1. कृषीपीडिया

जमिनीचा कस वाढवेल दशरथ घास; शेळ्यांसाठी आहे उपयुक्त

दशरथ घास वर्षभर चारा देणारे द्विदल जातीचे चांगले पोषण मूल्य असणारे बहुवार्षिक चारा पीक आहे. या पिकाच्या मुळांवर रायझोबियम च्या गाठी असल्यामुळे जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढून जमिनीच कस वाढतो.

KJ Staff
KJ Staff


दशरथ घास वर्षभर चारा देणारे द्विदल जातीचे चांगले पोषण मूल्य असणारे बहुवार्षिक चारा पीक आहे.  या पिकाच्या मुळांवर रायझोबियम च्या गाठी असल्यामुळे जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढून जमिनीच कस वाढतो.  त्याचबरोबर हिरवळीचे खत म्हणून देखील याचा वापर करतात

पौष्टिक मूल्य:- हिरव्या चाऱ्यामध्ये १८-२१% प्रथिने ९% स्निग्ध पदार्थ,१.९% खनिजे, ३७.७ % कर्बोदके असतात.

कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम देखील पुरेशा प्रमाणात असतात.

जमीन हलक्या ते मध्यम स्वरूपाची पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागवडीकरिता उपयुक्त.  सुपीक जमिनीत हे पीक घेतल्यास अधिक उत्पादन होऊ शकते.

पेरणीसाठी दशरथ घासची  बीजप्रक्रिया:-  

बीज कवच कठीण असल्यामुळे पेरणी आधी ह्या पिकाचे बियाण्यावर गरम पाण्याने प्रक्रिया करणे आवश्यक आहे.   त्यामुळे बीज कवच नरम होऊन उगवण्यास  मदत होते.   साधारण चार लिटर पाण्यात एक किलो बियाणे घ्यावे.  पाण्यावर तरंगत असलेले बियाणे बाजूला काढावे बाकी राहिलेले बी उकळी आलेल्या पाण्यात पाच मिनिटे ठेवावे.  त्यानंतर हे बियाणे थंड पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे, असे बियाणे गोणपाटात सावलीत सुकवल्यानंतर जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.  एक किलो बियाण्यास पाच मिलि रायझोबियम वापरावे.

पेरणी:-

पेरणी ही जून -जुलैच्या दरम्यान करावी प्रति हेक्‍टरी २० ते २५ किलो बियाणे लागते साधारण एक ते दोन इंच खोलीवर बियाणे पेरावे त्यापेक्षा खोल पेरल्यास बी उगवणार नाही.

खते:-

पेरणी वेळेस शेणखत किंवा लेंडीखत टाकावे.

हेक्‍टरी २० किलो नत्र ५० किलो स्फुरद २० किलो पालाशची मात्रा द्यावी

कापणी:-

 पिकाची पहिली कापणी लागवडीनंतर ६० ते ७०  दिवसानंतर करावी नंतरच्या कापण्या प्रतिमहिना केल्या तरी चालतील. कापणी जमिनीपासून ३० सेंटीमीटर वर करावी.

उत्पादन:-प्रति हेक्‍टरी ७० ते ८० टन उत्पादन मिळते.

लेखक -  

पूजा लगड

Msc (Agri)

निकिता जंजिरे

Bsc( Agri)

समर्थ तुपकर

Bsc ( Agri)

English Summary: Dasharath grass will increase soil fertility Published on: 08 September 2020, 03:02 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters