नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका महत्वपूर्ण पिकाविषयीं बोलणार आहोत. आज आपण बाजरीच्या नवीन विकसित केल्या गेलेल्या जातीविषयी आपणांस अवगत करणार आहोत. ही नव्याने विकसित केलेली बाजरीची वाण हरियाणा मध्ये तयार केली गेली आहे परंतु ती फक्त हरियाणासाठीच नाही तर पूर्ण भारतासाठी वरदान ठरणार आहे. शेतकरी बांधवानो ही नवीन वाण तुमच्या उत्पादनात भरच घालणार आहे.
कोणी केली बाजरीची नवी प्रजाती विकसित?
चौधरी चरण सिंह हरियाणा कृषी विद्यापीठाने (HAU) विकसित केलेल्या बाजरीच्या सुधारित जाती आता केवळ हरियाणाच नव्हे तर देशातील इतर राज्यांमध्येही आपला ठसा उमटवतील. या जातीमध्ये इतरांपेक्षा अधिक खनिजे आहेत. या जातीमध्ये जास्तीचे उत्पादन क्षमता आहे आणि ह्या जाती रोग प्रतिरोधक देखील आहेत. यासाठी विद्यापीठाने सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत तांत्रिक व्यापारीकरणाला प्रोत्साहन देत दक्षिण भारतातील तीन आघाडीच्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले आहेत.
विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक बी आर कांबोज म्हणाले की, जोपर्यंत विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही, तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही. म्हणून, अशा करारांवर स्वाक्षरी करून, विद्यापीठाचा प्रयत्न आहे की येथून विकसित केलेली प्रगत वाण आणि तंत्र अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहचू शकतात. यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्न करत आहे.
कराराअंतर्गत, कंपन्या विद्यापीठाने विकसित केलेल्या HHB 67 सुधारित, HHB 299 आणि HHB 311 या बाजरीच्या जातींचे बियाणे तयार करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतील,जेणेकरून शेतकऱ्यांना सुधारित जातींची विश्वसनीय बियाणे मिळतील आणि त्यांचे उत्पादन वाढेल.
या जातींचे वैशिष्ट्य जाणुन घेऊया
Characteristics of Millet Species
HHB 67 (सुधारित) हायब्रिडमध्ये बायोटेक्नॉलॉजी पद्धतीद्वारे जोगिया प्रतिरोधक जनुके घातली गेली आहेत. HHB 299 आणि HHB 311 उच्च लोह (73-83 ppm) असलेल्या संकरित बाजरीच्या जाती आहेत. त्यांचे कणीस शंकूच्या आकाराचे आणि मध्यम लांब असतात.
HHB 299 वाण 80-82 दिवसांत परिपक्व होते तर HHB 311 वाण 75-80 दिवसात परिपक्व होते. चांगली देखभाल केली तर HHB 299 चे उत्पादन एकरी 490 क्विंटल च्या आसपास होऊ शकते. तसेच HHB 311 चे उत्पादन एकरी 450 क्विंटलपर्यंत होऊ शकते. या जाती जोगिया रोगाला प्रतिरोधक असतात.
Share your comments