दशपर्णी अर्क हे नैसर्गिक किटकनाशक असून हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे व शेतीचा खर्च यामुळे नक्कीच कमी होऊ शकतो, रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यास ते आरोग्यास खूप हानिकारक आहे.त्यामुळे जर आरोग्यावर होणारे वाईट परिणाम व शेतीचा खर्च कमी करण्यासाठी नक्कीच सर्व शेतकर्यांनी या दशपर्णी अर्काचा वापर कीटकनाशक म्हणून केला पाहिजे.
भारत सरकारच्या किटकनाशक बंदी कायद्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी हे जैविक कीटकनाशक स्वता: तयार करावे.
साहित्य
1 लिटर तयार करण्यासाठी खर्च फक्त 6 रुपये आहे व 16 लिटर पंपासाठी फक्त 200 मिली घेणे आहे . एका पंपासाठी खर्च 2 रुपये याची माहिती
कीटकनाशक बनविन्यासाठी लागणारे साहित्य
200 लिटर टाकी
कडूनिंब व निंबोळ्या पाला – 5 किलो
रुई पाला – 2 किलो
धोतरा पाला – 2 किलो
एरंडपाला – 2 किलो
बिलायत पाला – 2 किलो
गुळवेल पाला – 2 किलो
निरगुडी पाला – 2 किलो
घाणेरी पाला – 2 किलो
कणेरी पाला – 2 किलो
करंजी पाला – 2 किलो
बाभूळ पाला. – 2 किलो
एरंड पाला – 2 किलो
बेशरम पाला – 2 किलो
सीताफळाचा पाला -2 किलो
पपईचा पाला – 2 किलो
कृती:
यापैकी कडूनिंब गारवेल रुई करंजी सीताफळाला पाला महत्त्वाचा बाकीचे सर्व उपलब्ध असतील त्यानुसार घेणे सर्व मिळून 10 वनस्पती होणे गरजेचे आहे हे सर्व 200 लिटर टाकीमध्ये पाणी घेऊन त्यात वरील सर्व वनस्पती बारीक करून घेणे साधारण वीस दिवस घड्याळाच्या काट्याप्रमाणे ढवळणे 30 दिवसानंतर उग्र वास आल्यानंतर 16 लिटर पाण्याला 200 मिली फवारणी साठी वापरकता येईल.
कीटकनाशक मावा, तुडतुडे, थ्रिप्स, अळी यांच्यावर प्रभावी काम करते याची फवारणी शक्यतो दर आठ दिवसाला करावी.
प्रमाण:-
16 लिटर पंपासाठी 200 मिली
ह्याच बरोबर काही जीवाणू तसेच बुरशी प्रमाणित प्रयोगशाळेतून आणावे लागतात.
उदा. वर्टीसिल्लेयाम लुकानी, बीवेरिया ,माईक्रोराईझा, मेटाराईझम. यांची विक्री दर वेगळे उपलब्ध आहेत.(प्रयोग शाळेवर अवलंबून आहे)
अशा प्रकारच्या निविष्ठा वापरल्यास खर्चात बचत होते व उत्पादनात 20% वाढ होते. हा माझा अनुभव आहे मित्रो हो निसर्गाने आपल्याला भरपूर दिलंय त्याचा वापर करणे हे आपल्याच हाती आहे
मला एक सांगा रासायनीक शेती आपल्या खिशाच्या बाहेरचा विषय होऊन बसला आहे. म्हणून म्हणतो जैविक शेती करा, विष मुक्त शेती करा, नैसर्गिक शेती करा कारण कि हाच विषय खिशाला व आरोग्याला संभाळतो.
त्यासाठी स्वतः बनविन शिका कोणत्याही रासायनीक किंवा जैविक किवा सेंद्रिय कंपनीकडून स्वतःची व आपल्या शेतकरी मित्राची लूट होऊ देऊ नका सर्व शेतकरी बांधवापर्यंत माहिती पोचवा ही विंनती
Share your comments