1. कृषीपीडिया

खपली गव्हाची या सुधारित तंत्राने करा लागवड,मिळेल चांगले उत्पन्न

खपली गव्हाच्या लागवडीसाठी योग्य तंत्राचा वापर केल्यास उत्पादन वाढवणे शक्यव आहे. खपली गव्हाच्या काही सुधारित रोगप्रतिकारक जाती आहेत त्या म्हणजे एम.ए.सी.एस 2971, डीडीके 1025,डीडीके 1029 आणि एचडब्ल्यू 1098 या अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करावी. भारताचा विचार केला तर भारतामध्ये सरबत्ती, बन्सी आणि खपली या तीन प्रकारच्या गव्हाची लागवड होते. यामध्ये सरबती गव्हाचा वाटा 95 टक्के आहे. परंतु पोषक त्यामुळे खपली गव्हाची मागणी वाढत आहे. बाजारात इतर गव्हाच्या असा खपली गव्हाला 50 टक्के अधिक दर मिळतो. या लेखात आपण खपली गव्हाच्या लागवड तंत्र बद्दल जाणून घेणार आहोत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
khapli wheat

khapli wheat

 खपली गव्हाच्या लागवडीसाठी योग्य तंत्राचा वापर केल्यास उत्पादन वाढवणे शक्‍य आहे. खपली गव्हाच्या काही सुधारित रोगप्रतिकारक जाती आहेत त्या म्हणजे एम.ए.सी.एस 2971, डीडीके 1025,डीडीके 1029 आणि एचडब्ल्यू 1098 या अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करावी. भारताचा विचार केला तर भारतामध्ये सरबत्ती, बन्सी आणि खपली या तीन प्रकारच्या गव्हाची लागवड होते. यामध्ये सरबती गव्हाचा वाटा 95 टक्के आहे. परंतु पोषक त्यामुळे खपली गव्हाची मागणी वाढत आहे. बाजारात इतर गव्हाच्या  असा खपली गव्हाला 50 टक्के अधिक दर मिळतो. या लेखात आपण खपली गव्हाच्या लागवड तंत्र बद्दल जाणून घेणार आहोत.

खपली गव्हाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान

  • हवामान-खपली गव्हासाठी रात्रीडी आणि दिवसा कोरडे हवामान लागते. फुटवे फुटण्यास पासून ते ओंबी भरेपर्यंत थंडीच्या आवश्यकता असते. जास्त पावसामध्ये खपली गहू टिकाव धरू शकत नाही खपली गव्हाची साठी साधारणतः 10 ते 23 अंश सेल्सिअस तापमान योग्य आहे. थोडे जरी तापमान वाढले तरी खपली गहू सहन करू शकतो. त्यासोबतच पाण्याचा ताण देखील चांगल्या प्रकारे सहन करतो.
  • जमीन- खपली गव्हाची साठी काळी व कसदार जमिनउपयुक्त आहे.हलक्‍या व चोपण जमिनीतही चांगले उत्पादन मिळते. पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. त्यामुळे जमिनीवर पीक लोळत नाही. क्षारपड जमीन खपली गव्हासाठी योग्य नाही.चांगले उत्पादन घेण्यासाठी मातीचा सामू सात ते आठ पर्यंत असावा. जमिनीची चांगली मशागत करणे आवश्यक आहे कारण पिकाच्या उपयुक्त मुळ्या 60 ते 75 सेंटीमीटर खोलवर जातात.
  • लागवड1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान करावी.
  • खतांचे नियोजन- उन्हाळ्यामध्ये शेणखत टाकले नसल्यास एकरी चार ट्रॉली शेणखत मिसळावे. 60 किलो नत्र, 60 किलो स्फुरदव 60 किलो पालाश पेरताना द्यावे.उर्वरित अर्धे नत्र पेरणीनंतर 30 दिवसांनी खुरपणी नंतर द्यावे.
  • बीजप्रक्रिया- खपली गहू पेरण्यासाठी वापरतांना टरफलांसहित वापरला जातो. एका एकराला पेरणीसाठी 40 किलो बियाणे वापरावे. टोकण पद्धतीने लागवड करण्यासाठी एकरी 16 ते 20 किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीच्या आगोदर बियाण्याला कॅप्टन किंवा थायरम बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी 25 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर अधिक 25 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया गुळाचा पाण्याबरोबर करावी. त्यानंतर बियाणे सावलीमध्ये वाळवून पेरणी करावी.
  • पेरणीची पद्धत- पेरणीसाठी दोन ओळीत हीच सेंटिमीटर अंतर ठेवून ट्रॅक्‍टरचलित पाभरीने पेरणी करून बीएकसारखे पडेल याची काळजी घ्यावी. पेरणी दक्षिणोत्तर खत तसेच पाच ते सहा सेंटीमीटर खोल करावी.त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी उभी-आडवी अशा दोन्ही बाजूने न करता ती एकेरी करावे.

 

  • वाढीसाठी आवश्यक गोष्टी:
    • बागायती पद्धतीत वेळेवर पेरलेल्या खपली गव्हाची खुरपणी झाल्यानंतर प्रति हेक्‍टरी 60 किलो नत्र द्यावे.
    • दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना द्रवरूप नत्र व पालाशयुक्त खतांची फवारणी करावी.
    • गहू 55 ते 70 दिवसांचा असताना 19:19:19 या विद्राव्य खताची दोन टक्के याप्रमाणे दोन वेळा फवारणी करावी.दाणे भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के युरियाची फवारणी करावी.
    • पेरणीसाठी व जास्तीत जास्त उत्पादनासाठी शिफारस केलेल्या जातींचा वापर करावा.
    • पेरणी यंत्राने किंवा पाभरीने करावी. दोन ओळीतील सेंटिमीटर अंतर ठेवून पेरणी पाच ते सहा सेंटीमीटर खोल  व दक्षिणोत्तर करावी.
    • पेरणीसाठी हरभरा व भुईमुगाचे चाडेवापरावे.
  • हेक्‍टरी रोपांची संख्या जास्त ठेवण्यासाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण 100 किलो ठेवावे.
  • जमिनीत ओलावा राहून पीक क्षेत्रात थंड  हवामान  राहण्यासाठी नेहमीपेक्षा कमी अंतराने म्हणजे पंधरा ते वीस दिवसांनी योग्य मात्रेत पाणी द्यावे. तापमान कमी करण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर केल्यास फायदा मिळतो.
  • पीक पक्व झाल्यावर पाणी देऊ नये. नाहीतर पीक जमिनीवर लोळण्याची  व दाना  पांढरा पडण्याची शक्यता असते.
English Summary: cultivation process of khapli wheat amd management Published on: 11 October 2021, 09:45 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters