ढेमसे ही एक लोकप्रिय उन्हाळी फळभाजी आहे. या फळभाजीला टिंडा या नावाने ओळखले जाते. परंतु बरेचसे शेतकरी या पिकाची लागवड करत नाही. परंतु वर्षभर याला सतत मार्केटमध्ये मागणी असते. या लेखामध्ये आपण ढेमसे लागवड तंत्रज्ञान जाणून घेणार आहोत.
ढेमसे लागवड तंत्रज्ञान
- जमीन व हवामान:-
या पिकासाठी सर्वसाधारणपणे हलकी ते मध्यम काळी जमीन लागते. परंतु हलकी जमीन असली तरी या पिकास चांगली असते. या पिकाची लागवड वर्षातील बाराही महिन्यात केव्हाही करता येते. अति उष्ण व दमट हवामान या पिकास मानवत नाही. त्यासाठी कोरडे हवामान या पिकास उत्तम असते.
- ढेमसे जाती व बियाणे :-
महोदया टिंडा,महिको एम टी एन एच 1, अण्णामलाई इत्यादी बियाणे वापरावे. एक एकरासाठी दोन किलो बियाणे पुरेसे होते. या बियाण्याचे कवच इतर पिकाचे बियाणे पेक्षा कडक असल्याने उगवण फार कमी होते.त्यासाठी एक लिटर पाणी कोमट करून त्यात पाचशे मिली गोमूत्र टाकून एक किलो बी रात्रभर भिजत ठेवावे. नंतर सावलीत सुकवून लावावे.
- लागवड पद्धत:-
हलक्या जमिनीत लागवड करायची असेल तर तीन बाय दोन फूट अंतर ठेवावे व जमीन चांगली असेल तरअंतर पाच बाय दोन फूट ठेवावे. भारी असलेल्या जमिनीत वेलांची वाढ भरपूर होते. बीपी लावताना सुरुवातीला ह्युमिक 98% सेंद्रिय खत एक एक चमचा टाकून त्यात बी लावावे. त्याने जमीन भुसभुशीत होऊनजारवा व वेल वाढीस मदत होते.
• खत व पाणी व्यवस्थापन:- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पिकास रासायनिक खत देऊ नये. रासायनिक खत वापरल्याने पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या पिकासाठी शेणखत उत्तम असते. उन्हाळ्यात सात ते सात दिवसांच्या अंतराने सकाळी नऊच्या आत पाणी द्या.
थंडीत आठ ते दहा दिवसांच्या अंतराने सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत पाणी द्यावे. पाणी देताना भीजपाणी न देता हलकेसे पाणी द्यावे.
- रोग व्यवस्थापन:- या पिकांमध्ये प्रामुख्याने पांढरी माशी, फळमाशी व भुंगे इत्यादी किडींचा प्रादुर्भाव जाणवतो. हे पीक वेलवर्गीय असल्याने वेलाची वाढ जमिनीलगत पसरत असते. तसेच पाणी केसाळ लवयुक्त, मऊ असल्याने थंडीतील दव,धुके पानावर पडून बुरशी येते. उन्हाळ्यात वातावरणातील उष्ण असल्याने पाणी दिल्यानंतर जमीन तापलेली असते. त्यामुळे उष्णतेचा झाडाला झटका बसतो. त्यामुळे बुरशी व करपाया रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो.
- ढेमसे यांची तोडणी व उत्पादन :-
साधारण 35 ते 45 दिवसात फुलकळी लागते.55 ते 60 दिवसांनी तोडणी सुरू होते. फळ साधारण सफरचंदाच्या आकाराचे झाल्यावर तोडणी करावी. या अवस्थेत मालाला फिकट हिरवा पोपटी रंग येतो. एक किलो मध्येच दहा ते चौदा फळे बसतात. फळे जास्त मोठी न होऊ देता वेळेवर तोडणी करणे फायद्याचे ठरते. ढेमसे उत्पादन दोन महिने सहज चालते. तीन दिवसानंतर तोडणी करावी लागते. अशा पंधरा ते वीस तोडणी होतात. सर्वसाधारणपणे एकरी पाच ते दहा टन उत्पादन निघते.
Share your comments