सुगंधित रोपे एक विशेष प्रकारची वनस्पती आहे. ज्याचा वापर एखाद्या पदार्थाला सुगंध आणिचव देण्यासाठी केला जातो. त्यापैकी बरेच औषधी उद्देशाने देखील वापरली जाते. सुगंधी संयुगे वनस्पतीच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये असतात. जसे की मूळ, लाकूड, साल,झाडाची पाने, फुल, फळ, बियाणेइ. लेमन ग्रास, खस, मेंथा,जिरेनियम इत्यादी वनस्पती सुगंधित झाडे श्रेणीमध्ये येतात.
सुगंधी तेलाचा उपयोग हा औषधी, कॉस्मेटिक, साबण आणि डिटर्जंट पावडर मध्ये केला जातो. गेल्या दोन दशकांपासून जागतिक बाजारात आवश्यक तेल, सुगंधा रसायने औषधे आणि औषधी पदार्थांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
- सुगंधित शेतीचे फायदे :-
- सुगंधी शेतीमधून अधिक उत्पन्न मिळते. पारंपारिक शेती मधून येणाऱ्या उत्पन्नाची तुलना केली तर सुगंधित शेतीमधून येणारे उत्पन्न हे दुप्पट असते. सोयाबीन गहू सारखे पारंपारिक शेतीमधून शेतकरी जवळजवळ 50 ते 60 हजार रुपये एकरी प्रति वर्ष कमवू शकतो. परंतु सुगंधित शेतीमधून प्रति एकर शेतकरी सव्वा ते दीड लाख रुपयापर्यंत उत्पन्न घेऊ शकतो.
- अतिवृष्टी, दुष्काळ इत्यादी परिस्थितीचा या शेतीवर कोणताही परिणाम होत नाही. पारंपारिक शेतीमध्ये दुष्काळामुळे, अतिवृष्टीमुळे किंवा कधी-कधी पीक कापणी करून शेतात असते ते पावसात ओली झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागते. बहुसंख्य शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन शेती साठी भांडवल उभे केले असते. जर अशा प्रकारचे नुकसान झाले तर शेतकरी आर्थिक दृष्ट्या आणि काही वर्षमागे जाऊ शकतो.परंतु सुगंधित शेतीमुळे अतिवृष्टी दुष्काळासारख्या समस्यांचा जास्त प्रभाव पडत नाही.
- या शेतीमधून रोजगार निर्माण होऊ शकतो. जसे की कापणीला शेतकऱ्यांनी जर ऊर्धपातन युनिट / उभा केला असेल तर तिथे त्याला मजूर लागतात.
- सिंचनाची कमी आवश्यकता:
सुगंधित शेतीसाठी जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता नसते. पाण्याच्या फवार्याने म्हणजे तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन सारख्या साधनांनी ही शेती करता येऊ शकते.
आपल्याकडे पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. दुष्काळग्रस्त भागांमध्येभूमिगत जलस्तर कमी होण्याची समस्या उग्र स्वरूपात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड करणे फायद्याचे ठरेल.
- जिरेनियम ची शेती:-
जगात अशा अनेक वनस्पती आहेत ज्यांची किंमत बाजारपेठेत खूपच आहे.‘जिरेनियम’ ही वनस्पती यापैकीच एक असून सुगंधी उत्पादनांमध्ये या वनस्पतीच्या तेलाला सर्वाधिक मागणी आह. आपण वापरत असलेल्या दैनंदिन सौंदर्यप्रसाधनांमध्ये जिरेनियम वनस्पतीचे तेल सर्वाधिक प्रमाणात वापरले जाते. तसे पाहायला गेल्यास भारतीय बाजारपेठेतील जिरेनियम तेलाची गरज भागवण्यासाठी परदेशातून हे तेल मोठ्या प्रमाणात आयात करावे लागते.
- जिरेनियम लागवडीचे तंत्र :-
- जिरेनियम ही एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे.लागवडीसाठी मध्यम प्रतीची जमीन आणि माळरानावर ही हे पीक घेता येईल. म्हणजे की जिथे, ट्रॅक्टरनेनांगरतायेईल अशा कोणत्याही जमिनीत जिरेनियम पिक घेता येईल.
