![strwaberry](https://kjmarathi.b-cdn.net/media/10801/strwaberry.jpg)
strwaberry
स्ट्रॉबेरी हे तसे पाहिले तर थंड हवामानातील पीक आहे. स्ट्रॉबेरीची लागवड ही ठराविक ठिकाणीच होत असते पण अलीकडे या पिकाची लागवड इतर ठिकाणीही होऊ लागले आहे. महाराष्ट्रात स्ट्रॉबेरीच्या फळा भोवती आकर्षणाचे वलय निर्माण झाले आहे. कारण या फळाचे नाविन्य, त्यातील पोषण मूल्य आणि आपल्या देशात आणि देशाबाहेर या फळाला असलेली चांगली मागणी यामुळे भारतात स्ट्रॉबेरी खाली क्षेत्रात वाढ होत आहे स्ट्रॉबेरी चा उपयोग मुख्यत्वेकरून आईस्क्रीम, जेली, साबण, धूप, औषध तसेच सौंदर्य प्रसाधने इत्यादीमध्ये केला जातो. या लेखात आपण स्ट्रॉबेरीची लागवड व तिचे व्यवस्थापन याविषयी माहिती घेऊ.
जमिनीचा प्रकार
स्ट्रॉबेरीचा उत्तम वाढीसाठी पाण्याचा उत्तम निचरा असणारी, हलकी, मध्यम काळी, वालुकामय पोयटा, गाळाची जमीन असावी. जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक 5.5 ते 6.5 या दरम्यान योग्य असतो. भुसभुशीत वालुकामय जमिनीत स्ट्रॉबेरीचा रोपांची मुळे जोमाने वाढतात.
हवामान
या पिकासाठी थंड हवामान चांगले मानवते. हिवाळ्यात भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या दिवसात दहा अंश ते 25 अंश सेंटिग्रेड तापमानात स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी होते तसेच उष्ण हवामानात 20 ते 25 अंश सेंटिग्रेड असेल तर फुल तर फुल्ल निर्मिती होऊनफळधारणा दीर्घकाळ चालू राहते. यासाठी जास्त काळ थंडी मिळाली तर उत्तम असते.
स्ट्रॉबेरीच्या विविध जाती
स्ट्रॉबेरीच्या मुख्यत्वेकरून स्वीट चार्ली, केमरोजा, सेलवा, रानिया, कॅलिफोर्निया, रजिया, विंटरडोन इत्यादी स्ट्रॉबेरीच्या जाती आहेत.
लागवड पद्धत
या पिकाची गादीवाफ्यावर 60 बाय 30 सेंटिमीटर अंतरावर लागवड करावी. स्ट्रॉबेरीची मुळे मातीच्या वरच्या पंधरा ते वीस सेंटीमीटर पर्यंत थरातच वाढतात. स्ट्रॉबेरीच्या चांगल्या वाढीसाठी मऊ आणि भुसभुशीत गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यावर स्ट्रॉबेरीची लागवड दोन ओळी, तीन ओळी अथवा चार ओळी पद्धतीने सुद्धा केली जाते. त्यानुसार योग्य आकाराचे वाफे तयार करावेत. दोन ओळी पद्धतीसाठी 90 सेंटिमीटर रुंद व 30 ते 45 सेंटिमीटर उंची असलेल्या एका दिवसावर दोन रोपातील अंतर 30 सेंटिमीटर व दोन ओळींतील अंतर 60 सेंटिमीटर असावी. दोन ओळी पद्धतीत प्रति एकर 22 ते 25 हजार रोपे लागतात. तीन ओळी पद्धतीसाठी 120 सेंटी मीटर रुंद व 30 ते 45 सेंटिमीटर उंचीचे गादी वाफे करावेत. चार ओळी पद्धतीने लागवड होत असली तरी अंतर मशागत, फळ तोडणी, गादीवाफ्यात प्लास्टिक मल्चिंग करणे यामध्ये अडचणी येत असल्याने प्रामुख्याने दोन ओळी पद्धतीने लागवड फायदेशीर ठरते.
खत व्यवस्थापन
या पिकाची लागवड करते वेळी जमिनीत कुजलेल्या शेणखताचा जास्त वापर करावा. 40 ते 50 टन तसेच एकरी दीडशे किलो युरिया, 200 किलो सुपर फोस्पेट, 100 किलो पोटॅश द्यावे. त्यातली 200 किलो सुपर फॉस्फेट, 50 किलो पोटॅश आणि 50 किलो युरिया लागवडीच्या वेळी द्यावे. 50 किलो पोटॅश 45 दिवसांनी द्यावे. तसेच विद्राव्य खते ठिबक सिंचन मधून द्यावे. ट्रिपल सिंचन मधून दिली जाणारी खते रोपांची चांगली वाढ होण्यासाठी 19:19:19 या विद्राव्य खताची मात्रा ठिबक द्वारे एक दिवसाआड दोन ते तीन किलो द्यावे. तसेच फुल होळीच्या वस ते 40 ते 45 दिवसानंतर 0:52:34 खत एक दिवसाच्या अंतराने एक वेळ तीन ते चार किलो द्यावे. यामुळे उत्पादन वाढीस मदत होईल तसेच 0:52:34 या खताची पंधरा लिटरच्या पंपाला 40 ग्रॅम घेऊन फवारणी करावी. यामुळे फळांचा आकार वाढीसाठी मदत होते.
पाणी व्यवस्थापन
स्ट्रॉबेरी पिकास जास्त पाणी लागत नाही. तसेच जास्त काळ ओलावा राहिलास रोपांची मर आणि फळकुज होते म्हणून पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. तसेच पाण्याचा फूल व फळ धारणेच्या तान नाही पडणार याची विशेष काळजी घ्यावी. रोपाची लागवड झाली की दोन ते तीन दिवस रोज पाणी द्यावे. नंतर जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे.
रोगनियंत्रण
पानावरील ठिपके
उपाय- रिमोन 25 ते 30 मिली घेऊन फवारणी करणे.
ठिपके फळकुज – या रोगामध्ये फळांची कूज होऊन ते सडतात.
उपाय- बाविस्तीन 40 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
उत्पादन व काढणी
स्ट्रॉबेरीची पक्व झालेली फळे काढून पारदर्शक प्लास्टिकच्या कोरोगेटेड बॉक्स मध्ये प्रतवारी करून पॅकिंग करावे साधारणपणे एका झाडापासून चाळीस ते पन्नास फळ येतात व सर्व साधारण आठ ते 12 टन उत्पादन मिळते.
Share your comments