
serpentine crop
भारतात शेती हा एक प्रमुख व्यवसाय आहे. भारतातील जवळपास अर्ध्याहुन अधिक जनसंख्या हि शेतीशी निगडित आहे. भारतात आता अनेक शेतकरी पारंपरिक पिकाला फाटा देत आहेत आणि औषधी तसेच नकदि पिकाला प्राधान्य देत आहेत, तसेच औषधी पिकातून चांगली मोठी कमाई देखील करत आहेत. सर्पगंधा हि देखील अशीच एक औषधी वनस्पती आहे. याची लागवड करून शेतकरी राजा लाखों रुपयांचे उत्पन्न प्राप्त करत आहेत.
सर्पगंधा वनस्पतीचे सर्व भाग जसे की, पाने, बिया, मुळी इत्यादी विकले जातात आणि ह्याला बाजारात मोठी मागणी देखील आहे. सर्पगंधा हि भारतात मोठया प्रमाणात पिकवली जाते. याची लागवड प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ ह्या राज्यात केली जाते. सर्पगंधा लागवड हि भारतात अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे पण याला व्यापारी स्वरूप प्राप्त हे गेल्या काही दशकापासून प्राप्त होत आहे. सर्पगंधा लागवड करून शेतकरी बांधव मोठी कमाई करू शकतात कारण की, सर्पगंधा वनस्पतीला मोठी मागणी आहे आणि शिवाय हि वनस्पती हि चांगल्या किंमतीत विकली जाते, सर्पगंधाच्या बिया ह्या 3000 रुपये किलो पर्यंत विकल्या जातात, त्यामुळे याच्या लागवडिकडे शेतकरी बांधव वळताना दिसत आहेत. मित्रांनो आज आपण सर्पगंधा लागवडिविषयी जाणुन घेणार आहोत.
कशी करणार सर्पगंधाची शेती
शेतकरी मित्रांनो जर तुम्हीही सर्पगंधाची लागवड करण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम सर्पगंधा लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड करावी. सर्पगंधा लागवड हि सुपीक जमिनीत करावी.
सर्पगंधा लागवड करण्याआधी पूर्वमशागत करणे महत्वाचे ठरते. सर्व्यात आधी जमीन चांगली नांगरून घ्यावी. नांगरणी केल्यानंतर शेतात चांगल्या क्वालिटीचे कुजलेले शेणखत टाकावे. शेतकरी मित्रांनो पेरणीपूर्वी बियाणे हि 12 तास पाण्यात बुडवून ठेवावे लागते. बियाणे भिजवून पेरणी केल्यास झाडाची वाढ व उत्पादन चांगले येते, असे सांगितले जाते. सर्पगंधा लागवड हि बियाणे पेरणी करून, तसेच सर्पगंधा हि मूळ्या लावून देखील लावली जातात. यासाठी सर्पगंधाच्या मुळास माती व वाळू मिसळून पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये ठेवले जाते. एका महिन्यात ह्या सर्पगंधाच्या मुळ्यांना नवीन मुळे उगवतात, तेव्हा याला शेतात लावले जाते.
ह्या गोष्टींची काळजी घ्या
»
जेव्हा सर्पगंधाचे झाड संपूर्ण विकसित होतात, तेव्हा त्याला फुले लागायला सुरवात होते.
»मित्रांनो कृषी तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, जेव्हा सर्पगंधाच्या झाडाला पहिल्यांदा फुल येतात, त्या फुलांना तोडून घेतले पाहिजेत आणि मग जेव्हा फुले हे दुसऱ्यांदा लागतात तेव्हा त्याच्यापासून बियाणे हे तयार केले पाहिजे. »सर्पगंधा झाडापासून शेतकरी बांधव आठवड्यातून दोनदा बियाणे हे प्राप्त करू शकतात.
»तसे बघायला गेलं तर, सर्पगंधाचे झाड हे 4 वर्षांपर्यंत फुले आणि बिया देण्यास समर्थ असते. परंतु कृषी तज्ञ फक्त अडीच वर्ष सर्पगंधापासून उत्पन्न घेण्याची शिफारस करतात. याचे महत्वाचे कारण म्हणजे अडीच वर्षानंतर ह्यापासून मिळणाऱ्या मालाची गुणवत्ता कमी होऊन जाते आणि परिणामी त्याला चांगला भाव मिळत नाही.
Share your comments