1. कृषीपीडिया

सुकलेले पान तोडून नष्ट करा चक्रभुंगा व्यवस्थापन, खात्रीशीर नियंत्रणासाठी खात्रीशीर उपाय

चक्रभुंगा व्यवस्थापन

चक्रभुंगा व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी बंधुनो, सद्यस्थितीत आपण सोयाबीन पिकावर चक्रभुंगा या किडीसाठी किटनाशकाची फवारणी घेत आहोत. दरवर्षी या किडिचा प्रादुर्भाव दिसून येतो व या किडीच्या व्यवस्थापनासाठी ट्रायझोफास, प्रोफेनोफास, लम्बडा साहायलोथ्रीन, किंवा सोलोमन आणखी काही अंतरप्रवाही किटनाशके फवारतो.

पण खरच हा चक्रभुंगा नियंत्रणात येतो का ? आपण फवारल्या नंतर आपण एखाद्या वेळेस प्रादुर्भावग्रस्थ खोड फोडुन पाहिले का की चक्रभुंगा अळी मेली का नाही. हे आपण केव्हाच बघत नाही. फक्त किटनाशक फवारुन समाधान मानतो. ही किड पानाच्या देठाच्या आत किंवा खोडाच्या आतून खाणारी आहे तिच्यापर्यंत किटकनाशक पोहचणे बहुतेक शक्य होत नाही. कुठलेही किटनाशक या किडीसाठी प्रभावी नसल्याचे दिसून येते.

काय करायचे

आधी या किडीचे नुकसान जाणून घेऊ. ही किड पीक 20-25 म्हणजे 5-6 पानाचे झाल्यावर नर-मादी भुंग्याचे मिलन झाल्यावर कोवळ्या देठावर किंवा खोडावर दोन चक्र काप करुन म्हणजे करकुंडा पाडून मादी मधात एक पिवळसर अंड घालते व लांबून अंडी घातलेले पान किंवा खोड सुखलेले दिसून येते. अशाप्रकारे एक मादीभुंग तीच्या जिवनात 70-80 अंडी घालते म्हणजे तेवढेच झाड बाधीत करते.

 

हे अंड 7-8 दिवसांनी उबवते व अळी तयार होऊन 3-4 दिवसांनी मुख्य खोडात सिरते (म्हणजे ती 8-12 दिवस पानाच्या देठातच असते). पुढे खोडात शिरल्यावर खोड पोखरत पीकपक्व होईपर्यंत झाडाच्या बुडापर्यंत पोहचते व परत जमिनीपासून 1-2 इंचावर काप करते व झाड सोंगनी करताना अलगत मोडून येते. यामुळे शेंगा भरत नाही दाणे बारीक होतात. अशाप्रकारे ही किड नुकसान करते. *

व्यवस्थापन कसे करायचे

जसे साप बाहेर असेल तोपर्यंतच आपण त्याला पकडू शकतो किंवा मारु शकतो, एकदा का तो बिळात गेल्यावर काहिच करू शकत नाही तसेच या किडीचे आहे जोपर्यंत अंड्यात व देठात आहे तोपर्यंतच ही कीड आपण नियंत्रणात आणू शकतो ती खोडात शिरल्यावर काहीच करू शकत नाही. तेव्हा ज्या शेतक-यांची शेती कमी आहे, किमान त्यांनी तरी हा प्रयोग करुन पाहायला हरकत नाही. तो म्हणजे चक्रभुंग्यामुळे सुकलेले पान करकुंड्यासह तोडून घेऊन नष्ट करणे.

 

तुम्ही म्हणाल हे शक्य आहे का? करुन बघायला काय हरकत आहे. पट्टा पद्धत असेल तर आणखी सोपे जाते, सुरुवात एक एकराने करा किती वेळ लागतो ते बघा. एका बाईच्या मजुरीत एक एकर होते असे दर आठवड्याला चार -पाच आठवडे पिक जरड होईपर्यत केले तर 100% चक्रभुंगाचे व्यवस्थापन होईल. करुन बघा शक्य आहे. पटलं तर करा नाही तर किटनाशक फवारणी करावी.


गोपाल उगले

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters