भारतात येत्या काही दिवसात हिवाळा सुरु होणार आहे आणि हिवाळ्यात आपल्याकडे सर्वात जास्त मागणी असते भाजीपालाची. अशाच भाजीपाला पिकांपैकी एक म्हणजे कोबी आणि फ्लॉवरचे पिक. हिवाळा हंगामात भारतीय बाजारात कोबी आणि फ्लॉवरची आवक खुप मोठ्या प्रमाणात वाढते. संपूर्ण हिवाळाभर कोबी आणि फ्लॉवरची मागणी बनलेली असते. त्यामुळे ह्या भाजीपाला पिकांची लागवड शेतकऱ्यांसाठी चांगलीच फायदेशीर ठरते. आणि शेतकऱ्यांना ह्या पिकापासून कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळते.
म्हणुन भारतात तसेच आपल्या महाराष्ट्रात शेतकरी फ्लॉवर व कोबी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. पण फ्लॉवर व कोबी ह्या पिकात काही खतरनाक किडी अटॅक करतात व पिकाला मोठ्या प्रमाणात क्षती पोहचवितात. वेळीच ह्या किडीवर नियंत्रण केले गेले तर नुकसान कमी होते. आज आपण कोबी व फ्लॉवर ह्या पिकात लागणाऱ्या किडीविषयी जाणुन घेणार आहोत तसेच त्यांच नियंत्रण कसे करावे ह्याविषयीं जाणुन घेणार आहोत.
कोबी व फ्लॉवर पिकावर अटॅक करणाऱ्या किडी व त्यावर नियंत्रण
»डायमंड बैक मोथ (Plutella xylostella)
वयस्कर पतंगात, वरच्या दोन्ही पंखांच्या मागच्या बाजूला तीन हिऱ्याच्या आकाराचे पिवळे डाग दिसतात, म्हणूनच ह्या अळीला 'डायमंड बॅक मॉथ' हे नाव पडले असावे.
लक्षणे
ह्या जातीच्या अळी पाने चावून खातात, ज्यामुळे पानांवर पांढरे डाग पडतात. ह्या जातीच्या अळ्या पानांमध्ये लहान छिद्रे बनवतात. ह्या किडिंचा प्रभाव हा पानावरच जास्त असतो.
नियंत्रण
- डायमंड बॅक मॉथच्या प्रभावी नियंत्रण साठी बॅसिलस थ्रुजायेंसीस 5% डब्ल्यूपी 1 मिली/लिटर पाणी ह्या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. ह्यामुळे ह्या किडीचा प्रभाव कमी करता येतो.
- कोबी पिकावर अटॅक करणाऱ्या डायमंड बॅक मोथ (DBM) ह्या किडीवर नियंत्रण करण्यासाठी फेरोमोन 5 ट्रॅप प्रति हेक्टर ह्या प्रमाणे सेट करा. ह्या अळीच्या नियंत्रणासाठी हा एक प्रभावी मार्ग आहे.
- कोबीच्या डायमंडबॅक मोथच्या नियंत्रणासाठी कडुलिंबाचे तेल (1500 पीपीएम) 5 मिली/लिटर पाण्यात फवारणी करा. ह्यामुळे देखील ह्या किडीवर प्रभावी नियंत्रण करता येते.
»तंबाखू अळी (स्पोडोप्टेरा लिटूरा)
स्पोडोप्टेरा लिटूरा ही अळी तपकिरी ते गडद हिरव्या रंगाची असते आणि त्यांच्या शरीराच्या बाजूंना खोल रेखांशाचे पट्ट्यासारखे पट्टे असतात. प्रौढ कीटक तपकिरी रंगाचे असतात आणि वरच्या पंखांवर लहरी पांढऱ्या खुणा आढळतात, नवजात अळ्या/लारवा कळपात राहतात.
लक्षणे
ह्या अळी पानांचे हिरवे पदार्थ काढून टाकतात आणि नंतरच्या टप्प्यावर कोवळ्या पानांवर एपिडर्मिस सोडून पाने खातात, ज्यामुळे पाने पांढरी होतात. ह्या किडिंमुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते आणि परिणामी उत्पादनात घट घडून येते.
नियंत्रण
- तंबाखू अळीवर (स्पोडोप्टेरा लिटूरा) नियंत्रण ठेवण्यासाठी प्रारंभीच्या टप्प्यात (प्रत्यारोपणानंतर 18-25 दिवसांनी) NSKE 5% ह्या औषधाची फवारणी करावी. 10-15 दिवसांच्या अंतराने प्रति कोबी कीटकांची संख्या दोनपेक्षा जास्त असल्यास ही फवारणी पुन्हा करा. कोबीच्या एका पिकाच्या कालावधीत जास्तीत जास्त 3-4 NSKE च्या फवारण्या आवश्यक असतात असे सांगितलं जात.
- तंबाखू अळीच्या (स्पोडोप्टेरा लिटूरा) अंडे आणि अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात जेणेकरून ह्यांचा प्रकोप वाढणार नाही आणि पिकाची क्षती होणार नाही.
- तंबाखू अळीच्या (स्पोडोप्टेरा लिटूरा) नियंत्रणासाठी, सायंट्रॅनिलिप्रोल 10.26 OD ची आवश्यकता असल्यास 1.2 मिली प्रति लिटर दराने फवारणी करावी किंवा कार्बरील 5 डीपी @ 20 किलो/हेक्टर लावावे ह्यामुळे ह्या किडीवर नियंत्रण मिळवता येते.
Share your comments