आपल्याकडे आता बर्याच ठिकाणीउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून परदेशी भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जातआहे. मोठ्या शहरांमध्ये या भाजीपाल्याची मागणी फार मोठ्या प्रमाणात आहे.या पद्धतीने नवीन तंत्रज्ञानावर आधारित पिकवलेली फळेभाजीपाल्याला चांगली मागणी असल्याने अशा बाजार पिकवणे फायदेशीर आहे. हायड्रोपोनिक्स किंवा एक्वापोनिक्सतंत्रज्ञानाद्वारे उत्तम प्रकारेदेशी भाजीपाल्याचे उत्पादन घेता येऊ शकते.म्हणून या लेखामध्ये आपणकाही विदेशी भाज्यांची माहिती घेणार आहोत.
विदेशी भाजीपाला
- लाल तुलसी(Red besil)
आपल्याला हिरवी तुळस माहिती आहे परंतुलाल दिवस बद्दल माहिती नाही. लाल तुळस ही एक खास भाजी आहे.या विदेशी भाजिचीकिंमत 600 रुपये प्रति किलो आहे. मोठ्या हॉटेल्स मध्ये याला फार मोठी मागणी असते. तसेच ही भाजी आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
- लाल स्वीस चार्ड-ही भाजी बीटसारखी दिसते. याची किंमतही प्रतिकिलो सहाशे रुपयांपर्यंत आहे.असे म्हणतात की पावसाळ्यातया भाजीचे भाव प्रतिकिलो बाराशे रुपयांपर्यंतअसतात.ही एक सॅलड भाजी आहे पोषक तत्वांनी समृद्ध आहे.
- लोला रोजा-
या भाजीपाला पिकाची पाने खूप सुंदर असतात. त्याच्या चारही बाजूंनी लाल रंग आणि मध्यभागी हिरवा रंग असतो. हा भाजीपाला देखील आरोग्यासाठी चांगला असल्याचे म्हटलेजाते. या भाजी ची किंमत प्रति किलो 500 रुपये आहे. ऍलर्जी आणि दमा असलेल्या लोकांना याचा फायदा होता.
ग्रींन स्विस चार्ड-
या भाजीची पाने बर्गर मध्ये सॅलड म्हणून वापरली जातात. या भाजीचा इतर भाग देखील खूप फायदेशीर आहे.ज्यामध्ये जीवनसत्वे आणि बऱ्याच प्रकारचे पौष्टिक पदार्थ असतात.या भाजीचे दोन महत्त्वाचे फायदे आहेत.ते म्हणजेही भाजी खूप चवदार असते आणि दुसरे म्हणजे यामुळे डोळ्यांना फायदा होतो. ज्या ठिकाणी बर्गर बनवले जातात तिथे याची खास मागणी असते.
या प्रकारचा भाजीपाला हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे वाढवू शकता. हायड्रोपोनिक तंत्रात मातीशिवाय शेती केली जाते. हा एक आधुनिक शेतीचा प्रकार आहे. आपण या तंत्राद्वारे आपल्या टेरेसवर देखील करून पैकी कोणताही विदेशी भाज्या पिकवू शकतात.या भाज्यांची मागणी शहरातील मोठ्या हॉटेल्स, रिसोर्टमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते.त्यामुळे तेथे या भाज्यांची वर्षभर मागणी असते.
(माहिती स्त्रोत-mhlive 24)
Share your comments