सध्या काही ठिकाणी पावसाने उघडीप घेतली असली तरी काही ठिकाणी तुरळक पाऊस (Sporadic rain) पडत आहे. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद व जालना जिल्ह्यात उद्या हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या (Department of Meteorology) माहितीनुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. सध्या ढगाळ हवामानामुळे पिकांमध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
आता महावितरण ठेवणार नजर; नुकसान भरून काढण्यासाठी राबविली जाणार 'ही' मोहीम
पीक व्यवस्थापन
कापूस : कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर फवारणी करा.
कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या प्रादूर्भाव (Bollworm outbreaks) जास्त आढळून आल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली प्रति एकर फवारणी करा.
दिवसाला फक्त 45 रुपये वाचवून 25 लाखांचे मालक व्हा; एलआयसीची 'जीवन आनंद योजना' देत आहे संधी
तूर : तुर पिकात सर्वात आधी आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करा. मूग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा डायमिथोएट 30 % 240 मिली प्रति एकर फवारणी करा.
भुईमूग : भूईमूग पिकात मावा (Mawa groundnut crop), फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांचे अच्छे दिन; सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तुरीचे दर वाढणार 3 हजार रुपयांनी
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; वन्य प्राण्यांनी हल्ला केल्यास मिळणार 20 लाख रुपये
खरीप पिकांमध्ये आंतरमशागतीचे नियोजन करा तंत्र पद्धतीने; चांगल्या उत्पादनासाठी होणार मदत
Share your comments