भारतात शेतकरी बांधव वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची लागवड करतात आणि बक्कळ कमाई करतात. जर योग्य वेळेवर योग्य पिकाची लागवड केली गेली नाही तर उत्पादनात घट घडून येते शिवाय पिकाची गुणवंत्ता देखील कमी होते.
म्हणुन पिकांची त्याच्या उपयुक्त हंगामात लागवड केली गेली पाहिजे. हिवाळ्यात शेतकरी बांधव भाजीपाला पिकांची लागवड करतात आणि चांगली कमाई करतात. भाजीपाला लागवड करण्यास खर्च कमी येतो आणि त्यातून चांगले उत्पन्न देखील प्राप्त होते म्हणुन शेतकरी बांधव भाजीपाला पिकांची लागवड करण्यासाठी उत्सुक असतात. मित्रांनो देशात हिवाळा सुरु होऊन महिना उलटला, रब्बीच्या पेरण्या उरकवून झाल्या, आणि शेतकरी बांधव आता भाजीपाला लागवड करण्याकडे वळतील. म्हणुन आज आपण डिसेंबर महिन्यात कोणत्या भाजीपाला पिकांची लागवड केली जाऊ शकते याविषयी जाणुन घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणुन घेऊया याबद्दल सविस्तर.
डिसेंबर महिन्यात ह्या भाजीपाला पिकांची लागवड करा
टोमॅटो लागवड
शेतकरी मित्रांनो जसं कि आपणास ठाऊक आहे डिसेंबर महिन्यात अनेक भाजीपाला पिकांची लागवड केली जाऊ शकते. त्यापैकी एक आहे टोमॅटो, याची लागवड डिसेंबर महिन्यात करता येऊ शकते. मित्रांनो टोमॅटो लागवड करतांना त्याच्या सुधारित वाणांची निवड करणे अत्यावश्यक ठरते. जर सुधारित वाणाची लागवड केली तर त्यापासून चांगले उत्पादन मिळते.
टोमॅटोच्या काही सुधारित वाणा
अर्का विकास, सर्वोदय, निवड-4, 5-18 स्मिथ, समय किंग, टोमॅटो 108, अंकुश, विकरांक, विपुलन, विशाल, अदिती, अजय, अमर, करीना, अजित, जयश्री, रिटा, बी.एस.एस.103.
मुळा लागवड
डिसेंबर महिन्यात मुळाची लागवड केली जाऊ शकते आणि त्यातून चांगले उत्पन्न देखील मिळते. या पिकासाठी थंड हवामान चांगले असते म्हणून याची लागवड प्रामुख्याने हिवाळ्यात केली जाते. मुळा लागवड हि सेंद्रिय चिकणमाती किंवा वालुकामय चिकणमाती असलेल्या जमिनीत करावी असा सल्ला दिला जातो. अशा जमिनीत मुळा लागवड केली तर उत्पादन अधिक मिळते.
मुळाच्या काही सुधारित जाती
जपानी सफेद, पुसा देशी, पुसा चेतकी, अर्का निशांत, जौनपुरी, बॉम्बे रेड, पुसा रेश्मी, पंजाब एजेटी, पंजाब सफेद, आय.एच.आर.1-1 कल्याणपूर सफेद, रॅपिड रेड, व्हाईट टिप्स, स्कार्लेट ग्लोब आणि पुसा ग्लेशियर
पालक लागवड
पालक हि एक हिरव्या भाजीपैकी एक आहे. पालक एक प्रमुख भाजीपाला पीक आहे. हि भाजी हिवाळ्यात सर्वाधिक खाल्ली जाते. पालक या पिकाला थंड हवामान आवश्यक असते. म्हणून पालक लागवड करताना वातावरणाची विशेष काळजी घ्यावी. तस पाहता पालक लागवड योग्य वातावरणात वर्षभर केली जाऊ शकते.
पालकाच्या सुधारित जाती
पंजाब ग्रीन, पंजाब सिलेक्शन, पूजा ज्योती, पुसा पालक, पुसा हरित, पुसा भारती इत्यादींचा समावेश होतो.
Share your comments