1. कृषीपीडिया

10 गुंठ्याच्या पॉलिहाऊसमध्ये करा काकडीची लागवड,35 दिवसात सुरु होईल पैशांचा ओघ

जर तुम्हाला कमीत कमी खर्चा मध्ये आणि अगदी कमी कालावधीत चांगला पैसा कमावण्याची इच्छा असेल तर तुम्ही काकडी लागवडीच्या माध्यमातून तुमची इच्छा सहज पूर्ण करू शकतात. कारण काकडी हे पीक ते 35 दिवसाच्या आत बाहेर चालू होते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
cucumber cultivation in polyhouse

cucumber cultivation in polyhouse

जर तुम्हाला कमीत कमी खर्चा मध्ये आणि अगदी कमी कालावधीत चांगला पैसा कमावण्याची इच्छा असेल तर तुम्ही काकडी लागवडीच्या माध्यमातून तुमची इच्छा सहज पूर्ण करू शकतात. कारण काकडी हे पीक ते 35 दिवसाच्या आत बाहेर चालू होते.

त्यामुळेकमीत कमी वेळेत येणारे पिकाचा विचार करत असाल तर काकडी  लागवड हा उत्तम पर्याय ठरेल. या लेखात आपण पॉलिहाऊस मधीलकाकडी लागवडीची थोडक्यात माहिती घेऊ.

 पॉलिहाऊसमधील काकडी लागवड

 काकडी हे 30 ते 40 दिवसांमध्ये उत्पन्न देणारे पीक असून कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे पीक आहे. बरेच शेतकरी पारंपरिक पद्धतीने काकडी लागवड करतातपरंतु आता तरुण शेतकऱ्यांचा कल हा आधुनिक पद्धतीने काकडी लागवड कडे दिसून येत आहे.जर तुम्हाला पॉलिहाऊसमध्ये काकडी लागवड करायची असेल तरदोन बेड मधील अंतर योग्य ठेवणे गरजेचे आहे.

नक्की वाचा:NCC प्रमाणपत्र आहे का तुमच्याकडे? राज्य पोलिस दलात तुमच्यासाठी आहे संधी; राज्य सरकारचा मोठा निर्णय

तुम्ही तुमच्या सोयीनुसार दोन बेड मधील अंतर ठेवू शकतात जसे की, दोन बेडमध्ये साडेतीन फुटाचे अंतर ठेवून शकता किंवा यापेक्षा कमी किंवा जास्त ही करू शकतो. बेड तयार केल्यानंतर बेडवर शेणखत, रासायनिक खत किंवादुसऱ्या कोणत्या प्रकारची खते तुम्हाला टाकायची असतील तर ती अगोदर टाकणे महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर सिंचनासाठी बेडवर ठिबक सिंचन अंथरूण घ्यायचे आहे.ठिबक सिंचन अंथरल्या नंतर बेडवर मल्चिंग पेपर अंथरून घ्यायचा आहे.

साधारणतः बाजारामध्ये 20 मायक्रोनते 40 मायक्रोन तसेच 25 मायक्रोन पर्यंतचे मल्चिंग पेपर मिळतात. आपल्याला आपल्या सोयीने आणि बजेटनुसार पेपर ची निवड करायची आहे. काकडी लागवड करताना वरायटी यांची निवड करताना मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारच्या व्हरायटी मिळतात. शेडनेटमध्येकाकडी लागवडीसाठी नामधारी,सिजेंटाया किंवा अनेक कंपन्यांच्याव्हरायटी उपलब्ध आहेत.यामधून एखादी योग्य व्हरायटी ची निवड आपण लागवडीसाठी करू शकतो.मित्रांनो पॉलिहाऊस किंवा शेडनेटमध्येकाकडीची व्हरायटी निवडतांना एकमहत्वाची गोष्ट लक्षात ठेवायचे आहे ती म्हणजे वरायटी निवडतांना परागीकरणाची गरज नसलेली व्हरायटी ची निवड करायची आहे. कारण पॉलिहाऊस किंवा शेडनेटमध्ये मधमाशी किंवा अन्य कीटक फिरण्याची शक्यता नसते. फुलाचे फळात रूपांतर होण्यासाठी जी मधमाशी किंवा किटका द्वारे परागीकरण  होणे महत्त्वाचे असते. परंतु पॉलिहाऊसमध्ये कीटक किंवा मधमाशी  फिरत नाही त्यामुळे सेल्फ पोलिनेशन म्हणजे परागीकरणाची गरज नसलेली व्हरायटी ची निवड करणे महत्त्वाचे आहे.

नक्की वाचा:अपडेट राहण्यासाठी वाचा! ड्रोन खरेदी साठी अर्ज कसा करावा? किती आणि कोणाला मिळते अनुदान? वाचा सविस्तर

काकडीची लागवड करताना

 काकडीची प्रत्यक्षात लागवड करताना दहा गुंठ्यांच्या शेडनेटमध्येसाधारणपणे दोन हजार बियांची लागवड करता येते. बियाणे टोकून लागवड करणे फायद्याचे ठरू शकते. लागवड करताना दोन बी यांच्यामधील अंतर एक फूट ठेवावे. एकदापॉलिहाऊसमध्ये लागवड केलेली काकडी साधारणतः 35 ते 40दिवसात काढणीला येते. काकडीला वाढ जास्त असल्याने काकडीची काढणे एका दिवसाआड किंवा दोन दिवसांच्या अंतराने करणे गरजेचे असते. जर आपण काढणी वेळेवर केली नाही किंवा लांबवली तर काकडी ची साईज व्यवस्थित न येणे किंवा नवीन आलेली फुले पडणे या समस्या निर्माण होतात म्हणून काकडीची तोडणी वेळेवर करणे खूपच महत्त्वाचे आहे. जेणेकरून होणारे आर्थिक नुकसान टाळता येते.

 काकडीचे तोडणी कधी करावी?

 काकडीचे तोडणी कधी करावी? म्हणजे काकडी तोडणीला योग्य झाली आहेहे कसे ओळखायचे?हे खूप सोपे आहे. काकडी ची लांबी साधारणतः 6 ते सात इंचाची झाली म्हणजे समजावे की काकडी तोडण्यासाठी योग्य आहे.

कारण बाजारामध्ये या साईजच्या काकडीला सर्वोत्तम भाव मिळतो. अशा पद्धतीने काकडीची तोडणी करणे महत्त्वाचे आहे. काकडीचा प्लॉट हा काकडीची तोडणी सुरू झाल्यापासून 60 ते 70 दिवस चालतो. दहा गुंठे क्षेत्रामध्ये एका दिवसाआड 300 ते 400 किलोकाकडीचे उत्पन्न मिळू शकते. जर आपण विचार केला तर 65 ते 70 दिवसात साधारण  वीस टनांच्या पुढेच उत्पादन निघू शकते.

English Summary: cucumber cultivation in polyhouse is profitable for farmer in short time Published on: 22 March 2022, 08:33 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters