मित्रांनो भारतातील शेती ही सर्वस्वी पावसावर आधारित शेती आहे. यामुळे देशात मान्सून कसा आहे यावर शेतीचे भवितव्य अवलंबून असते. सध्या देशात सर्वत्र मान्सूनचे आगमन झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात देखील मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकरी बांधव खरीप हंगामातील पेरणी च्या कामासाठी लगबग करत आहे.
मित्रांनो शेतकरी बांधवांनी जर पारंपरिक पिकांसमवेतच पावसाळी हंगामात भाजीपाला वर्गीय पिकांची शेती केली निश्चितच त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. खरं पाहता, पावसाळ्यात भाजीपाल्याची सिंचनाची गरज पावसाच्या पाण्याने भागवली जाते. अशा अनेक भाज्या आहेत ज्यांची पावसाळ्यात लागवड करून शेतकऱ्यांना बंपर उत्पादन मिळू शकते.
येथे आम्ही तुम्हाला अशाच काही भाज्यांबद्दल सांगत आहोत, ज्याची लागवड करून शेतकरी योग्य नफा मिळवू शकतात. जस की आपणास ठाऊक आहे देशाच्या अनेक भागात मान्सूनने दणका दिला आहे. खरीप पिकांच्या पेरणीसाठी हा महिना सर्वात महत्त्वाचा आहे.
या सगळ्याशिवाय काही भाज्या अशा आहेत ज्या पावसाळ्यात खूप वेगाने पिकतात. पावसाळी हंगामात भाजीपाल्याला आवश्यक सिंचनाची गरज पावसाच्या पाण्याने पूर्ण होते, त्यामुळे खर्चही कमी होतो. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही भाज्यांबद्दल सांगत आहोत, ज्याची लागवड करून शेतकरी भरघोस नफा कमवू शकतात.
काकडी आणि मुळा
पावसाळ्यात काकडी व मुळ्याची लागवड करून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. या दोन्हींना वाढण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश आणि पाणी लागते. दोन्ही पिके लावण्यासाठी जास्त जागा लागत नाही. दोन्ही भाजीपाला अवघ्या तीन ते चार आठवड्यांत तयार होऊन शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो.
कारले
कारल्याच्या सेवनाने अनेक आजारांपासून दूर राहील जात. विविध रोगांवर डॉक्टर देखील त्याचे सेवन करण्याची शिफारस करतात. बाजारात कारल्याला नेहमीच मागणी असते. अशा परिस्थितीत या भाजीपाल्याची लागवड करून शेतकऱ्यांना अल्पावधीत चांगला नफा मिळू शकतो.
हिरवी मिरची आणि कोथिंबीर
हिरवी मिरची आणि कोथिंबीर लागवड करण्यासाठी, वालुकामय चिकणमाती किंवा लाल माती असलेली शेतजमीन सर्वात योग्य मानली जाते. पावसाळ्यात किचन किंवा टेरेस गार्डनमध्येही मिरचीची लागवड करता येते. तुम्ही मोठ्या आणि लहान अशा दोन्ही ठिकाणी त्याची लागवड करू शकता.
वांगी आणि टोमॅटो उत्पादन
वांगी आणि टोमॅटोची लागवड वर्षाच्या कोणत्याही वेळी करता येते. हिवाळ्यातही त्याची लागवड करता येते. मात्र, याशिवाय पावसाळ्यातही लागवड करून बंपर उत्पादन घेता येते.
Share your comments