1. कृषीपीडिया

'ह्या' औषधी वनस्पतीची लागवड वाढवणार शेतकऱ्यांचे उत्पन्न; एक वेळेस लागवड केली की पाच वर्ष मिळते उत्पादन

आजच्या आधुनिक युगात शेतीमध्ये अनेक बदल पाहवयास मिळत आहेत. शेतकरी आता पारंपरिक पिकाला फाटा देत आहेत आणि नकदी पिकाला प्राधान्य देत आहेत. औषधी वनस्पती देखील अशाच नकदी पिकांमध्ये मुडते. औषधी वनस्पती शेतकऱ्यासाठी एक वरदान सिद्ध होत आहे अनेक शेतकरी औषधी वनस्पतीची लागवड करून बक्कळ पैसा कमवीत आहेत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
pipali plant

pipali plant

आजच्या आधुनिक युगात शेतीमध्ये अनेक बदल पाहवयास मिळत आहेत. शेतकरी आता पारंपरिक पिकाला फाटा देत आहेत आणि नकदी पिकाला प्राधान्य देत आहेत. औषधी वनस्पती देखील अशाच नकदी पिकांमध्ये मुडते. औषधी वनस्पती शेतकऱ्यासाठी एक वरदान सिद्ध होत आहे अनेक शेतकरी औषधी वनस्पतीची लागवड करून बक्कळ पैसा कमवीत आहेत.

औषधी वनस्पतीची वाढती मागणी पाहून अनेक शेतकरी याची लागवड करायला प्रवृत्त होत आहेत. आयुर्वेदिक औषधी निर्मिती पासुन ते अनेक कॉस्मेटिक बनवणाऱ्या कंपनीत ह्या औषधी वनस्पतीची मागणी जोर पकडत आहे. असे असले तरी मागणी आणि पुरवठा ह्यात मोठी तफावत आहे, पाहिजे तेवढा पुरवठा औषधी वनस्पतीचा होत नाही आहे आणि त्यामुळे ह्याची लागवड करून शेतकरी चांगला नफा कमवीत आहेत. मार्केट मध्ये अनेक अशा आयुर्वेदिक औषधी कंपन्या आहेत ज्या औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी कॉन्ट्रॅक्ट शेतकऱ्यांना देत आहेत याचा देखील फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी औषधी वनस्पतीची लागवड करण्याची शिफारस केली जाते. सरकार देखील औषधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहे.  त्यासाठी शासन अनेक योजना चालवीत आहे तसेच काही राज्य सरकार तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांना अनुदान देखील देत आहे. अशाच औषधी वनस्पती पैकी एक वनस्पती आहे पिपली. पिपलीला पिम्पली तसेच पान पिपली देखील म्हटले जाते. इंग्लिश मध्ये पिपलीला इंडियन लौंग पीपर (Indian Long papper) असे म्हटले जाते

पिपलीचा अनेक आजारात केला जातो उपयोग

पिपली वनस्पती अनेक आजारात एक रामबाण उपाय म्हणुन वापरले जाते. सर्दी, खोकला, दमा, ब्राँकायटिस, श्‍वसनाचे आजार, जुनाट ताप यासारख्या इत्यादी आजारावर या पिपली वनस्पतीचा उपयोग केला जातो. याची फळे, मूळी आणि देठाचा प्रामुख्याने उपयोग हा केला जातो. एवढेच नाही तर अपचन, लघवीचे आजार, कावीळ, आमांश, पोट फुगणे आणि पोटाच्या इतर आजारांवर देखील पिपली वनस्पती फायदेशीर असल्याचा दावा केला जातो.

पिपली लागवड करताना ह्या बाबींची घ्या काळजी

शेतकरी मित्रांनो जर आपणही पीपली लागवड करण्याचा विचार करत असाल तर खाली दिलेल्या गोष्टींची काळजी घ्या: »पिपली वनस्पतीची लागवड करण्याआधी या वनस्पतीची माहिती जाणुन घ्या.

»पिपली वनस्पतीच्या सुधारित वाणांची निवड करून मग ह्या वनस्पतीची लागवड करा. ह्याच्या सुधारित वाणांची लागवड करून शेतकरी बांधव चांगले उत्पादन हे प्राप्त करू शकतात.

»पिपली वनस्पतीच्या ननसारी, चिमठी आणि विश्वम या सुधारित जातींची लागवड करण्याचा सल्ला हा कृषी वैज्ञानिक देतात. ह्या सुधारित जातींची लागवड करून शेतकरी बांधव चांगले उत्पन्न मिळवू शकतात असा दावा केला जातो.

 

»ह्या वनस्पतीच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड केली गेली पाहिजे आपण लाल माती, वालुकामिश्रित चिकणमाती अशा जमिनीत याची लागवड करू शकता. जमीन हि पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. तसेच आपण काळ्या, मध्यम आणि भारी वालुमिश्रित माती असलेल्या जमिनीत देखील याची लागवड करू शकता.

»ज्या जमिनीत आपण याची लागवड करणार त्या जमिनीत पाण्याचा निचरा हा चांगला झाला पाहिजे तसेच पावसाचे पाणी शेतात तुंबणार नाही याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे.

English Summary: cultivation of pipali is a medicinal plant and useful for health Published on: 15 November 2021, 09:29 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters