1. कृषीपीडिया

'ह्या' पद्धतीने बाजरी लागवड करा आणि मिळवा भरगोस उत्पादन

जगातील एकूण बाजरी उत्पादनापैकी सर्वात जास्त उत्पादन हे भारतात होते. भारत प्रमुख बाजरी उत्पादक देशांपैकी एक आहे. शेतकरी मित्रांनो जसं की तुम्हाला माहित आहे बाजरी पिक हे खरीप हंगामाचे एक प्रमुख पिक आहे. कोणत्याही पिकाचे चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादनसाठी त्या पिकाची योग्य काळजी घेणे आवश्यक असते. बाजरीची देखील पेरणी नंतर काळजी घेणे आवश्यक आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
baajra crop

baajra crop

जगातील एकूण बाजरी उत्पादनापैकी सर्वात जास्त उत्पादन हे भारतात होते. भारत प्रमुख बाजरी उत्पादक देशांपैकी एक आहे. शेतकरी मित्रांनो जसं की तुम्हाला माहित आहे बाजरी पिक हे खरीप हंगामाचे एक प्रमुख पिक आहे. कोणत्याही पिकाचे चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादनसाठी त्या पिकाची योग्य काळजी घेणे आवश्यक असते. बाजरीची देखील पेरणी नंतर काळजी घेणे आवश्यक आहे.

भारत बाजरी उत्पादनात आपले वर्चस्व राखतो त्याचे एक कारण आपल्याकडे असलेले हवामान देखील आहे. मित्रांनो भारतात सुमारे 85 लाख हेक्टर क्षेत्र हे बाजरी पिकाच्या लागवडिखालील आहे. ह्या एवढ्या मोठ्या क्षेत्राचे 87 टक्के क्षेत्र हे राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये आहे. आपल्या महाराष्ट्रात बाजरीचे चांगले तगडे उत्पादन घेतले जाते. आपल्या राज्यात बाजरीच्या संगम, RHRBH- 9808, प्रभानी संपदा, ICMH- 365, साबोरी, श्रद्धा, MH-179 इ. सुधारित जातीची लागवड केली जाते.

 बाजरीचे पिक कमी पाऊस असला तरी, इतर पिकांच्या तुलनेत त्यातून जास्त उत्पादन आणि चारा मिळू शकतो. त्यामुळे कोरड जमिनीत आणि कमी पावसाच्या क्षेत्रात बाजरी लागवड शेतकरी प्रामुख्याने करतात. सोयाबीन, गहू आणि बटाटा पिकांमध्ये नेमाटोड नियंत्रणासाठी आवर्त पीक बाजरी पिकाचा वापर केला जातो.  बाजरीपासून बनवलेले पोल्ट्री फीड कोंबड्यांना दिले तर अंड्यांमधील नको असलेले कोलेस्टेरॉल (LDL) मक्यापासून बनवलेल्या पोल्ट्री फीडमधून तयार होणाऱ्या अंड्यांपेक्षा कमी असते. त्यामुळे ह्याची मागणी देखील चांगली आहे म्हणुन बाजरीचे लागवड करून शेतकरी चांगली कमाई करू शकतात. चला तर मग जाणुन घेऊया बाजरी लागवडिविषयी.

बाजरी पिकासाठी आवश्यक हवामान

»बाजरी पिकाच्या उत्तम वाढीसाठी आणि उत्पन्नासाठी 400 ते 500 मिमी पाऊस असलेला प्रदेश चांगला असल्याचे सांगितले जाते

»बाजरी पीकाला उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते अशा प्रदेशात लागवड केली तर उत्पादन अधिक प्राप्त होईल.

»बाजरी पिकाचे अंकुरण हे 23 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान असलेल्या तापमानात चांगले होते. बाजरी पिकाच्या वाढीसाठी  सूर्यप्रकाश महत्त्वाची भूमिका निभावत असतो. म्हणुन सूर्यप्रकाश चांगला पडत असलेल्या भागात ह्याची लागवड करावी.

 बाजरी पिकासाठी आवश्यक शेतजमीन

बाजरी पिकासाठी जमीन हि पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. जमीन मध्यमहलकी ते भारी/दनगट जमीन चांगली असल्याचे सांगितले जाते. पडीत नापीक जमिनीवर देखील बाजरी लागवड केली जाते मात्र आशा जमिनीत उत्पादन हे खुप कमी येते. 

जमिनीच्या मातीचे pH अर्थात सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असावा.  चिकणमाती म्हणजेच लोममाती असलेली जमीन चांगल्या उत्पादणासाठी योग्य मानली जाते. बाजरी पिकाच्या चांगल्या उत्पादणासाठी चांगली पूर्वमशागत करणे महत्वाचे ठरते. शेतकरी बांधवानो शेत नांगरणी करताना खोलवर करणे आवश्यक आहे. पूर्वमशागतीनंतर चांगल्या क्वालिटीचे जुने शेणखत शेवटच्या मळणीपूर्वी जमिनीत टाकावे असा सल्ला बाजरी उत्पादक शेतकरी देतात.  पेरणीपूर्वी, फळी फिरवने महत्वाचे आहे जेणेकरून पेरणीनंतर पावसाचे पाणी साचणार नाही आणि अंकुरण क्रियेवर वाईट परिणाम होणार नाही आणि बाजरी पिकाच्या वाढीला धोका पोहचणार नाही.

English Summary: cultivation process of milet and insecct management Published on: 31 October 2021, 07:20 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters