1. कृषीपीडिया

महत्वाचे! हे आहेत लाल कोबी चे औषधी गुणधर्म आणि त्याची लागवड पद्धत

भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये कोबी एक लोकप्रिय भाजी म्हणून ओळखली जाते. आपल्या आरोग्यासाठी देखील कोबी फार फायदेशीर आहे. काही तज्ञांच्या मते, कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी देखील याचा वापर केला जातो. कशाची भाजी हृदयाची ताकद वाढविण्यासाठी आणि शरीरातून कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. कोबीचे आपल्याला फुलकोबी, ब्रोकोली वगैरे प्रकार माहिती आहेत परंतु यामध्ये लाल कोबी ही तेवढीच लोकप्रिय होत आहे.मोठ्या शहरांमध्ये लग्नासारख्या समारंभातसॅलड स्वरूपातील कोबी खाल्ली जाते. या लेखात आपण या उपयुक्त कोबीची लागवड पद्धत कशी आहे हे पाहणार आहोत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
red cauliflower

red cauliflower

 भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये कोबी एक लोकप्रिय भाजी म्हणून ओळखली जाते. आपल्या आरोग्यासाठी देखील कोबी फार फायदेशीर आहे. काही तज्ञांच्या मते, कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी देखील याचा वापर केला जातो. कशाची भाजी हृदयाची ताकद वाढविण्यासाठी आणि शरीरातून कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. कोबीचे आपल्याला फुलकोबी, ब्रोकोली वगैरे प्रकार माहिती आहेत परंतु यामध्ये लाल कोबी ही तेवढीच लोकप्रिय होत आहे.मोठ्या शहरांमध्ये लग्नासारख्या समारंभातसॅलड स्वरूपातील कोबी खाल्ली जाते. या लेखात आपण या उपयुक्त कोबीची लागवड पद्धत कशी आहे हे पाहणार आहोत.

लाल कोबीच्या सुधारित जाती

  • रेडरॉक वरायटी- ही जात सर्वात सहज येणाऱ्या वाना पैकी एक आहे. याकोबी चे हेड 250 ते 300 ग्रॅम वजनाचे आहे जे लाल रंगाचे आहे.
  • रेड ड्रम हेड- ही जात आकाराने मोठी व आतून गडद लाल तसेच वजनदार आहे. त्याचे वजन 500 ग्रॅम ते दीड किलोपर्यंत आहे.

लाल कोबी ची लागवड पद्धत

जमीन

  • हलकी माती लालकोबीच्या उत्पादनासाठी चांगली आहे. हलक्‍या जमिनीत हे पीक घेता येते. जमिनीचा सामू सहा ते सात यांच्या दरम्यान असावा.
  • लागवडीसाठी आवश्यक तापमान 20 ते 30 अंश सेंटिग्रेड असावे.
  • लाल कोबी पेरणीची वेळ ही सप्टेंबर मध्यापासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत असते.
  • कोबीची लागवड केल्यानंतर हलके पाणी देणे आवश्यक आहे. जेणेकरून जमिनीत पुरेसा ओलावा राहील. लाल कोबी चे हेड पूर्णपणे विकसित झाल्याशिवाय त्याची कापणी करू नये. लवकर कापणी केल्याने त्याचा आकार कमी होतो.
  • लाल कोबीच्या लागवडीसाठी शेतात दोन ते तीन वेळा नांगरणी करून माती भुसभुशीत बनवणे आवश्यक आहे.
  • यानंतर समान आकाराचे बेड बनवावेत.

लाल कोबी ची पेरणी/ लागवड

  • लाल कोबी च्या लागवडी साठी हेक्‍टरी 400 ते 500 ग्रॅम आणि 200 ते 800 ग्रॅम प्रति एकरी बियाणे आवश्यक असते.
  • लाल कोबी बियाणे पेरणीसाठी नर्सरीमध्ये एक बेड तयार करावे आणि लहान दोन ते चार सेंटीमीटर दोन ते तीन सेंटीमीटर अंतराची ओळ बनवा. बियाणे एक ते चार मीमीखोलीसह अंतरावर पेरणी करा.
  • नंतर कंपोस्ट खताचा हलका थर देऊन झाकून ठेवा आणि हलके सिंचन करा.
  • रोपे वीस ते पंचवीस दिवसात तयार होतात. बी पेरल्यानंतर जेव्हा वनस्पती दहा ते बारा सेंटिमीटर उंच होईल तेव्हा ते बेडमध्ये लावा.
  • बेड मध्ये लागवड करताना त्यांच्यातील योग्य अंतर लक्षात ठेवा. जेणेकरून झाडे वाढण्यास आणि पसरण्यासाठी पुरेशी जागा मिळेल. दोन ओळींमधील अंतर 40 ते 50 सेंटिमीटर आणि दोन झाडांमधील अंतर तीस ते पस्तीस सेंटीमीटर ठेवणे आवश्यक आहे.

लाल कोबी साठी वरखते

 हेक्‍टरी सुमारे 65 किलो नत्र, 45 किलो फॉस्फरस व 55 किलो पोटॅश यांचा पहिला हप्ता लागवडीच्या वेळी देतात. लागवडीनंतर पाच ते सहा आठवड्यांनी फक्त 65 किलोग्राम नत्राचा दुसरा हप्ता देतात. या पिकाला नत्राची फार गरज असते.

लाल कोबी साठी पाणिव आंतरमशागत

 या पिकाला सतत ओलाव्याची गरज असते. लाल कोबी ची गड्डे तयार व्हायला लागल्यावर भरपूर पाणी भरने टाळावे.कडक उन्हात व दोन पाळ्यांमधील अंतर फार झाल्यास भरपूर पाणी भरल्यास गडे फुटण्याची भीती असते. कोबीची मुळे जमिनीत 5-7 सेंटिमीटर खोल जातात. त्यामुळे त्याला खुरपणी सारखी हलकी मशागत मानवते.

 

लाल कोबी ची काढणी व उत्पन्न

 योग्य आकाराचे, घट्ट व कोवळी गड्डे काढून त्याची प्रतवारी करून विक्रीस पाठवितात. तसेच प्रतवारी साठी भारतीय मानक संस्थेने ठरवून दिलेली मानके वापरतात. 90 ते 95 टक्के सापेक्ष आद्रता या पिकासाठी चांगली असते. हळव्या पिकाचे हेक्‍टरी 20 ते 25 टन व गरव्याया पिकाचे 25 ते 35 टन उत्पादन येते.

 लाल कोबी चे औषधी गुणधर्म

 लाल कोबी मध्ये खनिज,ग्लाकोकॉलेट, कॅल्शियम, लोह, प्रथिने, कॅलरीज इत्यादी भरपूर प्रमाणात असतात. जर तुम्ही कच्ची खात असेल तर ते तुम्हाला रक्तदाबाच्या आजारापासून मुक्त करू शकते. त्याच्या गुणवत्तेमुळे आणि रंगामुळे,बाजारात त्याची मागणी दररोज वाढत आहे आणि त्याला भाव देखील चांगले मिळतात.

English Summary: cultivation process of red cauliflower and management Published on: 14 October 2021, 09:54 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters