पिकांना वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. यामुळे पिके घेताना ती वेगवेगळ्या प्रकारची लावली तर आपण जमिनीतील वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचा पुरेपूर वापर करू शकतो. यासाठी पिकांची फेरपालट करणे खूप गरजेचे आहे.
पिकांची फेरपालट :-
एकाच शेतात वेगवेगळ्या पिकांची लागवड करत राहणे किंवा एकाच वेळी शेतात वेगवेगळ्या पिकांची लागवड करणे म्हणजेच पिकांची फेरपालट होय.
एकामागून एक लागवड :-
या पद्धतीत एका पिकापाठोपाठ दुसरे पीक घेतले जाते. यामुळे जमिनीमधील असणाऱ्या अन्नद्रव्यांचा पुरेपूर वापर होतो. प्रत्येक पिकांवर वेगवेगळ्या प्रकारची कीड आणि रोग पडत असल्याने एका पिकाची कीड किंवा रोग नंतरच्या पिकावर पडण्याची शक्यता कमी असते. यामुळे दुसरे पीक लागवड करत असताना असे निवडावे की, पहिल्या पिकावर लागणारी कीड व रोग या पिकावर पडणार नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास सोयाबीन पिकावर लागणारी कीड व रोग गहू पिकावर पडत नाही आणि गव्हावरील कीड व रोग भुईमूग या पिकावर पडत नाही.
एकाच वेळी वेगवेगळ्या पिकांची लागवड :-
एकाच हंगामात शेतकरी विविध पिकांची लागवड करतात. अशावेळी पिकांची निवड करताना तृणधान्य, दाळवर्गीय, नगदी पिके आणि जनावरांचा चार पुरविणाऱ्या पिकांचा समावेश असावा. आंतरपीक घेणे हे फायद्याचे ठरू शकते. यामुळे जमीन, पाणी आणि अन्नद्रव्य यांचा योग्य वापर होतो आणि कमी जमिनीत जास्त उत्पादन मिळते. सोबतच पिकांचे कीड व रोगापासून संरक्षण होते.
प्रा. हरिष अ.फरकाडे (वनस्पती रोगशास्त्र विभाग)
श्री शिवाजी उध्यानविध्या महाविध्यालय, अमरावती.
मो. 8928363638 इ. मेल. agriharish27@gmail.com
डॉ. अमोल झापे (पीक संरक्षण विभाग)
कृषिविज्ञान शाखा, ग्रामीण शिक्षण संस्था,
(डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. सलग्नं) पिपरी, वर्धा. मो.9822930358
Share your comments