1. कृषीपीडिया

मेहंदीची शेती करा आणि कमवा लाखो रुपये; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मेहंदीची शेती भारतभर केली जाते. मेहंदीचे पीक मिळवणे खूप उपयुक्त आहे. मेहंदीचा उपयोग लग्नसमारंभ आणि उत्सवांमध्ये सजावटीसाठी केला जातो. मुख्य करून शुष्क,कोरडं, कमी पाऊस असे हवामान या झाडाला (किंवा झुडपाला) जास्त मानवते.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
Mehndi

Mehndi

मेहंदीची शेती भारतभर केली जाते. मेहंदीचे पीक मिळवणे खूप उपयुक्त आहे. मेहंदीचा उपयोग लग्नसमारंभ आणि उत्सवांमध्ये सजावटीसाठी केला जातो. मुख्य करून शुष्क,कोरडं, कमी पाऊस असे हवामान या झाडाला (किंवा झुडपाला) जास्त मानवते. व्यावसायिक पणे शेती मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि पंजाब प्रांतात केली जाते.

पंजाब आणि गुजरात मधे लागवड केली जाणारी मेहंदी चा उपयोग डोक्यावर (अर्थात केसांना) लावण्या साठी, तसंच हाथांवर किंवा पायाच्या तळव्यांवर रचवली जाणारी मेहंदी ची शेती राजस्थानांत होते. मध्य प्रदेशची हिना मुख्यत्वे सुगंधित तेल, अत्तर, किंवा डोक्यावर लावण्या साठी उपयोगात येते.

मेहंदी पेरणीची वेळ

रोपांची लागवड जुलैच्या शेवटच्या आठवड्यात केली जाते. बियाणे प्रमाण 2 किलो बियाणे प्रति एकर आवश्यक आहे. कापणीचा कालावधी ८ महिन्यात घेतला जातो. पीकामधील पहिली कापणी दुसऱ्या वर्षापासून वर्षातून दोनदा केली गेली.

शेताची दोन ते तीन वेळा चांगली नांगरणी करा. शेवटची नांगरणी करताना शेणखताचे कुजलेले खत शेतात टाकावे. भारतात मेंदीची लागवड राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि बिहारमध्ये सर्वाधिक केली जाते.

उत्पन्न आणि नफा

या पिकातून दरवर्षी सुमारे 6 ते 8 क्विंटल उत्पादन मिळते. बाजारात 55 ते 70 रुपये किलोने विकले जाते. पेरणीसाठी नर्सरीमध्ये पूर्व-तयार रोपे निवडली जातात. या झाडांचे वय किमान 100 दिवस असावे. रोप ते रोपातील अंतर ४५ ते ३० सें.मी. सिंचन लागवडीनंतर लगेचच पहिले पाणी द्यावे. यानंतर फक्त झाडामध्ये ओलावा राखावा लागतो.

English Summary: Cultivate Mehndi and earn millions of rupees; Learn the complete information Published on: 03 February 2022, 04:59 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters