1. कृषीपीडिया

नोव्हेंबर महिन्यात 'ह्या' पिकांची लागवड करा आणि करा बक्कळ कमाई

मित्रांनो थंडीला सुरवात झाली आणि शेतकरी राजांची रब्बी हंगामासाठी लगबग देखील सुरु झाली. शेती हा बारामाही चालणारा व्यवसाय आहे आणि शेतकरी आपल्या ह्या व्यवसायात अहोरात्र मेहनत घेत असतो. नोव्हेंबर महिना हा शेतीसाठी महत्वपूर्ण आहे ह्या काळात थंडीची सुरवात झालेली असते आणि ह्यामुळे शेतकरी राजा अजून जोमाने शेतीकामासाठी सुरवात करत असतो. गव्हाच्या लागवडीचा हंगाम म्हणुन नोव्हेंबर महिना ओळखला जातो. भारतात शेतकरी नोव्हेंबर महिन्यात गहु पेरणीला उत्तम मानतात. गहु व्यतिरिक्त अजूनहि अनेक पिकांची ह्या महिन्यात लागवड केली जाते. आज आपण नोव्हेंबर महिन्यात कोणत्या पिकांची लागवड करून शेतकरी बांधव दर्जेदार उत्पादन प्राप्त करू शकतो ह्याविषयीं जाणुन घेणार आहोत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
graam crop

गहु

भारतात नोव्हेंबर मध्ये गहु लागवडीला शेतकरी बांधव पसंती देतात. गहु हे एक व्यापारी पिक आहे आणि ह्याची मोठ्या प्रमाणात भारतात लागवड केली जाते. गव्हाच्या उत्पादनात भारताचे एक महत्वपूर्ण स्थान आहे ह्याची लागवड आपल्या महाराष्ट्रात देखील लक्षणीय आहे. शेतकरी राजांनो जर आपणही गहु लागवड करण्याच्या विचारात असाल तर नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात गव्हासाठी वावराची पूर्वमशागत उरकवून घ्यावी. पहिल्या आठवड्यात वावर तयार झाले की 25 नोव्हेंबरच्या आत गव्हाची पेरणी शेतकरी राजांनी करून घ्यावी. जर ह्या सांगितलेल्या वेळी पेरणी केली गेली तर ह्यापासून मिळणारे उत्पादन हे दर्जेदार असेल व यामुळे गव्हापासून चांगले उत्पन्न मिळू शकते. मित्रांनो गहु पेरण्याआधी व पूर्वमशागतच्या वेळी मातीचे परीक्षण करून जमिनीमध्ये कमतरता असलेल्या घटकंची पूर्तता करून घेण्याचा सल्ला कृषी वैज्ञानिक देतात.

हरभरा

मित्रांनो हरभऱ्याची लागवड हि भारतात थोड्या प्रमाणात का होईना सर्वत्र आपल्याला पाहवयास मिळेल. ह्याची लागवड हि नोव्हेंबर एंडिंग पर्यंत आपटून घेण्याचा सल्ला दिला जातो. हरभऱ्याच्या सुधारित जातींची लागवड करावी, आपण पुसा 256, पंत जी 114, KWR 108 आणि KWR 850 इत्यादी सुधारित बियाणे निवडू शकता. जर आपल्याला हरभऱ्याचे पिकातून दर्जेदार उत्पादन हवे असेल तर माती परीक्षण करून घ्यावे. माती परीक्षण करून कमतरता असलेल्या पोषक तत्वाची पूर्तता करून घ्यावी ह्यासाठी आपण कृषी वैग्याणिकचा सल्ला घ्यावा. 40 ते 50 किलो सव्वा एकर साठी हरभरा बियाणे आवश्यक असते.

 वाटाणे आणि मसूर

साधारणपणे वाटाने आणि मसूरची लागवड हि गेल्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्येच केली जाते, परंतु काही कारणास्तव अद्याप मसूर आणि मटारची लागवड केली गेली नसेल तर आपण ह्या महिन्यात त्याची लागवड करू शकता. 

वाटाने आणि मसुरची लागवड हि 15  नोव्हेंबरपर्यंत उरकवून टाकावी. मसूर पेरणीसाठी साधारणपणे सव्वा एकरसाठी 20 किलो बियाणे लागते असे सांगितले जाते. तसेच वाटाणा पेरणीसाठी सव्वा एकरासाठी 50 किलो बियाणे आवश्यक असते. पेरणीपूर्वी मटार आणि मसूर यांच्या बियांवर बिजप्रक्रिया करणे आवश्यक असते, ह्यासाठी आपण रायझोबियम कल्चरची प्रक्रिया करावी असे सांगितलं जाते. बिजप्रक्रिया केली नाही तर उत्पादनात घट घडून येईल त्यामुळे बिजप्रक्रिया हि करून घ्यावी. ज्या शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यात वाटाने आणि मसुरची पेरणी केली असेल आणि त्या पिकात कोरडेपणा दिसत असल्यास पाणी भरणे आवश्यक आहे.  याशिवाय गेल्या महिन्यात पेरलेल्या मसूर आणि वाटाणे पिकाची निंदनी उरकवून टाकावी.

English Summary: cultivation of wheat,graam crop in november month and earn more money Published on: 02 November 2021, 05:44 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters