1. कृषीपीडिया

वाटाण्याची लागवड करून तुम्हीही घेऊ शकता चांगले उत्पादन. जाणुन घ्या वाटाण्याच्या काही सुधारित जाती

भारतात आता युवा शेतकरी बांधव पदार्पण करत आहेत, आणि हे युवा शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहेत. शेतकरी मित्रांनो कुठलेही पिक घ्यायचे असल्यास तर आधी जमिनीचा पीएच जाणुन घ्यावा, माती परीक्षण करावे, पाणीचा पीएच मेन्टेन आहे की नाही बघावा ह्या सर्व्या गोष्टींची खातरजमा जर केली तर नक्कीच शेतीतुन शेतकरी बांधव चांगली कमाई करतील आणि आपला उदरनिर्वाह भागवतील.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
pea crop

pea crop

भारतात आता युवा शेतकरी बांधव पदार्पण करत आहेत, आणि हे युवा शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहेत. शेतकरी मित्रांनो कुठलेही पिक घ्यायचे असल्यास तर आधी जमिनीचा पीएच जाणुन घ्यावा, माती परीक्षण करावे, पाणीचा पीएच मेन्टेन आहे की नाही बघावा ह्या सर्व्या गोष्टींची खातरजमा जर केली तर नक्कीच शेतीतुन शेतकरी बांधव चांगली कमाई करतील आणि आपला उदरनिर्वाह भागवतील.

मित्रांनो आम्ही आपणांस नेहमी विविध पिकांविषयी माहिती देत असतो, नेहमीप्रमाणे आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत वाटाण्याविषयीं माहिती.

 अल्पशी माहिती वाटाणा पिकाविषयीं

शेतकऱ्यांसाठी वाटाणा लागवड हा एक चांगला पर्याय आहे. कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी शेतकरी वाटाण्याची लागवड करू शकतात. उत्तर भारतात, पावसाळी हंगाम संपल्यानंतर शेतकरी त्याची लागवड करतात.  अशा परिस्थितीत वाटाणा लागवडीची तयारी करण्याची ही योग्य वेळ आहे. पावसाळा आता संपणार आहे. शेतकरी आता वाटाणा आणि मोहरीसारख्या पिकांच्या लागवडीची तयारी सुरू करतील.

पावसाळ्यानंतर आणि हिवाळा सुरू होण्यापूर्वीचा काळ हा वाटाणा लागवडीसाठी सर्वात योग्य काळ मानला जातो.  त्याच वेळी, शेतात पुरेसा ओलावा असतो आणि वाटण्याचे पीक अशा हवामाणात चांगले येते. वाटाण्याला हॉटेल्समध्ये खुप मोठ्या प्रमाणात मागणी असते, वाटाणा हा विविध खाद्यपदार्थात वापरला जातो त्यामुळे नेहमीच वाटाण्याची मागणी असते.

 वाटाणा पिकासाठी खत व्यवस्थापन

वाटाणा पेरण्यापूर्वी, शेतात किमान दोनदा नागरणी करावी जेणेकरून माती चांगली भुसभूशीत होईल. नांगरणीच्या वेळी शेतात चांगले जुने शेणखत घालावे. सुमारे दोन महिन्यांनी वटण्याच्या झाडाला शेंगा दिसू लागतात आणि शेंगा लागल्यानंतर एक महिन्यानी वाटण्यापासून शेतकऱ्यांना उत्पादन मिळू लागते.

वाटाण्याची पेरणी कधी?

वाटाणा पेरणी ऑक्टोबरमध्ये कधीही करता येते आणि काही-काही भागात तर नोव्हेंबर महिन्यातही वाटाणा पेरता येतो. पण हे लक्षात ठेवा की शेतात ओलावा असावा आणि पाऊस पडणार नाही अशा वेळेस त्याची पेरणी करावी.  पेरणीनंतर पाऊस पडला तर माती कडक होते आणि रोपे जमिनीबाहेर पाडण्यासाठी अडचण होते, पाण्यामुळे रोपे थापडली जातात आणि साहजिकच त्यामुळे उत्पादनात घट होते.  आणि पाणी पडला, त्यामुळे शेतात जर पाणी साचले तर पेरलेले बियाणेही सडू शकते.

बियाणे अंकुरणासाठी सरासरी 22 °C तापमान आवश्यक असते. आणि, 10 ते 18 अंश सेल्सिअस तापमान वाटाण्याच्या चांगल्या वाढीसाठी योग्य असल्याचे सांगितलं जातं.

 वाटाणा पिकासाठी पाणी व्यवस्थापन

या पिकाला विशेष अशी पाण्याची गरज नसते कारण हिवाळ्यात ह्याची पेरणी होते आणि ह्या हंगामात शेतात पुरेसा ओलावा असतो.

जर तुम्हाला पाणी भरायचे असेल तर फुल येण्याच्या वेळी आणि शेंगा तयार होण्याच्या वेळी पाणी द्या. लक्षात ठेवा की पाणी कमी प्रमाणात द्या आणि शेतात पाणी साचून राहणार नाही ह्याची काळजी घ्या.

 वाटाण्याच्या काही सुधारित जाती जाणुन घेऊया

अधिक उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी बांधव वाटाण्याच्या काही सुधारित जाती निवडू शकतात. कृषी तज्ज्ञांच्या मते, शेतकऱ्याने वाण निवडताना माती, हवामान आणि प्रदेश लक्षात घ्यावा. वाटाण्याच्या काही सुधारित जाती म्हणजे आर्केल, काशी शक्ती, पंत मटर 155, अर्ली बॅजर, आझाद मटर 1, काशी नंदिनी, पुसा प्रगती आणि जवाहर मटर 1.  याशिवाय, जवाहर मटार- 3 आणि 4 चीही लागवड चांगली ठरते.

 

English Summary: devolope pea species and cultivation process Published on: 19 September 2021, 11:01 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters