शेतकरी मित्रांनो जर तुम्हीही जेट्रोफाची लागवड करत असाल किंवा करण्याच्या तयारीत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी. साध्या स्पेलरद्वारे जट्रोफाच्या बियांमधून तेल काढले जाते. तेल फिल्टर केल्यानंतर बायोडिझेल तयार केले जाते, ते ट्रॅक्टर, जनरेटर,रेल आणि इतर सर्व प्रकारच्या जड डिझेल वाहनामध्ये याचा वापर केला जातो. त्यामुळे त्याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
जट्रोफा ज्याला आपण मोगली एरंड असं सुद्धा म्हणतो असं सांगितलं जात की मुगल काळात मुगल ह्याचा वापर मशाल पेटवण्यासाठी करत म्हणुन ह्याला मोगली एरंड असं संबोधलं जात. जेट्रोफा एक झुडुपी वनस्पती आहे. ह्याचे झाड फार लवकर परिपक्व होते. देशातील अनेक राज्यांमध्ये याची लागवड केली जाते, कारण याची शेती फायद्याचा सौदा ठरत आहे. हळूहळू त्याची मागणी देखील वाढत आहे.
ह्याच्या बियांमधून बरेच तेल बाहेर येते जे जड वाहणांचे इंजिन चालवण्यासाठी वापरले जाते. अशा परिस्थितीत, जेव्हा डिझेलचे भाव गगनाला भिडत असतात, तेव्हा हे बायोडिझेल एक चांगला पर्याय असू शकतो. या व्यतिरिक्त, लोक त्यांच्या बागेत सजावटीसाठी देखील त्याची लागवड करतात. पडीक व नापीक टाकाऊ जमीन हिरवीगार करण्यासाठीही याची लागवड केली जाते.
सरकारने घेतला मोठा निर्णय
सरकारने डिझेलमध्ये मिसळत असंलेल्या बायोडिझेलवरील जीएसटी दर 12 टक्क्यांवरून 5 टक्के केला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की यामुळे बायोडिझेलची मागणी वाढेल.
त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
जट्रोफाचे फायदे
शेतकरी त्यांच्या शेताच्या आसपास जट्रोफाची रोपे लावतात, ज्यामुळे ती शेताभोंवती कुंपण करण्यासाठी पण होते आणि साहजिकच पिकांचे जनावरांपासून संरक्षण होते. याशिवाय जत्रोफाच्या बिया तेलासाठी वापरल्या जातात. साबण त्याच्या तेलापासून बनवले जाते. जट्रोफामध्ये औषधी गुणधर्म देखील आहेत. यामध्ये "जॅट्रोफिन" नावाचा घटक आढळतो. ज्यामध्ये कॅन्सरविरोधी घटक आहेत. त्याचे तेल कर्करोगाशी संबंधित औषधांमध्ये वापरले जाते. त्वचेच्या आजारांमध्ये (दाद, खरुज, खाज सुटणे, संधिवात, अर्धांगवायू) इत्यादींमध्येही याचा वापर केला जातो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जट्रोफाच्या बियांमधून तेल सामान्य स्पेलरद्वारे काढले जाते. तेल फिल्टर केल्यानंतर, ते ट्रॅक्टर, जनरेटर, रेल आणि सर्व प्रकारच्या डिझेल वाहनेमध्ये वापरले जाते. त्यामुळे त्याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
जेट्रोफासाठी जमीन आणि हवामान
जट्रोफा लागवडीसाठी कोणत्याही प्रकारच्या जमिनीचा वापर केला जाऊ शकतो. हे सर्व प्रकारच्या जमिनीत पिकवले जाऊ शकते. परंतु हे लक्षात ठेवा की जिथे त्याची लागवड केली जात आहे, तिथे पाणी साचू नये. ह्या पिकासाठी जास्त पाणी लागत नाही.
पूर्वमशागत व लागवड
जट्रोफाच्या लागवडीपूर्वी शेत तयार करण्यासाठी तीन ते चार वेळा चांगली नागरणी करावी लागते. ह्या पिकाची लागवड पाऊस सुरू होण्यापूर्वी केली जाते. लागवडीसाठी वनस्पती 5 x 45 सें.मीचे खड्डे बनवा आणि प्रत्येक खड्ड्यात एक टोपली कंपोस्ट खत आणि 200 ग्रॅम निंबोळी पावडर मिसळून खड्डा भरला पाहिजे. रोपांच्या पुनर्लावणीच्या वेळी, प्रत्येक खड्ड्यात सुमारे 20 ग्रॅम युरिया + 120 ग्रॅम सुपरफॉस्फेट + 15 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश मिसळावे. जट्रोफा दुसऱ्या वर्षी सुमारे 25 ते 30 क्विंटल, तिसऱ्या वर्षी 40 ते 50 क्विंटल, चौथ्या वर्षी 60 ते 80 क्विंटल आणि पाचव्या वर्षी 100 ते 120 क्विंटल उत्पादन देऊ शकते.
Share your comments