काकडी लागवड ही राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. कमी खर्चा मध्ये आणि कमी वेळेत चांगले उत्पादन काकडी पासून मिळू शकते. जर आपल्या भारताचा विचार केला तर भारताचे वातावरण काकडी लागवडीसाठी अनुकूल आहे.
आपल्याकडील वातावरणात काकडीची लागवड बाराही महिने केली जाऊ शकते. तसेच महाराष्ट्रात देखील काकडी लागवडीसाठी खूप चांगले वातावरण असल्याने काकडी तसं बघायला गेलं तर एक नगदी पीक असून शेतकरी बांधव या नगदी पिकाचे लागवड करून चांगला नफा कमवत आहेत. काकडीचा उत्पादन येण्याचा कालावधी पाहिल्या तर तो तीन महिन्याचा असून काकडी लागवडीसाठी येणारा खर्च अगदी नगण्य स्वरूपाचा असतो.जानेवारी महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काकडीची लागवड करून शेतकरी बांधव एप्रिल महिन्यापर्यंत बंपर उत्पादन प्राप्त करतात.
काकडी साठी महत्वाची पूर्वमशागत
काकडी लागवडीच्या माध्यमातून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी पूर्वमशागत व्यवस्थित करणे महत्त्वाचे आहे. शेताची चांगली खोलवर नांगरणी करून व नंतर जमीन भुसभुशीत करून काकडी लागवड केल्यास अधिक उत्पादन प्राप्त होते. काकडीची लागवड करण्यासाठी पाण्याची अधिक गरज भासत नाही. काकडीची लागवड ची सुपीक चिकन माती असलेल्या जमिनीत केल्यास चांगले उत्पादन प्राप्त होते.
काकडी लागवडीसाठी उपयुक्त हंगाम
काकडीची लागवड बाराही महिने करता येते. काकडी लागवडीसाठी 20 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान असलेले तापमान खूपच चांगली असल्याचे सांगितले जाते आणि या तापमानात काकडी लागवडीतून चांगले बंपर उत्पादन मिळते.
काकडीची लागवड कशी करावी?
काकडीसाठी शेताचे पूर्वमशागत करताना प्रति हेक्टरी 15 टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे तसेच 20 किलो नत्र, बारा किलो स्फुरद आणि दहा किलो पालाश खत एक एकर क्षेत्रासाठी पुरेसे असते. स्फुरद आणि पोटॅश संपूर्ण पेरणीच्यावेळी लावावे तसेच नायट्रोजन एक-तृतीयांश या प्रमाणात लावावे.
उरलेल्या नत्राचा अर्धा भाग एक महिन्यानंतर आणि उरलेला भाग फुलोरा नंतर द्यावा.
काकडी लागवडीबाबत तज्ञांचा महत्त्वाचा सल्ला..
आपल्याकडे पॉलिहाऊस अर्थात ग्रीन होत असेल तर आपण काकडी लागवड उन्हाळी हंगामात सुद्धा करू शकता आणि त्यातून चांगले उत्पादन मिळू शकतात. कृषी वैज्ञानिकांच्या मते, एक एकर काकडी लागवड करण्यासाठी सुमारे अर्धा किलो बियाणे लागते. लागवड करताना दोन बियांमधील अंतर 60 सेंटिमीटर असावी असा सल्ला दिला जातो. तसेच लागवडीसाठी असलेल्या सऱ्या (बेल्या ) आंतर हे अर्धा मीटर असावी. काकडीचे बियाणे एका ठिकाणी दोन दोन बियाणे टोकण करावे. ( संदर्भ-tknews24)
Share your comments