 30 ते 40 पिवळे व निळे चिकट सापळे लावून घ्यावेत.3 पिवळ्या सापळ्यामध्ये एक निळा या प्रमाणात लावून घ्यावेत.यामुळे रसशोषक किडीची संख्या कमी होईल व रोग प्रसारणास आळा बसेल.
पिवळ्या चिकट सापळ्यास आकर्षित होणारे कीटक:- मावा,पांढरी माशी,तुडतुडे इतर रसशोषक किडी.
निळ्या चिकट सापळ्यास आकर्षित होणारे कीटक:- फुलकिडे(थ्रीप्स),नागअळी,चौकोनी ठिपक्यांचे पतंग
पहिली फवारणीचा ही निम तेलाची असावी.पानावरील कडवट थरामुळे रसशोषक किडींवर मोठ्या प्रमानात पिकापासून परावर्तित होतात.
पिकास योग्य खते योग्य वेळी द्यावीत.नत्रयुक्त खताचा अतिवापर कटाक्षाने टाळावा कारण त्यामुळे झाड कोवळे होते. हाच कोवळापणा किडींना आवडतो व त्या मोठ्या प्रमाणात शेतावर येतात.म्हणूनच नत्रयुक्त खतांचा वापर संतुलित ठेवावा.
यातूनही एखाद्या झाडावर विषाणूजन्य रोगाची लक्षणे दिसू लागताच ते झाड शेताबाहेर नष्ट करावे. पिकामध्ये रसशोषक किडीचे प्रमाण पाहून योग्य आंतरप्रवाही कीटकनाशके जसे इमिडोक्लोप्रिड, थायोमिथोक्सिम फवारणीसाठी निवडावे. एकात्मिक पद्धतीने कीटकनाशकांचा कमीतकमी वापर करून पर्यावरण पूरक व्यवस्थापन करावे.
Share your comments