कलौंजीची अल्पशी माहिती (What Is Kalonji)
कलौंजीला आपल्याकडे काळे तीळ असे म्हणूनही ओळखले जाते, काही लोक ह्याला काळे जिरे असे म्हणूनही संबोधतात. कालोंजी एक औषधी वनस्पती आहे, आणि कलौंजीची लागवड ही मुख्यता औषधी उपयोगासाठी केली जाते. कलोंजीचा वापर बियाच्या स्वरूपात केला जातो.
. त्याची बियाणे आकाराने लहान असतात, आणि ती काळ्या रंगाची असतात. कलौंजीच्या बियाची चव थोडी तिखट अशी असते. याचा उपयोग नान, भाकरी, केक आणि लोणच्यामध्ये आंबटपणा आणण्यासाठी केला जातो. कलोंजीचा वापर औषधात उत्तेजक, अँथेलमिंटिक आणि अँटी-प्रोटोझोआ म्हणून केला जातो.
कलौंजीच्या लागवडीसाठी जमीन, हवामान कसे बरं असावे Nigella Sativa Cultivation
कालोंजीच्या लागवडीसाठी सेंद्रिय पदार्थ असलेली रेताड चिकणमाती असलेली जमीन उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. तसेच, पाण्याचा निचरा होणारी जमीन ही कालोंजीच्या लागवडीसाठी उपयुक्त असते, आणि जमिनीचा P.H. मूल्य 6-7 दरम्यान असावे. कालोंजीच्या वनस्पतींना चांगले वाढण्यासाठी उष्णकटिबंधीय हवामान आवश्यक असते. हिवाळा आणि उन्हाळा ह्या दोन्ही ऋतुमध्ये झाडे चांगली वाढतात. त्याच्या झाडांना जास्त पाण्याची गरज नसते, त्यामुळे ती रब्बी हंगामात पण लावली जातात.
पूर्वमशागत
कलोंजीचे चांगले उत्पादन मिळवण्यासाठी बियाणे पेरण्यापूर्वी वावर चांगले नांगरले पाहिजे. यानंतर शेत काही काळ तसेच राहूद्या. जेणेकरून वावराला चांगलं ऊन लागेल त्यामुळे जमिनीत असणारे किड मरून जाते, यानंतर शेतात चांगले क्वालिटीचे जुने शेणखत टाकावे. फळी मारून वावर व्यवस्थित समतलं करून घ्या आणि त्यात बेड बनवा आणि त्यात बियाने पेरून टाका. पेरणीपुर्वी बिजप्रकिया करणे खुप महत्वाचे असते त्यामुळे योग्य प्रमाणात थिरम मिसळून पेरणीपुर्वी बियाण्यावर प्रक्रिया करा. सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या कालावधीत कलौंजीची लागवड करणे खुप फायदेशीर असते असे सांगितले जाते.
कलौंजीच्या पिकासाठी पाणी व्यवस्थापन कसे ठेवावे बरं
कालोंजीच्या झाडांना जास्त पाण्याची मुळीच गरज नसते, पण बियाणे पेरल्यानंतर लगेचच पहिले पाणी फिरवून द्यावे म्हणजेच पिकाला अंकुरायला सोपे असते आणि ह्यामुळे पिकाची वाढ मस्त होते.
कालोंजी पिकांमध्ये निंदनी, खुरपणी करायची फारशी अशी गरज नसते. परंतु बीयाणे पेरल्यानंतर 20-25 दिवसांनी नैसर्गिक पद्धतीने निंदनी, खुरपणी करून तण काढून टाकावे. यानंतर, आणखी दोन ते तीन खुरपणी कराव्या लागतात. पहिल्या खुरपणी नंतर 15-15 दिवसाच्या अंतराने नंतरच्या निंदण्या उरकवून टाकायच्या.
रोग आणि कीटकांचा प्रादुर्भाव आणि नियंत्रण कसे बरं करणार
कलौंजीच्या झाडांमध्ये रोग हे प्रामुख्याने बियाणे अंकुरणाच्या वेळी दिसतात. कटवा अळीच्या प्रादुर्भावामुळे वनस्पती पूर्णपणे नष्ट होते. ह्या अळीच्या प्रादुर्भावमुळे होणारा रोग झाडांच्या जमिनीच्या पृष्ठभागाजवळ हल्ला करतो. क्लोरपायरीफॉसची योग्य प्रमाणात फवारणी करून हा रोग टाळता येतो. रूट रॉट हा रोग देखील कलौंजीमध्ये आढळतो, मुख्यता पावसाळ्यात वावरात पाणी साचल्यामुळे हा रोग वाढतो.
ह्या रोगामुळे झाडाची मुळे सडण्यास सुरवात होते आणि झाडाची पाने पिवळी पडतात आणि कोमेजतात. या प्रकारचे रोग टाळण्यासाठी, पाणी वावरात साचणार नाही ह्याची काळजी घ्या म्हणजे हा रोग होणार नाही.
कलौंजीची काढणी कधी होते बरं? (Kalonji Harvesting)
लागवडीनंतर 130 ते 140 दिवसांनी कालोंजीची झाडे पिक देण्यासाठी तयार होतात. पिकल्यानंतर त्याची झाडे मुळासह उपटली पाहिजेत. यानंतर, ते गोळा केले पाहिजे आणि उन्हात चांगले वाळवले पाहिजे. झाडे पूर्णपणे सुकल्यानंतर, कालोंजीच्या बिया लाकडाने मारून काढल्या पाहिजेत. एक हेक्टर क्षेत्रात कलोंजीची झाडे सुमारे 10 क्विंटल उत्पादन देतात. कालोंजीची बाजार किंमत 500-600 रुपये प्रति किलो आहे.
Share your comments