वांग्याचे मूळ स्थान भारत असून, भारतातील बहुतेक राज्यांमध्ये वांग्याची लागवड केली जाते. सन 2007 -08 या वर्षात वांगी पिकाखाली सुमारे 5.66 लाख हेक्टर क्षेत्र तरी उत्पादन 9595.8 मेट्रिक टन तर उत्पादकता 16.9टन प्रति हेक्टर होती.भारतात प्रामुख्याने पश्चिम बंगाल, ओरिसा,बिहार,गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यात वांग्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
महाराष्ट्र मध्ये विविध भागांमध्ये आवडीनुसार वांग्याच्या विविध जाती आहेत.सांगली, सातारा भागात कृष्णाकाठची वांगी प्रसिद्ध आहेत.अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याचा विचार केला तर या भागांमध्ये काटेरी किंवा डोरली वांगी जास्त पसंत केली जातात. वांगी हे नगदी पीक आहे. परंतु महत्त्वपूर्ण अशा या पिकावर कीड आणि रोगांचे नियंत्रण करणे फार महत्त्वाचे असते. या लेखाचा पण वांगी पिकावरील महत्वाचे कीडव त्यांच्या नियंत्रणासाठी करायचे उपाय याबद्दल माहिती घेऊ.
वांगी पिकावरील किड व रोग नियंत्रण
वांग्यावरील लाल कोळी च्या नियंत्रणासाठी उपाय-
- पाच टक्के निंबोळी पावडर अर्काची फवारणी नियंत्रित करावी.
- 20 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे.माती परीक्षणानुसार खते द्यावीत.
वांग्यावरील फळ पोखरणारी अळी चे नियंत्रण
या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तिखट पांढऱ्या रंगाच्या या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात आणि त्यामुळे झाडाची शेंडे वाढूनझाडाची वाढ खुंटते. फळे लहान असतांना अळी देठाजवळुन फळात शिरुन फळाचे नुकसान करते.
या अळी चे नियंत्रण
1-आळी ग्रस्त शेंडे काढून टाकावेत.
- फवारणीसाठी क्लोरोपायरीफॉस 17 मिलीप्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यानंतर निंबोळी अर्क 5% ची ( निंबोळी पावडर पाच किलो प्रति 100 लिटर पाणी याप्रमाणे भिजवून अर्क काढून घ्यावा ) फवारणी करावी. त्यानंतर डेमीथोयेट15 मिली +नुवान आठ मिलीप्रति दहा लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. त्यानंतर निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी.
- सूक्ष्म अन्नद्रव्ये दोन लिटर प्रति 300 लिटर पाणी याप्रमाणे 20 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
- डीएपी 0.5 टक्के व 13:0:45 हे खत 0.5 टक्के च्या आठ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
- जमिनीतून झिंक सल्फेट फेरस सल्फेट, मॅग्नीज सल्फेट दहा किलो प्रत्येकी व बोरॅक्स दोन किलो प्रती एकर याप्रमाणे शेणखताबरोबर द्यावे.
- लैगिक गंध सापळे पाच प्रति अर्धा एकर प्रमाणे लावावेत. त्यातील गोळी दर पंधरा दिवसांनी बदलावी.
- प्रकाश सापळे एक प्रति अर्धा एकर क्षेत्रात लावावा.
- जिवाणू खते अझोटोबॅक्टर दोन किलो+ पीएसबी दोन किलो + शेणखत मिसळून जमिनीतून द्यावे.
वांगी पिकातील बुरशीजन्य रोगाची एकात्मिक रोग व्यवस्थापन
- रोगाचा प्रादुर्भाव झालेली रोगग्रस्त पाने सडलेले,किडके फळे गोळा करून बांधावर किंवा प्लॉट शेजारी उघड्यावर न टाकता जाळून नष्ट करावीत.
- पानांवरील करपा, फळकुज,पानांवरील ठिपके आणि भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी बाविस्तीन दहा ग्रॅम अथवा डायथेन एम-4525 ग्रॅम या पैकी एक औषध, परंतु आलटून-पालटून दहा लिटर पाण्यात मिसळून तीन फवारण्या 15 दिवसांच्या अंतराने घ्याव्यात.
- भुरीसाठी पाण्यात विरघळणारे गंधक 25 ग्रॅम वरील औषधात मिसळून फवारणी करावी.
- जमिनीतील बुरशीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचा वापर केला नसल्यास लागवडीनंतर किंवा रोगाची लक्षणे दिसताच बाविस्तीन दहा ग्रॅम बुरशीनाशक दहा लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावण साधारणतः 50 ते 100 मिली झाडाच्या बुंध्याभोवती रिंग करून 15 दिवसांच्या अंतराने दोनदा ओतावे.
मावा, तुडतुडे या खेळांच्या नियंत्रणासाठी
मावा, तुडतुडे किडी व रोग नियंत्रणासाठी रोगर 10 मिली किंवा क्विनॉलफॉस 20 मिली किंवा कार्बारील 20 ग्रॅम यापैकी एक औषध बदलून दहा लिटर पाण्यातून फवारावे.निंबोळी पावडर अर्काची फवारणी करावी.
Share your comments