- सर्वसाधारण 20 अंश सेल्सिअस ते 34 अंश सेल्सिअस तापमानात हे पीक चांगले येते. 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी किंवा 34 अंश सेल्सियस पेक्षा जास्त तापमानात पिकांची वाढ खुंटते. व पाहिजे तसे उत्पन्न मिळत नाही. या पिकासाठी आद्रता 75 टक्के ते 80 टक्के लागते.
- या पिकाची लागवड करताना शेतीचे योग्य प्रकारे नांगरणी व मशागत करून घेणे खूप गरजेचे असते. कारण तीन वर्ष हे पीक शेतात राहणार आहे. मशागत केल्यानंतर बेडव्यवस्थित तयार करून घ्यावेत. त्यावर ठिबक टाकावे आणि चार बाय दीड फुटावर त्याची लागवड करावी.
- या वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्षे उत्पादन मिळते.
- एका एकरामध्ये 10,000हजार रोपे लागतात. लागवडीनंतर हे पीक पहिल्यांदा चार महिन्यानंतर कापणीला येते व त्यानंतर प्रत्येक तीन महिन्याला कापणीला येते.अशाप्रकारे हे पीक एका वर्षात तीनवेळा कापणीला येते.
- विक्री सुरुवातीला खर्च 70 ते 80 हजारयेतो. इतर पिकाच्या तुलनेत फवारणी व खते यामध्ये 75 टक्के खर्च कमी आहे.
- एका एकरात 30 ते 40 किलो ऑइल वर्षाला मिळू शकते. एक लिटरऑईल किंमत जाग्याव12000,12,500 हजार रुपये मिळू शकतात. एक एकर मध्ये एका वर्षात चार ते पाच लाखाचं ऑइल मिळू शकते. एकरी उत्पादन सरासरी चार ते पाच लाख.
- या वनस्पतीची भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी :-
या वनस्पतीची भारतात तेलाची मागणी दर वर्षाला 200 ते 300 टनाची आहे. पण सद्यस्थिती पाहता भारतात वर्षाला दहा टन पण ओईल निर्मिती होत नाही त्यामुळे या अशा सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड करणे अधिक फायदेशीर ठरेल अशा या औषधी वनस्पतीची भारतात लाखो एकर शेती केली तरी कमीच
- पारंपरिक पिकांपेक्षा दुप्पट उत्पन्न
आपल्या पारंपारिक पिकापेक्षा हे पीक दुप्पट नफा देणारे आहे. या वनस्पतीवर फारशी कीड-रोग येत नाहीत.त्यामुळे खर्च कमी आहे आणि उत्पन्न जास्त आहे. कोणतेही जनावरे याचा पाला खात नाहीत. या पिकाला जास्त फवारणीची गरज नसते. निरोगी आणि शंभर टक्के उत्पन्न देणारे पीक आहे. तसेच जिरेनियम वनस्पतीच्या तेलालाशाश्वत बाजारपेठ उपलब्ध आहे. बाजारामध्ये या पिकाला हमीभाव देखील मिळतो.
- काळजी :-
जिरेनियम या पिकाच्या फांद्यांची तोडणी करून त्यापासून तेल बनवले जाते. ज्या भागात जास्त पाऊस पडतो तेथे फक्त या पिकाला पावसाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. कारण जास्त पावसामुळे पिकाच्या खालच्या भागातील फांद्या खराब होऊ शकतात.
त्यामुळे पावसाळ्यात या पिकाची काळजी घेणे गरजेचे असते. उर्वरित ऋतूंमध्ये या पिकावर काहीही परिणाम पडत नाही.
- उपयोग:-
जिरेनियम तेलापासून अनेक सुगंधी पदार्थ बनवले जातात. जसे की औषधी, कॉस्मेटिक साबण डिटर्जंट शाम्पू, सेंटर, अगरबत्ती पावडर , अशा प्रकारच्या अनेक वस्तूंमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या वस्तूंना बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अवकात नाही नंतर उरलेल्या पालापाचोळ्यापासून खत निर्मिती करता येते.
Share your comments