1. कृषीपीडिया

शेतकरी बांधवांनो फुलकोबी लागवड करताय का? जाणुन घ्या फुलकोबी लागवडी विषयी

फुलकोबीची अल्पशी माहिती फुलकोबीचे पराठे आणि भाज्या तुम्ही अवश्य खाल्ल्याच असतील. ही एक अतिशय चवदार भाजी आहे. फुलकोबीमध्ये खनिज-लवण, व्हिटॅमिन-बी आणि प्रथिने पर्याप्त प्रमाणात आढळतात. फुलकोबी ही वर्षायू वनस्पती ब्रॅसिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ब्रॅसिका ओलेरॅसिया (प्रकार बॉट्रिटिस) आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
cauliflower

cauliflower

फुलकोबीची अल्पशी माहिती

फुलकोबीचे पराठे आणि भाज्या तुम्ही अवश्य खाल्ल्याच असतील.  ही एक अतिशय चवदार भाजी आहे.  फुलकोबीमध्ये खनिज-लवण, व्हिटॅमिन-बी आणि प्रथिने पर्याप्त प्रमाणात आढळतात.

फुलकोबी ही वर्षायू वनस्पती ब्रॅसिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ब्रॅसिका ओलेरॅसिया (प्रकार बॉट्रिटिस) आहे.

भारतात फुलकोबीची लागवड सर्वत्र केली जाते. सामान्य व्यवहारात या भाजीला ‘फ्लॉवर’, ‘फुलवर’ असेही म्हणतात.

फुलकोबीचा वापर भाजी, सूप आणि लोणचे म्हणून केला जातो.  बाजारपेठेत त्याची मागणी वर्षभर कायम असते.  फुलकोबी कमी किंमतीसह अधिक फायदा देणारे पीक आहे.

 फुलकोबीसाठी लागणार हवामान

हवामान

फुलकोबी एक थंड हवामानातं येणारी वनस्पती आहे. रबी हंगामात त्याची लागवड करणे चांगले. अन्यथा उच्च तापमान फुलकोबी लागवडीस हानी पोहचू शकते.  यासाठी, 15 डिग्री सेंटीग्रेड ते 25 सेंटीग्रेड तापमान सर्वात योग्य आहे.अति प्रमाणात दंव फुलकोबी पिकाचे मोठे नुकसान करते.

 

फुलकोबी साठी लागणारी जमीन

 सुपीक वालुकामय, चिकणमाती फुलकोबीच्या लागवडीसाठी योग्य आहे.  मातीचे पीएच 7.0 पेक्षा कमी असावे.  यासाठी, आपण माती परीक्षण करणे आवश्यक आहे.  सपाट आणि चांगल्या निचरा होणाऱ्या जमिनीत याची नेहमी लागवड करावी.

 सुधारित वाण

मे-जून - पुसा दिपाली, पंजाब कुआरी, पुसा केतकी

जूलै-ऑगस्ट - इम्पुव्हड जापानीज, पंत शुभ्रा, पाटणा मिडसिझन

सप्टेंबर-ऑक्टोबर - पूसा सिंथेटिक, पूसा शुभ्रा, हिसार-१

नोव्हेंबर - डिसेंबर - स्नो बॉल१६, के - १, स्नोबॉल - १

 फुलकोबी लागवडीसाठी जमीन तयार करणे

 फुलकोबी सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत लावली जाते.

 सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतात दोन वेळेस नांगरणी करा.

 शेतात शेणखत घाला आणि चांगल्या रीतीने मातीमध्ये मिसळा.

 नागरणी केल्यावर शेत सपाट व कोसळलेले बनवा.

 यानंतर 50 सेंटीमीटर अंतरावर शेतात एक वाफा बनवा.

 शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ती व्यवस्था करुन घ्यावी.

 

बियाण्याचे प्रमाण

६०० ते ७५० ग्रॅम/ हेक्टरी, हंगामानुसार वाण निवडणे महत्वाचे आहे.

लागवडीचे अंतर

६० x ४५ सें.मी. किंवा ४५ x ४५ सें.मी.

 खत व्यवस्थापन

२० टन शेणखत, १५०:७५:७५ किलो नत्र:स्फुरदः पालाश प्रति हेक्टरी, ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी व उर्वरित ५० टक्के नत्र लागवडीनंतर १ महिन्याने द्यावे.गंधक कमतरता असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट आणि अमोनिअम सल्फेटचा वापर करावा.

 आंतरमशागत पाणी व्यवस्थापन

दर १५-२० दिवसणी नियमित खुरपणी [निंदण] करावे,तसेच ८-१० दिवसांच्या अंतराने पिकाला पाणी देणे.गड्डा धरून आल्यावर पिकाला मातीची भर देणे कारण त्यामुळे गड्डयाचे वजन वाढल्यास रोपे तुटणार नाही.गडड्याचा रंग पांढरा असल्यास कोबिला चांगला भाव मिळतो त्यासाठी गडड्याला पाणांनी सभोवताल झाकून घ्यावे त्यामुळे सूर्यप्रकाश न पडता त्याचा रंग पांढरा होईल.

 

काढणी

फूलकोबी चा गडडा पिवळसर पडण्‍यापूर्वी काढावा.

तयार गडडा हातास टणक लागतो. तयार गडडा जादा काळ तसाच ठेवला तर पाणी दिल्‍यावर तो फूटून नुकसान होण्‍याचा संभव असतो.

म्‍हणून तो वेळीच काढून घ्‍यावा.

फूलकोबीचे 100 ते 200 क्विंटल हेक्‍टरी उत्‍पादन घेता येते.

 

English Summary: cultivation of cauliflower and management Published on: 14 September 2021, 11:11 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters