यामुळे बाहेरील रस शोषण करणाऱ्या किडी रोपवाटिकेमध्ये घुसण्यास मज्जाव होतो.
रोगग्रस्त झाडे दिसताच ती उपटून नष्ट करावीत . कारण रोगग्रस्त झाडापासून निरोगी झाडांना विषाणूची लागण होते. किडीमार्फत होणारा प्रसार रोखणे हाच एक उपाय आहे.
पांढ-या माशीच्या नियंत्रणासाठी प्रति एकी ३५ पिवळे चिकट सापळे लावावेत.
फुलकीडीच्या नियंत्रणासाठी प्रतेि एकी ३५ निळे चिकट सापळे लावावेत .
शेताच्या चोहोबाजूंनी तीन ओळीमध्ये मका , चावली व झेंडू लावावा . हा मका वाढल्यानंतर शेतीभोवती कुंपण तयार होते. यामुळे बाहेरील कीड आत येण्यास मज्जाव होतो. मका फुलातील प्रग खाण्यासाठी मित्रकीटक उदा.क्रायसोपा , लेडीबर्ड बीटल,कोळी , ट्रायकोड्रामा इत्यादी येतात . हे कीटक मक्यावर आलेल्या किडींना खातात . या सजीव कुंपणामुळे मित्रकीटकांचे संवर्धन होऊन रसशोषक किडींच्या नियंत्रणास मदत होते.
व्हर्टीसिलियम लेक्यानि किंवा मेटारायझिम अॅनोसोपली या जैविक कीटकनाशकाची
५ मी.ली. प्रती लिटर पाण्यामधून संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी.
पांढरा, पिवळा ,कला,किंवा निळ्या रंगाच्या प्लास्टिक मल्चिंगने पांढऱ्या माशीचे प्रमाण कमी राहते
बीजप्रक्रिया केली नसल्यास वाफ्यात (दोन एक मीटर ) रोपे उगवल्यानंतर दोन ओळीत फोरेट दाणेदार २० ग्रॅम टाकावे किंवा रोपे उगवल्यानंतर डायमिथोएट १० मी.ली. प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे
लागवडीवेळी इमिडाकलोप्रीड १ मी.ली.+कार्बेंडझिम १ ग्रॅम + ट्रायकोडमा ५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या द्रावणात रोपाची मुळे बुडवून नंतर लागवड करावी.
पुनर्रलागवडीनंतर पहिली फवारणी सायपरमेथ्रीन ४ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यातून करावी . त्यानंतर १२ ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात . फवारणीसाठी कीटकनाशके आलटून पालटून वापरावीत.
Share your comments