कोथिंबीर भारतातील प्रत्येक स्वयंपाकघरातील महत्वाचा भाजीपाला, कोथिंबीर हे जवळपास सर्वच भाजीत चव वाढवण्यासाठी टाकली जाते. कोथिंबीरच्या बियापासून धने तयार होतात आणि धनिया किंवा धने हे भारतात मसाले म्हणुन वापरले जातात. भारताला मसल्याचे माहेरघर असं जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि अशा आपल्या भूमीत मसाल्याची मागणी नेहमी असते. म्हणुन कोथिंबीर लागवड आपल्यासाठी एक फायद्याचा सौदा ठरू शकतो. चला तर मग जाणुन घेऊया कोथिंबीर लागवडिविषयी.
कोथिंबीर लागवडीसाठी जमीन कशी असावी
कोथिंबिरीची लागवड अगदी सोपी आहे कारण ती कोणत्याही जमिनीत येऊ शकते. जर शेतात सेंद्रिय खताचा वापर केला तर कोथिंबारीचे उत्पादन चांगले येते. कोथिंबीर लागवडीसाठी सुपीक चिकणमाती इंग्रजीत आपण तिला लोममाती (Loam Soil) म्हणतो असलेली जमीन कोथिंबिरीसाठी चांगली मानली जाते. दुसरीकडे, काळी मातीही ह्या पिकांसाठी योग्य आहे पण काळ्या जमिनीत लागवड केली तर पाणी मात्र कमी प्रमाणात द्यावे. शेतकरी मित्रानो लक्षात ठेवा, कोथिंबीर क्षारयुक्त जमिनीत वाढत नाही क्षारीय जमिनीत चुकुनही कोथिंबीर लागवड करू नये. अशा परिस्थितीत, आपण पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि सुपीक असलेली जमिन कोथिंबीर लागवडीसाठी योग्य मानली जाते.
कोथिंबीर लागवडीसाठी हवामान कसे असावे बरं
कोरड्या आणि थंड हवामानात कोथिंबीर लागवड चांगली मानली जाते. याशिवाय बियाणे अंकुरणासाठी 25-26 सेंटीग्रेड तापमान योग्य असल्याचे सांगितले जाते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, कोथिंबीर हे समशीतोष्ण हवामानाचे पीक आहे, ज्यामुळे फुलांच्या आणि धने तयार होण्याच्या टप्प्यावर दंवमुक्त/दडमुक्त हवामान आवश्यक असते. खरं तर, कोथिंबीर दंवाने खराब होऊ शकते, अशा परिस्थितीत आपण दंवमुक्त हवामानात कोथिंबीरची लागवड करावी. चांगल्या दर्जाची कोथिंबीर मिळवण्यासाठी त्याला थंड हवामान आणि मजबूत सूर्यकिरणे आवश्यक असतात आणि कोथिंबीरची लागवड समुद्र सपाटीपासून वर असलेल्या जमिनीवर करने गरजेचे असते.
कोथिंबीर लागवडीसाठी वावर कसं तयार करणार
कोथिंबिरीच्या चांगल्या उत्पन्नासाठी, आपण सर्व्यात आधी जमीन चांगली तयार केली पाहिजे. कोथिंबीरच्या चांगल्या वाढीसाठी, नांगरणी करण्यापूर्वी शेतात हेक्टरी 5-10 टन शेणखत टाकावे. तुम्हाला हवे असल्यास 5-5 मीटरचे बेड म्हणजे वाफे बनवा, असे केल्याने पिकाला पाणी देणे सोपे होईल. याव्यतिरिक्त, तण काढणे किंवा खुरपणी करणे देखील सोपे होईल.
कोथिंबीर पेरणीचा हंगाम नेमका कोणता बरं
»कोथिंबीरच्या लागवडीसाठी रब्बीचा हंगाम सर्वश्रेष्ठ मानला जातो.
»कोथिंबीर पेरणीसाठी, पिक घेण्यासाठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर हा सर्वोत्तम काळ असल्याचे सांगितले जाते.
»कोथिंबीरीची लागवड ही जर कोथिंबीरच्या उत्पादणासाठी करायची असल्यास ऑक्टोबर ते डिसेंबर हा सर्वोत्तम
काळ आहे, तर त्याच्यापासुन धने उत्पादीत करायचे असल्यास सर्वोत्तम काळ हा नोव्हेंबरचा पहिला आठवडा असतो.
»या व्यतिरिक्त, हिवाळ्यापासून म्हणजेच हिवाळ्यात पडणाऱ्या दंवपासुन/दडपासून संरक्षण करण्यासाठी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोथिंबीर पेरण्याची उत्तम वेळ असल्याचे सांगितले जाते.
पाणी व्यवस्थापन कसं असावे
»कोथिंबीर पेरल्यानंतर दहाव्या दिवशी पिकाला पहिले पाणी आणि सेंद्रिय खते पण ह्याच वेळी घातली जातात.
»यानंतर, दुसरे पाणी सुमारे 20 दिवसाच्या आसपास दिले जाते, यासोबतच आपण 35 ते 40 किलो डीएपी देऊ शकता.
»जर तापमान कमी असेल तर 25 दिवसांच्या आत 250 ते 300 ग्रॅम युरियाची फवारणी करावी.
»
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, 100 ग्रॅम युरिया 16 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी बिघा भर जमिनीत तीन टाक्या फवारल्या तर त्याचा फायदा कोथिंबिरीच्या उत्पादनात होईल.
»जर ऊन खुप खूप जास्त पडत असेल तर तुम्ही कोथिंबीर पिकाला आठवड्यातून दोनदा पाणी द्यावे.
»ज्या दिवशी तुम्ही कोथिंबीर पेरता, त्याचे बी त्याच्या बरोबर 20 दिवसांनी जमिनीतून बाहेर अंकुरायला सुरवात करते.
Share your comments