फ्रेंच बीनची लागवड भारतात जास्त होते. याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये उच्च दर्जाची प्रथिने असतात.फ्रेंच बीन हे शेंगवर्गीय असल्याने हे चवीला अतिशय चविष्ट आणि पौष्टिक आहे. फ्रेंच बीन हे खरिपात घेतले जाणारे कमी कालावधीचे पीक आहे. या लेखात आपण फ्रेंच बीन ची लागवड पद्धतिविषयी माहिती घेऊ.
फ्रेंच बिनच्या लागवडीसाठी लागणारे हवामान आणि हंगाम
भारतातील समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय प्रदेशात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यासाठी 21 डिग्री सेल्सियस च्या आसपासची तापमान चांगले मानवते. फ्रेंच बिनीच्या जास्त उत्पादनासाठी 16 ते 24 अंश सेल्सिअस तापमान हे श्रेयस्कर आहे. तसेच वार्षिक पन्नास ते दीडशे सेंटीमीटर पावसाची आवश्यकता असते. या पिकाची काढणी थंडी पूर्वी करावी लागते कारण हे पीक थंडीसाठी खूप संवेदनशील आहे. जास्त पावसामुळे शेतात जर पाणी साचले तर फूल गळती होते त्यासोबतच विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. या शिवाय फ्रेंच बिनची शेती ही फेब्रुवारी ते मार्च आणि मैदानी भागात आक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत केली जाते.
फ्रेंच बीन लागवडीसाठी जमिनीची तयारी
लागवडीपूर्वी शेतजमीन व्यवस्थित नांगरून त्यामध्ये शेणखत मिसळावे. योग्य आकाराचे बेड तयार केले जातात तसेच मैदानी भागामध्ये जमिनीची दोनदा नांगरणी करावी लागते. जमिनीची मशागत करून पेरणीसाठी जमीन तयार केली जाते.
पेरणी प्रक्रिया
फ्रेंच बीन बियाणे वर्षातून दोनदा दोन वेगवेगळ्या हंगामात पेरता येते. पेरणीची वेळ देखील शेताच्या प्रकारानुसार बदलते. जानेवारी फेब्रुवारी मध्ये पेरता येते आणि जुलै सप्टेंबर मध्ये ही पेरता येते.
फ्रेंचबीनचे सुधारित वाण
1-अर्काकोमली- आय आयएच आर बेंगलोर ने विकसित केलेली ही फ्रेंच बीन जाती मोठ्या तपकिरी बिया असलेल्या सरळ, सपाट आणि हिरव्या शेंगा तयार करते. या वाणापासून हेक्टरी 19 टन शेंगा आणि हेक्टरी तीन टन बियाणे उत्पन्न होते.
2-अर्कासुबिधा- फ्रेंच बीनची ही जात आय आयएच आर बेंगलोर ने विकसित केली आहे. अंडाकृती आणि हलक्या हिरव्या रंगाच्या शेंगा तयार होतात.70 दिवसात हेक्टरी19 टन उत्पादन मिळते.
3- पुसापार्वती- हे वान भारतीय कृषी संशोधन संस्था,कॅट्रिन यांनी विकसित केले आहे. याच्या शेंगा हिरव्या, गोल आणि लांब असतात.हेमोसैक आणि पावडर बुरशीला प्रतिरोधक आहे.
4-पुसाहिमालय- ही जात भारतीय कृषी संशोधन संस्थांनी विकसित केली आहे. या जातीचे बीन्स आकाराने मध्यम, गोलाकार,मांसल असतात.ही जात 26 टन प्रति हेक्टर उत्पादन देते.
5-व्हीएलबोनी 1-ही फ्रेंच बीन जात व्हीपीकेएस, अल्मोडा यांनी विकसित केले आहे. एक बटू जाती आहे. याच्या शेंगा गोल आणि हलक्या हिरव्या रंगाचे असतात. ही जात हेक्टरी दहा ते अकरा टन उत्पादन देते.(संदर्भ- हॅलो कृषी)
Share your comments