आपला भारत देश हा एक कृषी प्रधान देश आहे. बहुतांशी आपल्या देशातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. भारतातील एकूण लोकसंख्येच्या 90 टक्के लोक ही शेती करतात आणि आपली उपजीविका करत आहेत.प्रामुख्याने आपल्यातील बरेच लोक शेती ही पारंपरिक पद्धतीने करतात त्यामुळे जास्त नफा मिळेल की नाही हे आपण सांगू शकत नाही. आपल्या कडचे शेतकरी आपल्या रानात ज्वारी बाजरी गहू मका इत्यादी पिकांची लागवड करतात.परंतु अलीकडच्या काळात शेतकरी आंतरपीक पद्धती चा वापर करून शेती करत आहे आणि त्यातून तो भरघोस नफा सुद्धा मिळवत आहे.
आंतरपिक आपण पाहिले असेल:
बऱ्याच शेतकरी वर्गाचा असा समज आहे की अंतर पीक केल्यावर उत्पन्न कमी मिळते परंतु असे काही नाही आंतरपीक करून आपण 2 पिके घेऊ शकतो त्यामुळे आपले उत्पन्न वाढते त्याच बरोबर वेळ ही वाचण्यास मदत होते.आपण आजपर्यंत ऊसाच्या रानामध्ये कांदा हे आंतरपिक पाहिले असेल किंवा उडीदामध्ये तुर हे आंतरपिक आपण पाहिले असेल पण चक्क आंब्याच्या बागेत हळदीची लागवड हे ऐकायला आपल्याला खूपच विचित्र वाटले असेल ना, परंतु हे सत्य आहे.
हेही वाचा:५० हजार रुपये गुंतवून करा अळंबीची शेती आणि पाच लाख रुपये कमवा
आंब्याच्या बागेतील (garden)झाडांच्या रिकाम्या अंतरावर असलेल्या जागेत हळद लागवड करून शेतकरी लाखो रुपये कमवू शकतात आणि आता त्याला गोवरमेंट सुद्धा प्रोत्साहन देत आहे. मसाल्यांच्या पदार्थात हळदीची मागणी नेहमीच बाजारात (market)जास्त असते, त्यामुळे हळदीचे दर नेहमी हे वाढलेले च दिसतात.उत्तर प्रदेशातील राज्यातील लखनौ मधील मध्य उप-उष्णकटिबंधीय फलोत्पादन संस्थेतील एका शेतकऱ्याने प्रथम प्रकल्पांतर्गत आंब्याच्या बागांमध्ये हळदी लागवडीला चालना दिली जात आहे.हळद हा एक मसाल्याचा पदार्थ आहे त्या सोबतच हळदीचे काही आरोग्यदायी गुणकारी उपाय सुद्धा आहेत. हळदीला बाजारात मोठ्या प्रमानात मागणी आहे सोबतच हळदीचा उपयोग वेगवेगळे सौंदर्य प्रसादने बनवण्यासाठी केला जातो आणि विविध औषध निर्मितीसाठी साठी सुद्धा हळदीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.हळदिला दुसरे नाव सोनेरी केशर असेही आहे.
नरेंद्र देवया हळदीमध्ये -2 मध्ये 5 टक्के कर्क्युमिन असते, जे शरीरातून मुक्त मूलकण काढून अनेक आजारांपासून आणि धोकादायक रोगांपासून आपल्या शरीराचे (body) संरक्षण करते. त्याचबरोबर कोरोनाची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दिवसाला किमान एक किंवा दोन वेळा हळदीचे दूध पिल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि वाढण्यास मदत होते.ही परिस्थिती ओळखून आंब्याच्या बागांमध्ये हळदीची लागवड करून शेतकरी लाखो रुपयांचा फायदा मिळवू शकतात.
Share your comments