नमस्कार मित्रांनो भारतात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे आणि देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती किंवा शेतीनिगडित कामाशी संबंधित आहे आणि त्यांची उपजीविका ही शेतीवर आधारित आहे. हेच कारण आहे की भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. भारतात गेल्या दशकपासून शेतीत अमूलाग्र बदल घडून येत आहेत.
आता सुशिक्षित नवजवान शेती क्षेत्राकडे वळत आहेत आणि आपले करिअर शेतीमध्ये आजमावत आहेत. आता शेतकरी पारंपरिक पिक पद्धतीला फाटा देत आहेत आणि नकदी पिकांची लागवड करत आहेत अशाच नकदी पिकांमध्ये औषधी वनस्पतीचा समावेश होतो. आज आम्ही आपल्या कृषी जागरणच्या वाचक मित्रांसाठी अशाच एका औषधी वनस्पतीची माहिती घेऊन आलो आहोत आणि ती वनस्पती आहे तेजपत्ता. शेतकरी मित्रांनो आपणही तेजपत्ता लागवड करून चांगली कमाई करू शकता. चला तर मग वेळ न दवडता जाणुन घेऊया तेजपत्ता लागवडिविषयी.
तेजपत्ताला इंग्रजी मध्ये बे लीफ असे म्हटले जाते. तेजपत्ता ही एक औषधी वनस्पती आहे शिवाय हे एक प्रमुख मसाला पिक आहे. ह्याची मागणी ही वर्षभर भारतीय बाजारात बनलेली असते. त्यामुळे ह्याची लागवड ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरू शकते.
तेजपत्ता हा एक सुगंधित मसाल्याचा पदार्थ आहे ह्याचा वापर हा भारतीय स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात केला जातो. भाजीला चव यावी तसेच भाजीला सुगंध यावा म्हणून तेजपत्ताच्या पानांचा वापर हा आहारात केला जातो. अनेक वर्षांपासून तेजपत्ता शेती केली जात आहे. बे लीफ अर्थात तेजपत्त्याची अनेक देशांमध्ये लागवड केली जाते. ह्याची लागवड ही भारतात देखील मोठया प्रमाणात केली जाते. तसेच भारताशिवाय ह्यांचे उत्पादन हे रशिया, मध्य अमेरिका, इटली, फ्रान्स उत्तर अमेरिका आणि बेल्जियम देशात केली जाते. भारतात अजूनही ह्याच्या लागवडीत खुप वाव असल्याचे सांगितले जाते.
तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तेजपत्ता लागवड करू शकतात. सुरवातीच्या टप्प्यात थोडी मेहनत घ्यावी लागेल परंतु नंतर ह्यापासून मोठया प्रमाणात उत्पादन हे घेतले जाऊ शकते. ह्याच्या शेतीसाठी तुम्हाला प्रशिक्षण घ्यावे लागेल तुम्ही कृषी वैज्ञानिकचा सल्ला घेऊन ह्याची शास्त्रीय पद्धत्तीने लागवड करून चांगली कमाई करू शकतात.
जर आपणही तेजपत्ता लागवड करू इच्छित असाल तर ह्याच्या लागवडसाठी शासन सबसिडी सुद्धा पुरविते. ह्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाकडून 30 टक्के सबसिडी ही दिली जाते.
जर तेजपत्ता पिकाच्या उत्पन्नाचा विचार केला तर. एका तेजपत्ताच्या झाडापासून कमीत कमी वार्षिक 5 हजार रुपये आपण कमवू शकता. म्हणजे, जर आपण 50 तेजपत्ताची झाडांची लागवड केली तर आपणांस वार्षिक अडीच लाख रुपयापर्यंत कमाई करू शकता. म्हणजे तेजपत्ता लागवड ही शेतकऱ्यांना लक्षाधीश बनवु शकते. पण ह्यासाठी योग्य ते मार्गदर्शन घेणे अनिवार्य आहे.
Share your comments