भारतात मोठया प्रमाणात भाजीपाला पिकांची लागवड हि केली जाते आणि शेतकरी यातून चांगले उत्पन्न देखील अर्जित करत आहेत. अशाच भाजीपाला पिकापैकी एक आहे वांग्याचे पीक. वांग्याची लागवड हि संपूर्ण भारतात केली जाते. महाराष्ट्रात देखील वांग्याची लागवड बऱ्यापैकी केली जाते. आणि यातून चांगली कमाई देखील शेतकऱ्यांना मिळते. वांग्याची मागणी हि खुप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे याची शेती हि शेतकऱ्यांना फायद्याची सिद्ध होऊ शकते. म्हणुनच कृषी जागरण आपल्या वाचक शेतकरी बांधवांसाठी आज वांग्याच्या लागवडीविषयी माहिती सांगणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणुन घेऊया वांग्याच्या लागवडीविषयी.
अशी करा वांग्याची लागवड
वांग्याचे सेवन हे आरोग्यासाठी चांगले असल्याचे सांगितलं जाते. तसेच वांगे हे चवीला खुपच चांगले असतात, त्यामुळे अनेक लोकांना वांगे खाने आवडते. म्हणून याची मागणी हि वर्षभर बनलेली असते, त्यामुळे याची लागवड शेतकऱ्यांना फायदा मिळवून देऊ शकते.
»शेतकरी मित्रांनो वांग्याची लागवड करण्यासाठी चांगल्या सुपीक जमिनीची निवड करावी
»वांग्याची लागवड करताना विशेष काळजी घ्यावी, आणि बिया टोपताना सुयोग्य अंतर ठेवावे. शेतकरी मित्रांनो कृषी वैज्ञानीकांच्या मते, वांग्याच्या बियांच्या दोन ओळींमधील अंतर 60 सेमी च्या आसपास असावे.
»वांग्याच्या शेतीत पूर्वमशागत एक महत्वाचे फॅक्टर म्हणून काम करते. वांग्याच्या बिया पेरण्यापूर्वी म्हणजे टोपण्यापूर्वी शेताची चांगली नागरणी करून घ्यावी, नांगरणी चार-पाच वेळा केली तर पिकाच्या वाढीस पोषक वातावरण तयार होते. नांगरणी झाल्यानंतर शेत चांगले समतल करून घ्यावे. »त्यानंतर आवश्यक तेवढे आणि शेतानुसार बेड तयार करावेत.
»कृषी वैज्ञानीकांच्या मते वांग्याच्या लागवडीसाठी एकरी 300 ते 400 ग्रॅम बियाणे पर्याप्त असते.
»वांग्याच्या बिया ह्या 1 सेमी खोलीपर्यंत पुराव्यात आणि त्यानंतर बिया मातीने चांगले झाकून टाकावे.
»मित्रांनो वांग्याचे पीक हे दोन महिन्यांत काढणीसाठी तयार होते.
किती येणार खर्च
शेतकरी मित्रांनो लागवडीचा खर्च हा त्या पिकाचे उत्पन्न ठरवण्यासाठी महत्वाचा असतो. वांगे उत्पादक शेतकऱ्यांच्या मते संपूर्ण वर्षासाठी एक हेक्टर वांग्याच्या लागवडीत जवळपास चार लाख रुपयापर्यंत खर्च हा येतो. आणि एक हेक्टर वांग्यातून जवळपास 100 टन पर्यंत उत्पादन हे मिळू शकते.
किती मिळते उत्पन्न
शेतकरी मित्रांनो असे सांगितले जाते की, एक हेक्टर वांग्यातून जवळपास 10 लाख रुपयापर्यंत उत्पन्न घेतले जाऊ शकते. म्हणजे जवळपास 6 लाख रुपये निव्वळ प्रॉफिट हा राहु शकतो. मित्रांनो बाजारभावानुसार तसेच क्वालिटीनुसार उत्पन्न कमी जास्त मिळू शकते
Share your comments