खजुरे उष्णता सहन करणारे फळा म्हणून परिचित आहे. पक्वतेच्या वेळी आणि निघण्याच्या वेळी पाऊस तसेच आद्रता विरहित वातावरणाची त्याला गरज असते. जर खजुराच्या जातीनुसार विचार केला तर त्यासाठी 25 ते 30 अंश सेंटिग्रेड तापमानाची आवश्यकता असते.
परंतु हे पीक 50 अंश सेल्सिअस तापमानाला देखील उत्तम स्थितीत राहू शकते. जर खजूर पिकासाठी लागणाऱ्या मातीचा विचार केला तर ती पोयटा मिश्रित, पाण्याची धारणक्षमता असलेल्या तसेच सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जमिनीत अधिक असेल तर उत्तम असते. साडे आठ सामू असलेल्या जमिनीत देखिलहे पीक चांगले येते.
खजूर लागवड
जर खजूर लागवड करायचे असेल तर ते ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात किंवा मार्च- मे महिन्यात करणे चांगले असते. त्यासाठी 1×1×1 मीटर लांब व रुंद तसेच खोल खड्ड्यामध्ये वरच्या थरातील माती, रेती व सेंद्रिय पदार्थ 3:1:1 प्रमाणामध्ये टाकून साधारणतः7×7 मीटर अंतरावर खजूर रोपांची लागवड करावी.
खजूर लागवडीसाठी रोपांची निवड
खजूर रोपांची अभिवृद्धी बियांपासून तसेच शाखीय पद्धतीने करता येते. हे पीक द्विलिंगी पीक आहे म्हणजे या पिकाची बियांपासून अभिवृद्धी केल्यास 50 टक्के रोपेमादीवृक्षाचे आणि 50 टक्के रुपये हे न रुक्षाचेआणि 50 टक्के रोपे हेनर वृक्षाचे तयार होतात. अशा रोपांपासून लागवड केल्यास पाच ते सहा वर्षांनी फळधारणा होण्याससुरुवात होते. तसेच पन्नास टक्के झाडे नरांच्या असल्यामुळे उत्पादन देत नाहीत त्यामुळे ते उपटून टाकावे लागतात. ही संभाव्य अडचणी टाळण्यासाठी बियांपासून अभिवृद्धी न करता शासकीय पद्धतीने लागवड करतात. यासाठी 10 ते 30 सेंटीमीटर व्यास असलेले व 15 ते 30 किलो वजन असलेले सकर्स लागवडीसाठी वापरल्यास 80 ते 90 टक्के यशस्वी होण्याचे प्रमाण असते.
उती संवर्धन पद्धतीने तयार केलेले रोपांचे फायदे..
उती संवर्धन पद्धतीने तयार केलेली रोपे अनुवंशिक दृष्ट्या स्थायी स्वरूपात असतात.तसेच यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात एकाच वेळात तसेच कमी वेळात तयार करता येतात.बियांपासून लागवड केल्यास 50 टक्के नराच्या झाडाचे प्रमाण असते. त्यामुळे उत्पादन आणि आर्थिक दृष्ट्या 50 टक्के तोटा होत असतो. याउलट मेदजूल, शरण इत्यादीसारख्या जातीची उतिसंवर्धन पद्धतीने तयार केलेली रोपे साधारणतः 9×9 मीटर अंतरावर लागवड केल्यास खजूर झाडाला तीन वर्षात फळे येण्यास सुरुवात होते. उती संवर्धन पद्धतीने तयार केलेली रोपे 52 अंश सेल्सिअस तापमानात तग धरून राहतात.
खजूर झाडांमधील फळधारणा
हे झाड द्विलिंगी असल्यामुळे नर फुलांचे झाड व मादी फुलांचे झाड वेगळे असतात. नारळाच्या झाडाचे कार्य मादी फुलाच्या परागीभवनासाठी आणि फलन प्रक्रिया साठी महत्वाचे असते. साधारण शंभर मादी झाडांसाठी दोन ते तीन नर झाडे परिपूर्ण करतात. परागीभवन व फलन प्रक्रिया चारितर खारी तयार होते.
गडावर फळांची संख्या व झाडावर घडांची संख्या निश्चिती…
पुढील वर्षाच्या फलधारणेसाठी चालू वर्षात झाडावर घडांची व गडामध्ये फळांची संख्या निश्चित करणे महत्त्वाचे असते. जेणेकरून घडांची संरचना मोकळी होईल म्हणजे घट्ट होणार नाही. खजुराच्या जाती निहाय झाडावर घडव घडामध्ये फळांचे संख्यांना नियंत्रित करावे लागते. साधारणतः पाच वर्षाच्या झाडावर तीन ते पाच घड संख्या निश्चित करावी. भारतीय हवामानानुसार एका झाडावर आठ ते दहा घड ठेवू शकतो.
खजूर पिकाची अर्थकारण
1-7×7 मीटर अंतरासाठी उतिसंवर्धित 82 रोपे आणि 7×7 मीटर अंतरासाठी पन्नास रोपे लागतात.
2- रोपांची किंमत जाती नुसार वेगळे असते. साधारण 3500 ते 4500 रुपये प्रति झाड. झाडांच्या संख्येनुसार 1.74 लाख ते 3.69लाख रुपयांपर्यंत रोपांसाठी खर्च येऊ शकतो.
3- लागवडीपासून च्या तिसऱ्या वर्षापासून उत्पादनाला सुरुवात होते. उत्पादनाच्या पहिल्या वर्षी प्रति झाड 30 किलो ओली खारीक, 50 किलो दुसऱ्या वर्षी तर तिसऱ्या वर्षी दोनशे किलो खारीक मिळते.
4-ओली खारीक प्रतिकिलो 100 ते 200 रुपये दराने विकली जाते. यामध्ये जातीपरत्वे व बाजारभावानुसार फरक होऊ शकतो. पाच वर्षानंतर प्रती झाड 30 हजार रुपये उत्पन्न मिळू शकते.
Share your comments