मित्रांनो भारतात सध्या शेती व्यवसायात (Farming) मोठा बदल बघायला मिळत आहे. आता शेतकरी बांधव (Farmers) पारंपारिक पीक पद्धतीला हळूहळू का होईना फाटा दाखवत आहेत आणि नवीन नगदी पिकांची (Cash Crops) तसेच बाजारपेठेत मागणी असलेल्या पिकांची शेती करू लागले आहेत.
आपल्या राज्यात देखील गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक पिके सोडून नवीन प्रकारच्या पिकांच्या लागवड मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा देखील होत आहे.
मित्रांनो खरं पाहता, पारंपारिक पिकांमधील घटता नफा बघता शेतकरी बांधव नवनवीन प्रयोग करीत फळबाग पिकांची लागवड करीत आहेत.
अलीकडे आपल्या महाराष्ट्रात तसेच तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये अॅव्होकॅडो या फळाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाऊ लागली आहे. विशेष म्हणजे या फळाची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर देखील सिद्ध होत आहे.
लागवडीसाठी आवश्यक हवामान नेमकं कसं
खरं पाहता आपल्या महाराष्ट्रातील हवामान एवोकॅडो या फळाच्या शेती साठी सर्वोत्तम मानले जाते. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, एवोकॅडोच्या लागवडीसाठी उष्ण हवामान सर्वात योग्य असल्याचा दावा केला जातो.
मात्र थंड प्रदेशात या फळाची लागवड हानिकारक ठरू शकते. याशिवाय ज्या शेतजमिनीच्या मातीचा पीएच अर्थात सामू 5 ते 7 च्या दरम्यान असतो अशा जमिनीत या फळाची लागवड करण्याचा सल्ला दिला जातो. मित्रांनो यामध्ये भरपूर पोषक घटक असतात.
तज्ञ अनेक प्रकारच्या आजारांमध्ये याचे सेवन करण्याचा सल्ला देतात. यामुळे या फळाला बाजारात मोठी आणि बारामाही मागणी असते. यामुळे निश्चितच या फळाची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारी आहे.
5-6 वर्षांत फळ देण्यास सुरुवात होते
मित्रांनो बियाण्यापासून उगवलेले एव्होकॅडो लागवडीनंतर पाच ते सहा वर्षांनी फळ देण्यास सुरुवात करतात. जांभळ्या जातींची परिपक्व फळे जांभळ्या ते लाल रंगाची होतात, तर हिरव्या जातींची परिपक्व फळे हिरवी-पिवळी होतात.
जेव्हा फळाच्या आतील बियांच्या आवरणाचा रंग पिवळसर-पांढऱ्यापासून गडद तपकिरी रंगात बदलतो तेव्हा फळ काढणीसाठी तयार होते. काढणीनंतर सहा ते दहा दिवसांनी पिकलेली फळे तयार होतात. फळे झाडांवर असेपर्यंत कडक असतात, काढणीनंतर मऊ होतात.
व्यावसायिक पीक म्हणुन ओळख
या फळापासून प्रति झाड उत्पादन 100 ते 500 फळांच्या दरम्यान असते. सिक्कीममध्ये जांभळ्या जातीची फळे जुलैच्या आसपास काढली जातात. तर हिरव्या जातीची फळे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये काढली जातात.
या फळाची बाजारपेठ भारतात झपाट्याने विकसित होत आहे. इतर राज्यांमध्येही शेतकरी आता याच्या लागवडीकडे वळण्याचा प्रयत्न करत आहेत.
अशा स्थितीत आगामी काळात मोठे व्यावसायिक पीक म्हणून याकडे पाहिले जाऊ शकते. आपल्या राज्यात अनेक शेतकरी या फळाची शेती करीत आहेत. यामुळे येत्या काही दिवसात आपल्या राज्यात या फळाची शेती अधिक प्रमाणात बघायला मिळणार आहे.
Share your comments